पालेभाज्यांचा हिरवा रंगच मुळी डोळ्यांना सुखावणारा असतो. पण पालेभाज्या शिजल्यानंतर त्यांचे उठावदार रंग कुठे नाहीसे होतात कुणास ठाऊक ?  
पानांना हिरवा रंग येतो ते हरितद्रव्यामुळं. हरितद्रव्य वनस्पतीच्या पेशीमध्ये असतं. वनस्पतींत पेशीआवरणाच्या भोवती सेल्युलोजची पेशीभित्तिका असते. या पेशीभित्तिकेमुळेच पेशीला आधार आणि आकार मिळत असतो. पेशीभोवती हवेचा थरही असतो. हरितद्रव्याच्या मध्यभागी मॅग्नेशिअमचा अणू असतो. त्याच्यामुळे हरितद्रव्य तेथे तोलून धरलं जातं. मॅग्नेशिअमचा अणू तेथून गेला, तर हरितद्रव्य कोलमडून पडतं.  
जेव्हा आपण भाजीला उष्णता देतो. तेव्हा ती प्रथम पेशीभोवतीच्या हवेच्या थराला मिळते. हवा प्रसरण पावते आणि तेथून निसटून जाते. साहजिकच पेशीच्या आतलं हरितद्रव्य अधिक स्पष्ट दिसायला लागतं. भाजीला जराशी उष्णता दिली की भाज्या चमकदार हिरव्या दिसतात ते यामुळेच. भाजीला अधिक उष्णता देत गेलं की उष्णता हरितद्रव्याला मिळायला लागते. नाजूक हरितद्रव्यातील बंध उष्णतेमुळे तुटायला लागतात आणि पालेभाजीचा रंग मळकट हिरवट येतो.  
भाजी हिरवीच दिसायला हवी असेल तर हरितद्रव्यापर्यंत उष्णता पोहोचूच द्यायची नाही. हे कसं जमायचं? भाजी मंद आंचेवर शिजवली किंवा वाफेवर शिजवली, तर हे शक्य आहे. या वेळी तापमान जास्त नसतं. भाजीला दिलेली उष्णता सगळीकडे पसरली की हरितद्रव्यावर त्याचा फारसा परिणाम होत नाही आणि भाजीचा रंग विटका होत नाही.    
पालेभाजीचा रंग आम्लामुळेही बदलतो. उष्णतेमुळं पालेभाजीतली आम्ल सुटी होतात. त्यांची हरितद्रव्याशी क्रिया झाली की तेथील मॅग्नेशिअमची जागा हायड्रोजनचे अणू घेतात. यामुळे फिओफायटिन नावाची रसायनं तयार होतात. त्याचाच विटका रंग भाजीला येतो. बाहेरून टाकलेल्या आम्लामुळेही हे होतं. म्हणूनच पालेभाज्यांत िलबाचा रस किंवा चिंचेचा कोळ टाकत नाहीत. अर्थात अळूसारख्या भाज्यांत चिंच टाकली जाते, ती वेगळ्या कारणासाठी. पण त्यामुळे अळूच्या भाजीचा रंग पार बदलून जातो, हे आपण पाहतोच.
आम्लाच्या ऐवजी अल्कली टाकलं    तर ..?  जर भाजीत खाण्याचा सोडा टाकला तर भाजीचा रंग छान हिरवा राहील, पण पेशीच्या सेल्युलोजची पार मोडतोड होऊन भाजीचा लगदा बनेल. अशी भाजी खायला आवडेल?   

