आपल्याला हरघडी केरोसिन, पेट्रोल, एल.पी.जी. हा स्वयंपाकाचा गॅस अशा प्रकारची इंधने लागतात. विमानाचे इंधन, कारखान्यांसाठी लागणारी बेन्झीन, टोलविन, प्रोपिलीन, इथिलीन आणि आणखी आपल्याला परिचित नसलेल्या अनेक रसायनांची गाडय़ांवर लादलेल्या टाक्यांमधून वाहतूक होत असते. रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनांचे जसे अपघात होतात तसेच या वाहनांचेही अपघात होतात. अशा अपघातांत माणसे मरतात, वाहनांचे नुकसान होते, ती रस्त्यावर कोलमडून पडतात. तसे ते रसायनांची वाहतूक करणाऱ्या वाहनांबाबतीतही घडते. ही वाहने रस्त्यावर पडली किंवा इतर वाहनांनी यांना जोरदार टक्कर दिल्यावर ती गळू लागतात आणि त्याचा त्रास जवळच्या वस्तीतील लोकांना अथवा रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांना होतो.
१९९८ सालच्या बेताला मानखुर्दजवळ ऐन हायवेवर प्रोपिलीनच्या टँकरला अपघात होऊन तो गळू लागला. प्रोपिलीन हा ज्वालाग्राही वायू असल्याने पोलिसांनी तो रस्ता ताबडतोब वाहतुकीला बंद केला. तो वायू टाकीत भरणाऱ्या कंपनीला बोलावून तो दुसऱ्या टाकीत भरायला लावला. तोपर्यंत दोन दिवस गेले आणि ते दोन दिवस रस्ता वाहतुकीला बंदच ठेवावा लागला होता. पोलिसांनी सतर्क राहून रस्ता बंद केला नसता तर कितीतरी लोक आगीत होरपळून मेले असते. हा वायू ज्वालाग्राही असल्याने बाजूने जाणाऱ्या मोटारींच्या धुराडय़ातून बाहेर पडणाऱ्या ठिणग्यांमुळे आग लागते.
नरसोबाची वाडी हे दत्ताचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. येथे १० वर्षांपूर्वी एका सकाळी ६ च्या सुमारास केरोसिनचा एक टँकर उलटला. सगळे केरोसिन रस्त्यावर सांडले. ती लोकांच्या प्रातर्वधिीची वेळ असल्याने लोक रस्त्यावरच होते. यापकी काही लोकांनी आपल्याजवळ असलेल्या डबडय़ात केरोसिन गोळा केले तर कोणी घरी धाव घेऊन डबे, बाटल्या, हंडे आणून त्यात केरोसिन गोळा करायला सुरुवात केली. केरोसिन तेव्हा रेशनवर थोडे मिळत असे, शिवाय हे फुकट मिळत होते. त्यामुळे ते गोळा करण्यासाठी गर्दी होती.
तेवढय़ात केरोसिनने आग पकडली आणि त्यामुळे रस्त्यावर केरोसिन गोळा करणारे अनेक लोक होरपळून मरण पावले.
मनमोराचा पिसारा: दालीचं घडय़ाळ
साल्वदोर दाली यांनी आपल्या ‘परसिस्टन्स ऑफ मेमरी’ या लहानशा (२४x३५) कॅनवासवर वितळणाऱ्या घडय़ाळाची प्रतिमा मांडली आणि सर्वसामान्य चाहतेच नव्हे तर कलासमीक्षकही खडबडून जागे झाले. एका विशाल भूजल विस्तारावर किनारासदृश दिसणाऱ्या अवकाशातल्या एका झाडावर वितळणाऱ्या घडय़ाळाची प्रतिमा त्यानं रेखाटली. त्याच चित्रात आणखीही तशीच घडय़ाळं आहेत. दालीचं ते चित्र पाहून आजही अवाक् व्हायला होतं. मुळात सर्रिअ‍ॅलिस्ट शैली धक्कातंत्राचा नाटय़मय उपयोग करते. त्यात ‘दाली’ यांच्या व्यक्तिमत्त्वामधील विक्षिप्तपणा, नाटकीपणा आणि फॉर्म व रेषेवरील त्यांचं असामान्य प्रभुत्व जाणवतं.
दालीच्या काळातच वितळणारी घडय़ाळं केवळ प्रतिमा न राहता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं प्रतीक झाली.
दालीनी घडय़ाळांना अशा वितळलेल्या स्वरूपात का मांडलं यावर खूप समीक्षा आणि विश्लेषण झालं आहे, होत आहे आणि होत राहील.
दाली आपल्या चित्रातून अशाच चकविणाऱ्या ‘गुगली’ प्रतिमांचा वापर करीत असे. त्यातल्या त्यात वितळणारी घडय़ाळं त्या काळात विलक्षण नेत्रदीपक झाली. याची मुख्य कारणं चित्रातल्या शैलीपुरती मर्यादित नसून, सामाजिक आणि वैज्ञानिक आहेत. चित्र १९३१ साली प्रसिद्ध झालं.
