आपणा सर्वाना सिरॅमिक हे मातीची भांडी, फरशी, भांडय़ांना कोटिंग देणे यासाठी वापरले जाते हे ठाऊक आहे. सिरॅमिक हे सुरुवातीला अपवर्तन रोधकतेसाठी उपयोगी मातीची भांडी तयार करण्यासाठी उपयोगात येत असे. सिरॅमिक तंतूंची निर्मिती व्यापारी तत्त्वावर सर्वप्रथम १९८० साली केली गेली. सिरॅमिक तंतू हे अधातू परंतु असेंद्रिय तंतूंच्या वर्गामध्ये मोडतात. काचतंतू हा या वर्गातील दुसरा तंतू. परंतु सिरॅमिक आणि काचतंतूमधील मुख्य फरक म्हणजे काचतंतू हा अस्फटिकीय तंतू आहे तर सिरॅमिक हा बहुस्फटिकीय घन तंतू आहे. आरंभीच्या काळात सिरॅमिक तंतूंचा वापर केवळ उष्णतारोधक पदार्थ म्हणून केला जात असे. नंतरच्या काळात त्यांच्या गुणधर्माचा विकास झाल्यामुळे विविध क्षेत्रांमध्ये त्यांचा वापर सुरू झाला. सिरॅमिक तंतू हे अति कमी व्यासाच्या तलम तंतूंपासून मोठय़ा व्यासाच्या जाड तंतूंपर्यंत बनविले जातात.
सिरॅमिक तंतूमध्ये ऑक्साइड आणि नॉन-ऑक्साइड असे दोन प्रकारचे तंतू उपलब्ध आहेत. यातील ऑक्साइड तंतू हे अ‍ॅल्युमिना आधारित तंतू असतात तर नॉन-ऑक्साइड  तंतू हे सिलिका कार्बाइड आधारित तंतू असतात.
सिरॅमिक तंतू ज्या उपयोगासाठी वापरात आणावयाचा असेल त्याप्रमाणे लागणारे गुणधर्म त्या तंतूमध्ये उत्पादन करतानाच समाविष्ट केले जातात. या तंतूंचे मुख्य गुणधर्म म्हणजे उच्च तन्यता, उच्च स्थितिस्थापकता, कमी उष्णता वाहकता आणि उष्णतेने होणाऱ्या गुणधर्माच्या अवनतीस रोधकता हे होत. आज विविध उपयोगांसाठी लागणाऱ्या सिरॅमिक तंतूंचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. या तंतूंचा उपयोग प्रामुख्याने संयुक्ते (कॉम्पोझिट्स) बनविण्यासाठी केला जातो, जिथे उच्च तन्यता, ताठपणा, कणखरपणा, उच्च तापमानामध्ये आकार व गुणधर्माची स्थिरता यांची गरज असते त्या ठिकाणी ही संयुक्ते वापरली जातात. या शिवाय ज्या ठिकाणी उच्च उष्णतारोधकता जरूर असेल, त्या ठिकाणी आणि उच्च तापमानास वायू गाळण्याच्या प्रक्रियेमध्ये सिरॅमिक तंतूंचा उपयोग केला जातो. सिरॅमिक तंतूंचा उपयोग हीट एक्सचेंजर, गॅस टर्बाइन, फ्यूजन रिअ‍ॅक्टर यासारख्या यंत्रात केला जातो. धातू व संयुक्ते यांच्या मजबुतीकरणासाठीसुद्धा सिरॅमिक तंतू वापरले जातात.संस्थानांची बखर: कांग्राचा किल्ला
धरमशाला शहरापासून वीस कि.मी. असलेल्या कांग्रा किल्ल्याचा ऐतिहासिक उल्लेख अलेक्झांडर द ग्रेटच्या ख्रिस्त पूर्व चवथ्या शतकातल्या युद्धविषयक नोंदींमध्ये आढळतो. कांग्राच्या काटोच राजपूत शासकांनी साधारणत अडीच हजार वर्षांपूर्वी बांधलेला हा किल्ला हिमालयातील सर्वात मोठा आणि बहुधा भारतातील सर्वात पुरातन किल्ला असावा. कांग्राचा उल्लेख त्रिगार्त या नावाने महाभारतात सापडतो. काही वेळा या राज्याचा उल्लेख नागरकोट, जालंधर असाही केला गेला.
   अलेक्झांडरशी लढलेला कांग्राचा काटोच राजा पोरस याचे मूळ नांव राजंका परमानंद चंद्र होते असाही उल्लेख आहे. इ.स.१६२० ते १७५२ या काळात कांग्रा किल्ला मोगलांच्या ताब्यात होता. संपूर्ण दगडात बांधलेल्या या किल्ल्याची एक बाजू सरळसोट कडय़ावर आहे. १००९ साली गझनीच्या मेहमूदाने कांग्रा किल्ला घेऊन किल्ला आणि आतील शिबंदीचा पूर्ण विध्वंस केला. किल्ल्याच्या िभतींमध्ये आणि विहीरींमध्ये अमाप सोने आणि इतर जडजवाहर असल्याची चर्चा होती. महमुदाला त्यापकी आठ विहिरी सापडल्या. त्यातील अमाप संपत्ती महमुदाने लुटून आपल्याबरोबर नेली.
    कांग्राखोरे देवभूमी म्हणून ओळखले जाते. या खोऱ्यात लहानमोठी ३००० मंदिरे आहेत. या प्रदेशात तीन शक्तीपिठे आहेत असे मानले जाते. ब्रिजेश्वरी किंवा वज्रेश्वरी, ननादेवी आणि ज्वालामुखी किंवा ज्वालादेवी. या तीन शक्तीपिठांची मंदिरे साधारणत १५०० ते २००० वर्षांपूर्वी बांधली गेली. वज्रेश्वरी मंदीराचा उल्लेख नागरकोट मंदीर म्हणूनही केला जाई. महमूदाने कांग्रा किल्ला लुटल्यावर आपला मोर्चा या नागरकोट मंदीराकडे नेला. पिढय़ानपिढय़ा राजा आणि धनिक लोकांनी या मंदिराला अर्पण केलेली अमाप संपत्ती महमूदाने एक दिवसात लुटून ही सर्व लूट अनेक उंटांवर लादून आपल्या राज्यात नेली.
    कांग्रा शहराजवळ बजनाथ, मसरूर आणि किल्ल्यात असलेली अंबिकादेवी, लक्ष्मीनारायण आणि जैनमंदीर ही मंदीरे आजही सुस्थितीत आहेत.
सुनीत पोतनीस – संस्थानांची बखर कांग्राचा किल्ला

सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

Google New App Photomath let you take a picture of a math equation and help you solve it step by step
गूगलकडे आहे ‘असा’ एक ॲप; विद्यार्थ्यांची गणितं सोडवली जातील मिनिटांत, जाणून घ्या
how to get rid of house rats tips
Cleaning tips : घरातील उंदरांना पळवून लावण्यासाठी ‘गव्हाचा’ करा वापर! पाहा या दोन टिप्स…
Upvas special naivedya special batata bhaji
बटाटयांची सुकी भाजी; नैवेद्याच्या पानावर वाढली जाणारी बटाटा भाजी एकदा नक्की ट्राय करा
Why a sunscreen over SPF 50 is still the best bet for the beach
तुम्हीही उन्हात जाताना ‘SPF 50’ सनस्क्रीन वापरताय का? मग त्वचारोग तज्ज्ञ काय सांगतात वाचाच