‘दाग अच्छे है’ ऐकायला छान वाटते, पण एरवी हे डाग किती त्रास देतात, याचा प्रत्येकाने एकदा तरी अनुभव घेतला असेल. नवीन कपडे घालून सण-समारंभात मिरवताना मजा वाटते, पण त्याच कपडय़ांवर जर डाग पडला तर तो काढण्यासाठी ना-ना प्रकार केले जातात. फक्त साबणाने जेव्हा हे डाग जात नाहीत, तेव्हा डाग काढणाऱ्या उत्पादनांचा विचार केला जातो. जो पदार्थ कपडय़ावर पडलेला असतो, तो पाण्यात विरघळणारा नसेल तर त्याचा डाग पडतो. साधारणपणे िलबू म्हणजे सायट्रिक आम्ल आणि बेकिंग सोडा (सोडा बाय काबरेनेट) यांचे मिश्रण डाग घालवण्यासाठी वापरले जाते. हे मिश्रण कपडय़ांना शुभ्रता आणण्यासाठीही वापरले जाते.
कपडय़ाच्या आणि डागाच्या प्रकारानुसार डाग काढण्यासाठी विकरे, क्लोरिन ब्लिच अथवा ऑक्सिजन ब्लिचचा वापर केला जातो. डागही वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जसे विकरयुक्त(एंजाइमेटिक) उदाहरणार्थ रक्त, ऑक्सिडायजेबल (उदा. चहा, कॉफी), ग्रीज (वंगण, तूप, तेल) आणि माती, चिखलाचे डाग. बहुतेकदा प्रोटीएज हे विकर वॉिशग पावडरमध्ये असते. हे विकर डागातील पाण्यात न विरघळ्णाऱ्या प्रथिनांचं विरघळ्णाऱ्या लहान तुकडय़ात रूपांतर करतात. त्यांना ‘ब्लिचेबल डाग’ किंवा ‘ऑक्सिडायजेबल डाग’ असेही म्हणतात. हे डाग ब्लिच करणाऱ्या पदार्थाने काढले जातात.
ऑक्सिजनयुक्त ब्लिच असा शब्दप्रयोग आपण सर्रास वापरताना बघतो. हा ऑक्सिजन त्या पावडरमध्ये कसा येत असेल? सोडियम परकाबरेनेट हे रसायन पावडर स्वरूपात असते, त्याचा पाण्याशी संपर्क येताच सोडियम काबरेनेट आणि हायड्रोजन पेरॉक्साइड तयार होते. हायड्रोजन पेरॉक्साइड हा ऑक्सिडायजिंग घटक आहे. ज्याचे विघटन होऊन ऑक्सिजन आणि पाणी तयार होते. हायड्रोजन पेरॉक्साइड चांगला विरंजक (ब्लिचिंग) पदार्थ असला तरी त्याला साधारणपणे ४० अंश सेल्सिअस इतकं तापमान आवश्यक असतं. वॉिशग मशीनमध्ये ही अडचण येत नाही. कारण त्यात तापमान वाढले जाते. कमी तापमानाला ब्लिचिंग प्रक्रिया व्हावी आणि प्रक्रियेचा वेग वाढावा यासाठी त्यात टेट्रा अ‍ॅसिटाइल इथिलीन डायअमाइन घातले जाते.

मनमोराचा पिसारा: गडकऱ्यांची सिंधू
इतकी र्वष झाली तरी ‘एकच प्याला’ या गडकऱ्यांच्या नाटकातल्या ‘सिंधू’ची प्रतिमा मराठी रसिकांच्या मनावर ठसठशीतपणे रेखलेली आहे. सती-सावित्री अनसूयेनंतर पतिनिष्ठेचं उदाहरण म्हणून पतिव्रता सिंधूचं नाव घेते. सिंधू ही नाटकातलं एक पात्र नसून ती ‘आयकॉन’ आहे. अर्थात विशिष्ट मानसिकतेचं किंवा मनोवृत्तीचं. सिंधूचं उदाहरण स्त्रीवादी साहित्यामध्ये बऱ्याचदा आढळतं.
गडकऱ्यांची सिंधू तथाकथित आर्य, भारतीय स्त्रीची प्रतिनिधी म्हणून नाटकात उभी राहते. गडकऱ्यांच्या दृष्टीने ती प्रतीकात्मक आहे, आदर्श नाही!
‘एकच प्याला’मधली ‘गीता’ ही उपनायिका ‘सिंधू’च्या एकनिष्ठेला आवाहन करते. त्या एकमेकांना परस्परविरोधी असल्याने पूरक व्यक्तिरेखा ठरतात. सिंधूमुळे गीता अधिक झळाळते, तर गीतेमुळे सिंधूचे पातिव्रत्य उठावदार होते.
आजच्या घडीला सिंधूची प्रकर्षांने आठवण येण्याचे कारण गडकऱ्यांनी एकनिष्ठतेचे लॉजिकल टोक गाठले तर ते सर्वनाशाला कसे कारणीभूत ठरते, हा विचार मांडला.
सिंधूची एकनिष्ठा फसली कारण ती एका व्यक्तीवर खिळलेली होती. व्यक्ती स्खलनशील असतात, त्या चुकतात. त्यांच्यामध्ये व्यक्तिगत दोष असतात. फक्त अहंभाव हाच दोष नसतो, तर स्वकेंद्रीपणा ही मोठीच खोट व्यक्तीमध्ये असू शकते.
