दोन  डिसेंबर, १९८४ च्या मध्यरात्री मध्य प्रदेशातील भोपाळ येथील ‘युनियन कार्बाइड’च्या कारखान्यात मेथिल आयसोसायनाइट ऊर्फ मिक वायू वातावरणात सुटून जो प्रचंड अपघात झाला, तो औद्योगिक क्षेत्रातील जगातला आजवरचा सर्वात मोठा अपघात असे समजले गेले. कारण त्यानंतरच्या आठ-दहा दिवसांत अडिच हजारांच्या वर माणसे मृत्युमुखी पडली आणि त्यानंरच्या गेल्या ३० वर्षांत किती माणसे अपंग झाली अथवा जिवास मुकली त्याची गणनाच नाही. मिक वायूचा वापर करून सेविन हे कीटकनाशक त्या कारखान्यात बनविले जाई. पण अपघाताच्या पूर्वी दीड महिना अगोदरपासून सेविन बनविणे बंद असल्याने तेथील दोन टाक्यांत असलेला अनुक्रमे ४५ टन आणि १५ टन वायू टाकीमध्येच पडून होता. हा वायू +१५ ते शून्य अंश सेल्सिअस तापमानाला आणि दर चौरस सें.मीटरला ०.५ ते ०.७  किलोग्रॅम एवढय़ा दाबाखाली साठवला जातो. या वायूचा पाण्याशी संपर्क आला तर वायूचे तापमान आणि दाब वाढतो. या टाकीवर बसवलेल्या व्हाल्व्हच्या पुढे बसवलेला पाइप पाण्याने धुण्यासाठी तेथील कामगाराने पाण्याची नळी व्हाल्व्हपुढच्या नळीला जोडून दिली होती. व्हाल्व्ह गळका असल्याने त्यातून पाणी टाकीत गेले आणि आतील मिक वायूचा दाब तीन किलोग्राम एवढा वाढला व तापमान तर एवढे वाढले की टाकी लाल बुंद झाली. त्यामुळे तिच्यावरची सेफ्टी व्हाल्व्ह उघडली जाऊन वायू बाहेर सुटला. असा वायू धुरांडय़ात जाळून हवेत जायला हवा, पण धुराडे सफाईसाठी काढून ठेवल्याने वायू सरळ हवेत जाऊन वातावरणात पसरला.
या अपघातानंतर जगभर रासायनिक कारखाने किती सुरक्षित आहेत याची पाहणी सुरू झाली. मग भारत सरकारने दिल्ली, बडोदा आणि ठाणे या तीन जिल्ह्यांचा अभ्यास करून त्यांच्यासाठी आपत्कालीन यंत्रणा बनवली. दिल्ली हे राजकीयदृष्टय़ा संवेदनशील आणि बडोदा व ठाणे येथील रासायनिक कारखाने लक्षात घेऊन या जिल्ह्यांची निवड झाली. नंतर भारतभरच्या सर्व जिल्ह्यांसाठी ही योजना लागू झाली.

मनमोराचा पिसारा ‘क्लेश’ कोणाला चुकलेत?
थबकून ऐकलं तेव्हा मनात विचारांचे तरंग उमटले. त्या तरंगानं मन जिज्ञासू झालं. उत्सुकता वाटली की अमुक एक शब्दच ‘नरहरी’ने का वापरला असावा. त्याऐवजी, दुर्गती, दुराचरण, मोह, आसक्ती या भावार्थाचे शब्द का वापरले नाहीत. आपण सर्वानी दुर्गेच्या आरतीमधला तो चरण हजारो वेळा ऐकला असेल नि म्हटलाही असेल, पण तो शब्द मनात रुतला.
क्लेशापासूनी तोडी भवपाशा.. अर्थातच यामधील ‘क्लेश’ हा शब्द. क्लेशापासून दुर्गामाते, मला सोडव..
आणि त्यातून शोध सुरू झाला आणि थांबलो तो श्रीमद्भागवतातील या श्लोकापाशी..
यश्च मूढतन्ते लोके
यश्च बुद्धे: परंगत:
ताव्युभौ सुखाम धेते
क्लिश्यन्ति इतरितो जन:
दोनच प्रकारची माणसं क्लेशापासून मुक्त असतात. बुद्धिमत्तेच्या जोरावर ज्यांनी मन जिंकलंय, भवसागर पार केलाय असे ‘परमहंस’ आणि जे बुद्धिहीन आहेत, मूढ आहेत, मठ्ठ आहेत! बाकी सर्वजणांना (आपल्यासारखे) क्लेश होत राहतात.
आता, अगदी नीट पाहिलं तर साऱ्यांनाच क्लेश होतात हे लक्षात येतं. कारण आपल्या बुद्धिसामर्थ्यांने आपण त्यांचा भेद केलेला नसतो. म्हणून क्लेशकारक जीवन कंठावं लागतं. सातत्यानं तणाव भोगावा लागतो, कारण त्या तणावाची आपापल्या मनात, वृत्तीमध्ये पाळमुळं शोधलेली नसतात. ते आपल्याला होणाऱ्या क्लेशाकरिता बाह्य़ परिस्थिती, नाते परिवारांनी दिलेली अन्याय्य वागणूक, आपल्या कामनापूर्तीत येणाऱ्या अडथळ्यांकडे बोट दाखवतात. त्यामुळे आपापल्या क्लेशापासून त्यांना मुक्ती मिळत नाही. आपल्या मनातला क्लेश हा बाह्य परिस्थितीला दिलेला प्रतिसाद असतो. ती आपल्या मनानं दिलेली प्रतिक्रिया असते. हे न समजणारे आपल्यासारखे लोक क्लेशापासुनी सोडी, तोडी भवपाशा अशा आरत्या म्हणतात. दुर्गेनं आपल्यावर प्रसन्न होऊन तिच्या धारदार शस्त्रानं हे पाश तोडावे अशी आळवणी आपण करतो. आपल्या हे लक्षात येत नाही की दुर्गा ही शक्ती आपल्या पलीकडे नसते. आपणच ‘दुर्गा’ असतो. दुर्गेवरच्या भक्तीने मनातलं सामथ्र्य जागृत होतं. मनोबल वाढतं आणि ते ‘पाश’ आपल्यालाच तोडावे लागतात. दुर्गादेवीनं कृपा केली म्हणून पाश तुटत नसतात..
मन स्थिरावलं आणि दुर्गे दुर्घटभारी म्हणता म्हणता कधी आत्ममग्न झालं कळलं नाही. त्या शांत मनात अचानक शक्ती असल्याचा विलक्षण अनुभव आला तो क्षण क्लेशमुक्तीचा होता..
म्हणजे ठरलो का आपण बुद्धे: परंगत, कायमचे नाही.. पण काही क्षणापुरते तरी नक्की!!  क्षणभराच्या त्या सामर्थ्यांच्या प्रकाशात मनातला अंधकार दूर झाला म्हणून क्लेशमुक्तीचा संघर्ष सुरूच ठेवावा लागतो. अधूनमधून तरी येतात असे क्लेशमुक्तीचे क्षण.
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com