तो काळ वैज्ञानिक जगतामधल्या अजब शोधांच्या प्रसाराचा होता. विशेषत: अणुविज्ञान,  खगोलशास्त्र यामधील हादरविणाऱ्या संशोधनांनी जग भारलेलं होतं. काळ ही संकल्पना तोपर्यंत अनाकलनीय आणि चिरंतन. अपरिवर्तनीय वास्तव म्हणून स्वीकारलेली होती, पण ‘काळ’ ही संकल्पनादेखील सापेक्ष असते. वस्तुमान व गतिमान यांच्या परस्परसंबंधातून ‘काळ’ निर्माण होतो. ‘काल’ अभेद्य नसून परिवर्तनीय आहे, ही कल्पना अभिजन विचारमानसात रुजत होती. कदाचित या विचारांचा दालीवर परिणाम झाला असेल किंवा त्याच्या प्रतिभेच्या जोरावर त्यानं ‘काल’ संकल्पनेच्या काळाच्या पुढे जाऊन निरूपण केलं असेल. नाही तरी कलाकाराला बदलाची चाहूल सर्वसामान्यांपेक्षा आधीच लागते. गंमत म्हणजे असा काही जडजंबाल विचार नव्हता. दालीला घडय़ाळानुसार पळणाऱ्या समाजाची खिल्ली उडवायची असेल!!
अ‍ॅण्डोरा या फ्रान्स आणि स्पेन सीमारेषेवरील चिमुकल्या गावात ‘दालीचं घडय़ाळ’ म्हणून एक शिल्प रचलेलं आहे. त्या गावाच्या मध्यवर्ती चौकात विराजमान झालेलं हे दालीचं घडय़ाळ टुरिस्टांचं फार मोठं आकर्षण नसलं तरी त्या गावानं दालीला वाहिलेली ती श्रद्धांजली आहे. गंमत म्हणजे हे चिमुकलं गाव कमनगर आहे आणि नगरकम स्वतंत्र राष्ट्रदेखील आहे आणि तेही डय़ुटी फ्री म्हणून! टुरिस्टांची गर्दी होते ती ‘त्या’ दुकानात. पण दुपारी १२ ते ४ दुकानं बंद.. ही त्यांची झोपण्याची राष्ट्रीय वेळ. काळाची ऐशीतैशी केली ती दालीनी तशी नि स्पॅनिश मंडळींनी अशी!!
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व: ‘भारतरत्न’ महर्षी धोंडो केशव कर्वे
महर्षी धोंडो केशव कर्वे हे १९ व्या शतकातील अतिशय कर्तबगार, बुद्धिमान आणि प्रतिभावान सुधारक होते. नामदार गोखले, लोकमान्य टिळक, राजा राममोहन राय, स्वामी रामानंद तीर्थ या लोकोत्तर पुरुषांच्या मांदियाळीत बसणारे कर्वे आपण या मान्यवरांच्या किती तरी मागे आहोत, हे प्रांजळपणे कबूल करत. तसे त्यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहून ठेवले आहे. ते म्हणतात, ‘‘सगळ्या जगाला – निदान आपल्या राष्ट्राला तरी वाट दाखविणारे हे (वरील मान्यवर) मोठे देदीप्यमान दीपकच होत! यांच्याखालीं कित्येक पायऱ्या टाकल्या, म्हणजे माझ्यासारख्या मनुष्यांची पायरी येते. माझी किंमत मी जाणून आहें. मी मोठेसे कांहीं केलें नाहीं, ही जाणीव मला आहे.’’ अनाथ बालिकाश्रम, महिला विद्यालय, महिला विद्यापीठ आणि निष्काम कर्ममठ या संस्थांची स्थापना कर्वे यांनी केली. केवळ विधवाविवाहाचा पुरस्कारच केला नाही तर स्वत: विधवेशी विवाह केला. याचबरोबर आपल्या संस्थांसाठी मालतीबाई बेडेकर, वा. म. जोशी, इरावती कर्वे, वा. गो. मायदेव, विश्वनाथ आबाजी मोडक, पार्वतीबाई आठवले इत्यादी अनेक नामवंतांना जोडून घेतले. ‘मनोरंजन’कार का. र. मित्र म्हणतात, ‘‘अबला स्त्रीवर्गाच्या उद्धारासाठीं  प्रो. कर्वे यांनी आरंभिलेल्या एकनिष्ठ प्रयत्नांची मधुर फळें महाराष्ट्र आज चाखित आहे.. आपलें सारें आयुष्य, तनुमनोधन किंबहुना आपलें सर्वस्वच त्यांनीं स्त्रीवर्गाच्या उन्नतीचे प्रयत्न करण्याकडेच अर्पण केले आहे.’’ तर शिक्षणतज्ज्ञ रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे म्हणतात – ‘‘अण्णा कव्र्यानीं स्त्रियांच्या उन्नतीचा मार्ग स्वीकारला, त्यांत पुष्कळ अडचणी होत्या.. काम फार नाजूक; गरसमजाला पुष्कळ वाव; असें असलें तरी त्यांनीं आपल्या कामाच्या पवित्रपणाबद्दल थोडय़ाच दिवसांत सर्व लोकांची खात्री करून दिली.’’  कर्वे यांना केंद्र सरकारने ‘भारतरत्न’ या सन्मानाने गौरवले.