गडकऱ्यांच्या सुधाकरला दारूचे व्यसन असते. त्या व्यसनामुळे तो आपले कुटुंबजीवन उद्ध्वस्त करतो. गडकऱ्यांना व्यसनशीलता हा दोष दाखवायचा असतो.
सुधाकरला दारूचे व्यसन होते, पण व्यसन फक्त दारूचे नसते. पैशाचे, कीर्तीचे, कलासक्तीचे असते. तसे सत्तेचे असते. पैकी सत्तेचे व्यसन सगळ्यात खतरनाक ठरले. सिंधू आणि सुधाकरच्या नातेसंबंधामध्ये फक्त पती-पत्नीचा धागा नाही; असे वाटते. ते नाते नेता-अनुयायी, पिता-मुले असू शकते.
सिंधूला हे कळले नसावे. आणि निष्ठा अखेर कशाशी? या प्रश्नापाशी आपण येऊन थबकतो. निष्ठा व्यक्तीशी, तत्त्वाशी की मानवी मूल्याशी? चाड कशाची बाळगायची प्रेमाची की नीतिमूल्याची? सिंधूने सुधाकर या माणसावर प्रेम केले. प्रेम आंधळे असू शकते. पण मूल्याविषयी वाटणारी निष्ठा डोळस असावी लागते, असलीच पाहिजे. स्खलनशील सुधाकरामधून विकसनशील नीतिवान सुधाकराला प्रेमाच्या सामर्थ्यांने कोरून काढायला हवे होते. तिची निष्ठा डोळस नव्हती.
आपल्या पतीची, मुलांची, कुटुंबाची नीतिमूल्ये ढासळत असतील तर त्यांना (कान धरून) भानावर आणणे ही खरी निष्ठा आहे. जे कुटुंबाला लागू ते अर्थात समाज आणि राष्ट्राला आणि नेत्यालाही लागू आहे.
सिंधूने हे प्रश्न उपस्थित केले, गडकरी मास्तर यांच्या अद्भुत प्रतिभेला सलाम!
डॉ.राजेंद्र बर्वे

प्रबोधन पर्व: पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे – प्रवृत्तिधर्माचे प्रखर पुरस्कत्रे
प्रवृत्तिधर्माच्या प्रचारचे राष्ट्रीय कार्य एक व्रत म्हणून निष्ठापूर्वक अंगीकारणारे जे मोजके व्यासंगीशील लेखक विसाव्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्रात आणि मराठीत झाले, त्यातील सर्वात महत्त्वाचे नाव म्हणजे पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे हे होय. सहस्रबुद्धे यांचा जन्म १९०४ साली पुण्यात झाला. ‘स्वभावलेखन’ या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी पीएच.डी. ही पदवी पुणे विद्यापीठातून मिळवली. पण त्यांनतर मात्र त्यांच्याच लेखनाचा स्वभाव पूर्णपणे बदलून गेला. विज्ञान आणि लोकसत्ता यांवरील डोळस श्रद्धेचा आधार कायम ठेवत भारताचे ऐहिक जीवन बलसंपन्न आणि सुखसमृद्ध कसे करता येईल यासाठी सहस्रबुद्धे यांनी आपली वाणी, विचार आणि लेखणी झिजवली. ‘विज्ञानप्रणीत समाजरचना’, ‘भारतीय लोकसत्ता’, ‘माझे चिंतन’, ‘लोकसत्तेला दंडसत्तेचे आव्हान’, ‘महाराष्ट्र संस्कृती’ या महत्त्वाच्या पुस्तकांचे लेखन सहस्रबुद्धे यांनी केले. या सर्वच पुस्तकांचा त्या काळी चांगलाच बोलबाला झाला. सहस्रबुद्धे यांनी विज्ञानाचा केलेला पुरस्कार आणि लोकशाहीचा घेतलेला कैवार यामुळे अनेक जाणकारांचे लक्ष वेधले गेले. सहस्रबुद्धे यांच्या लेखनात एक प्रकारची धग आणि रग पाहायला मिळते. त्यामुळे त्यांचे लेखन काहीसे अभिनिवेशी वाटते खरे, पण त्यामागे केवळ सत्यविषयी त्यांना वाटत असलेली कळकळ आणि तळमळ हीच प्रेरणा असते. आयुष्यभर प्राध्यापकी पेशा निष्ठेने करणाऱ्या सहस्रबुद्धे यांच्या लेखनात रसाळता आणि लालित्य यांचा सुरेख मेळ पाहायला मिळतो. मराठी भाषेचे विद्यार्थिप्रिय प्राध्यापक, विचारप्रेरक लेखक आणि प्रभावी वक्ते ही त्रिसूत्री सहस्रबुद्धे यांची वैशिष्टय़े म्हणून सांगितली जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक असल्याने सहस्रबुद्धे राष्ट्रवादी विचाराचे पुरस्कत्रे होते. स्वतंत्र भारताच्या सर्वागीण अभ्युदयासाठी समग्र भारतीयांनी प्रवृत्तिधर्माची प्रखर उपासना केली पाहिजे हे सहस्रबुद्धे आग्रहाने सांगत.