Industrial production rate advanced 5.7 percent in February
औद्योगिक उत्पादन दर फेब्रुवारीमध्ये ५.७ टक्क्यांपुढे
Navi Mumbai, Escalating Traffic, traffic jam, airoli, belapur, Illegal Parking, traffic jam in Navi Mumbai, traffic jam belapur, traffic jam airoli, illegal parking in navi mumbai, marath news, two wheelar parking, four wheelar parking, navi mumbai citizens,
बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा खोळंबा, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे ऐरोलीपासून बेलापूरपर्यंत वाहनतळांची सुविधा अपुरी
buldhana japan marathi news, japanese language buldhana marathi news
गरिबीच्या अंधारावर मात करत निघाली उगवत्या सूर्याच्या देशात; बकऱ्या वळणाऱ्या रमाई कन्येला जपानमध्ये लाखोंचे ‘पॅकेज’
trees Thane-Belapur industrial city
हरित पट्ट्याच्या मुळावर एमआयडीसी, २०० झाडांची कत्तल होणार, पर्यावरणवादी संस्थेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

प्रबोधन पर्व  कादंबरी संतांसारखे मतप्रसाराचे काम करते
‘‘समाजांत उत्कृष्ट विचारांचा व पुरुषार्थाच्या कल्पनांचा प्रसार करण्यास कादंबरीसारखें दुसरें सोपें साधनच नाहीं. ह्य़ा उत्कृष्ट विचारांचा व पुरुषार्थाच्या कल्पनांचा प्रादुर्भाव ज्या व्यक्तींच्या ठायीं झाला असें कादंबरीकारांना दाखवावयाचें असतें, त्या व्यक्ती व्यवहारांतील वर्तमान समाजांत प्राय: असणें अशक्यच असतें. त्या कादंबरीकाराच्या अद्भुत सृष्टींतच वास करीत असतात. परंतु वास्तविक कादंबरीकारानें त्या एकदां आपल्या वास्तविक कथानकांत आणून सोडल्या म्हणजे त्या वाचकांचीं मनें आपल्याकडे आकर्षून घेतात व संतांप्रमाणें वाचकांना तात्काळ आपल्यासारखें करून टाकतात. मतप्रसाराचें काम कादंबऱ्या करतात त्या हें असें करितात.’’  
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी ‘कादंबरी’ या आपल्या निबंधात मराठी कादंबरीचा सुरुवातीपासूनचा आढावा घेत तिच्या सामर्थ्यांची कारणे सांगितली आहेत. त्याविषयी राजवाडे लिहितात -‘‘लोक कादंबऱ्या फार वाचतात, म्हणून नाकें मुरडणाऱ्या व हकाटी करणाऱ्या कित्येक लोकांना आपला प्रतिस्पर्धी किती जुनाट व केवढा बलाढय़ आहे ह्य़ाचा यथास्थित अंदाज झालेला नसतो असेंच म्हणावें लागतें. हा जर अंदाज त्यांना होईल तर ह्य़ा राक्षसाचा अधिक्षेप करण्यापेक्षां आत्मकार्यार्थ ह्य़ांचें साहाय्य घेणें जास्त हिताचें आहे हें त्यांच्या ध्यानांत येईल. समाजांत अमुक एका मताचा प्रसार व्हावा अशी इच्छा उत्पन्न झाली म्हणजे सरस्वतीच्या ह्य़ा मांडलिकाला ही इच्छा अमलांत आणण्याची विनंति केली असतां ती तो खुशीनें मान्य करील.. समाजाची इच्छा काय आहे, त्याचें स्वरूप समजून घेऊन तो आपल्या कामाला जारीनें लागेल. लहान मुलांना पशुपक्ष्यांच्या गोष्टी सांगून त्यांच्या मनांत युक्ति व साहस ह्य़ांचें बीजारोपण करील; स्त्रीजनांना संसारसुखाची गुरुकिल्ली पटवील; तरुणांना राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेचें रहस्य कळवील; आणि वृद्धांना आयुष्याच्या इतिकर्तव्यतेचें दिग्दर्शन करील; आणि इतकेंहि करून तें कसें व केव्हां केलें हें कोणाला समजून देणार नाहीं.