पॉलीअक्रिलोनायट्राईल (PAN) च्या प्री-कर्सर म्हणून क्षमता सर्वप्रथम १९५०मध्ये जपानमध्ये शास्त्रज्ञांच्या लक्षात आली आणि त्यानंतर १९६० मध्ये अमेरिका आणि युरोपमध्ये याचा वापर सुरू झाला.  पॉलीअक्रिलोनायट्राईल मूळ पाया असलेल्या कार्बन तंतूंचे ताकद आणि उष्णता गुणधर्मानुसार वर्गीकरण केले जाते.
तन्यता गुणधर्मानुसार वर्गीकरण :
१. अति उच्च स्थितिस्थापकांक (अल्ट्रा हाय मोडय़ुलस), २. उच्च स्थितिस्थापकांक (हाय मोडय़ुलस) ३. मध्यम स्थितिस्थापकांक (इंटरमिजिएट मोडय़ुलस), ४. कमी स्थितिस्थापकांक व उच्च तन्यता (लो मोडय़ुलस आणि हाय टेन्साइल), ५. अति उच्च तन्यता (सुपर हाय टेन्साइल)
 उष्णता गुणधर्मानुसार वर्गीकरण :
उच्च उष्णता प्रक्रिया तंतू (हाय हीट ट्रीटमेंट कार्बन फायबर्स)- या प्रक्रियेत अंतिम उष्णता प्रक्रियेचे तापमान २००० ओ से.च्या पुढे असते.  मध्यम उष्णता प्रक्रिया तंतू (इंटरमिजिएट हीट ट्रीटमेंट कार्बन फायबर्स)- या प्रक्रियेत अंतिम उष्णता प्रक्रियेचे तापमान १५००ओ से.च्या पुढे असते.  कमी उष्णता प्रक्रिया तंतू (लो हीट ट्रीटमेंट कार्बन फायबर्स)- या प्रक्रियेत अंतिम उष्णता प्रक्रियेचे तापमान १०००ओ से.च्या पुढे असते. कार्बन तंतूंच्या उत्पादन प्रक्रियेचे मूळ तत्त्व म्हणजे प्री-कर्सर तंतूवर उष्णता प्रक्रिया करून त्याचे कार्बनमध्ये रूपांतर करणे. या उष्णता प्रक्रिया तीन पायऱ्यांमध्ये केल्या जातात.
PAN कर्सर तंतू
*उष्णता ऑक्सिडीकरण स्थिरीकरण
(हवेमध्ये १८० ते ४०० ओ से. तापमानास)
* काबरेनायझेशन प्रक्रिया
(हवेमध्ये ६०० ते १५०० ओ से. तापमानास)
*प्रकाशिक नरमीकरण (ऑप्टिकल ग्राफिटायझेशन)
(अप्रक्रियाक्षम (inert) वातावरणात २००० ते २५००ओ से. तापमानास)
वजनाने हलका पण ताकदवान आणि टिकाऊ असलेला कार्बन तंतू हा २१ व्या शतकातील उच्च तंत्रज्ञानाने उपलब्ध झालेला पदार्थ आहे. उच्च तन्यता व स्थितिस्थापकता, कमी घनता, उच्च उष्णता रोधकता (२०००ओ से. तापमानाच्या पुढे), तीव्र रासायनिक वातावरणात टिकाव धरण्याची क्षमता, जैविक सुसंगतता, आणि ताणाखाली आकाराची व गुणधर्माची स्थिरता ही कार्बन तंतूंची वैशिष्टय़े आहेत.  त्यामुळे कार्बन तंतूंचा उपयोग प्रामुख्याने विमाने आणि अवकाश याने, मोटारगाडय़ा, क्रीडा, सागरी क्षेत्रात लागणारे साहित्य, यांत्रिकी, बांधकाम व स्थापत्य या क्षेत्रांमध्ये केला जातो.
संस्थानांची बखर: कांग्रा संस्थान
कांग्रा-लांबाग्रा हे ब्रिटिश भारतातील संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाल्यावर प्रथम पेप्सु व पुढे हिमाचल प्रदेशात समाविष्ट केले गेले. ‘काटोच राजपूत’ वंशीयांनी ख्रिस्तपूर्व ४३००२ मध्ये हे राज्य स्थापन केले अशी आख्यायिका आहे. कांग्राच्या राजांचे प्रभू रामचंद्राशी युद्ध झाले अशीही कथा आहे. कांग्रा राजांचे सम्राट अशोकाशी झालेल्या युद्धात त्यांना मुलतान हा परगणा गमवावा लागला. १५५६ साली अकबराने कांग्रा घेतल्यावर तेथे मोगलांचा अंमल सुरू झाला. सन १६२० ते १७५२२ या काळात कांग्राचे राज्य मोगल किल्लेदार आणि त्याच्या शिबंदीच्या देखरेखीखाली होते. १७५२ साली अहमदशाह अब्दालीने कांग्रा आणि आसपासचा पहाडी प्रदेश मोगलांकडून घेतला आणि त्या प्रदेशावर कांग्राच्या कटोच राजवंशाचा राजा घमंडचंद याला सुभेदार म्हणून नियुक्त केले. १७७४ साली शिखांनी कांग्रा किल्ला जिंकून अमल बसविला परंतु, संसारचंद या काटोच वारसाकडे कांग्राचे राज्य परत सुपुर्द केले. संसारचंदने आसपासच्या जमीनदारांवर, जहागिरदारांवर हल्ले करून खंडणी वसूल करण्याचा सपाटा लावला. संसारचंदाने बिलासपूरच्या पहाडी राज्यावर केलेले आक्रमण मात्र त्याला घातक ठरले. बिलासपूरच्या राजाने प्रबळ गुरख्यांची मदत घेऊन हे आक्रमण परतविले. पण १८०६ साली गुरख्यांनीच कांग्रा किल्ल्यावर हल्ला करून राज्य पूर्ण उद्ध्वस्त केले. संसारचंद व त्याचे कुटुंबीय, कांग्रा निवासी लोक जंगलात वा शेजारी राज्यांत आश्रयास गेले. तीन वर्षांनी थोडे स्थिरस्थावर झाल्यावर संसारचंदने रणजित सिंहाला मदतीची विनंती केली. रणजीत सिंहाने आपली फौज पाठवून गुरख्यांना सतलज पार पिटाळले. या मदतीचा मोबदला म्हणून रणजीतसिंहाने कांग्रा किल्ला आणि १६ गावे शीख साम्राज्यात सामील केली. १८२४ साली संसारचंदाच्या मृत्यूनंतर रणजीतसिंहाने कांग्राचा उरलसुरला प्रदेशही लाहोरच्या शीख साम्राज्यात सामील केला. पुढे १८४६ साली पहिल्या अँग्लो-शीख युद्धानंतर कंपनी सरकारने शीख साम्राज्य खालसा केले आणि अर्थातच कांग्राचे पुरातन राज्य ब्रिटिश अंमलाखाली गेले.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com