मनमोराचा पिसारा: फुलांचे धबधबे जणू
ग्रीष्म ऋतू म्हणजे सर्वत्र फुललेली झाडं, झुडपं आणि वृक्ष. एप्रिलच्या सरत्या काळात रुबाबदार अमलताश आपला पुष्पसंभार अंगावर खेळवत ठाम उभा राहतो. त्या फुलांचा तजेलदार फिका पारदर्शी पिवळा रंग सगळा आसमंत सुवर्णमय करून टाकतो. अधूनमधून मळभणाऱ्या आकाशाच्या पाश्र्वभूमीवर अमलताश विशेष खुलून दिसतो.
अमलताश गुलमोहराच्या आगमनाची ललकारी देतो.
अमलताशाच्या जोडीनं शहरात अधूनमधून इथे तिथे पळस दिसतो. त्याची गडद लाल फुलं फांदीवर फुललेल्या अंगाराच्या चंद्रकारी आहेत, असं वाटतं.
फुलांच्या उधळणीमध्ये त्या मानानं दुर्लक्षित राहते ती बोगनवेल.
मित्रा, आपल्या उष्णकटिबंधात जागोजागी बोगनवेली फुलानं डवरलेल्या दिसतात.
दक्षिण गोव्याच्या पोर्तुगीज वळणाच्या लहानमोठय़ा ‘विलां’च्या समोर बोगनवेली ठाण मांडून आपले रंग मुक्तपणे पसरतात. ‘माझ्या गोव्याच्या भूमीत’ कवितेमध्ये ‘चाफा पानाविन फुले’ म्हणून देवचाफ्याचं कौतुक केलंय. बोगनवेलीचा बहराची मात्र दखल घेतलेली नाही. बोगनवेलीला त्याची फिकीर नाही. बारा महिने फुलं अंगाखांद्यावर मिरविणारी बोगनवेल उन्हाळ्यात विलक्षण बहरते.
बोगनवेल दक्षिण अमेरिकेची माहेरवाशीण.  युरोपातल्या दर्यावर्दीनी आपापल्या भाषा, वेश याबरोबर विविध भागांतून झाडं आणि फुलं यांची सर्वत्र आयात केली तेव्हापास्नं बोगनवेलीनं उष्ण आणि दमट प्रदेशात आपलं बस्तान मांडलं.
बोगनवेलीची गंमत अशी की, त्याची झाडं होतात, झुडपं होतात, अगदी बोनसायही होतात, पण मूळ प्रवृत्ती वेलीची आहे म्हणून नाजूक-साजूक नाही. अतिशय काटक प्रवृत्ती. थोडय़ा पाण्यावर मनमुराद वाढते. क्षारयुक्त जमीन असली तरी त्याची क्षिती नाही. झाडावर पडणाऱ्या कीटक अळ्या, किडे आणि बुरशींना झुगारण्याची प्रतिकारशक्ती बोगनवेलीच्या डीएनएमध्ये असते.
फुलांचे रंग तर केवळ लुभावणारे. शुभ्र पांढरा, भगवा, केशरी (पिवळटपणाकडे झुकणारा), गुलाबी असे अनेक. त्यांच्यात अनेकविध छटाही आढळतात. भरगच्च फुललेल्या बोगनवेलीवरून फुलं ओसंडून वाहतात. एखाद्या बंगल्याच्या आसपास अशा रीतीने फुललेली बोगनवेल म्हणजे फुलांचे जणू धबधबे!! निसर्गाची किमया म्हणतात ती अशी.
बाय द वे, बोगनवेलीच्या फुलांच्या पाकळ्या या पाकळ्या नव्हेत. ती रूपांतरित पानं. फुलांच्या मध्यभागी दिसणारं चिमुकलं पांढरं फूल तेच खरं!! गंमत आहे ना!! फुलता फुलता फसवलं की आपल्याला!!
डॉ.राजेंद्र बर्वे

Two houses destroyed, cylinder explosion,
देव तारी त्याला कोण मारी… सिलिंडरच्या स्फोटात दोन घर खाक, तान्हुले बाळ बचावले
Arvind Kejriwal Mango eating Controversy How Much Calories and Sugar Does One Mango has
केजरीवालांनी आंबा खाल्ल्याने वाद; डायबिटीक रुग्णांनी आंबा खाल्ल्याने काय होईल? १ वाटी आंब्यात काय दडलंय, बघा
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
alibag mother killed her two kids marathi news
माता नव्हे तू वैरीणी! विवाहबाह्य संबंधांत अडथळा ठरलेल्या २ चिमुकल्यांचा आईनेच घेतला जीव

प्रबोधन पर्व: निष्ठावान गांधीवादी- आचार्य  भागवत
आचार्य स. ज. भागवत  हे महात्मा गांधी यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांपकी एक. काका कालेलकर, दादा धर्माधिकारी, शंकरराव देव, अण्णा सहस्रबुद्धे, अप्पासाहेब पटवर्धन आणि भागवत यांनी महात्मा गांधी यांची तत्त्वे व कार्यक्रम स्वीकारून आयुष्यभर त्यांचा हिरिरीने प्रचार व प्रसार केला. या गांधीवादी कार्यकर्त्यांमुळेच गांधीतत्त्वविचार व त्यावर आधारलेले रचनात्मक काम हे भारतीय जनमानसात खोलवर रुजण्यास मदत झाली. महाराष्ट्रामध्ये आचार्य भागवत यांनी गांधीतत्त्व व विचार रुजवण्यात मोलाची भूमिका निभावली आहे. त्यांचे समग्र साहित्य ‘आचार्य संकलित वाङ्मय खंड पहिला व दुसरा’ या नावाने साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केले असून त्यांचे संपादन अच्युत केशव भागवत यांनी केले आहे. भागवत यांनी केवळ सत्याग्रही तत्त्वज्ञानाचाच  प्रचार केला नसून समाजवादाची मूलभूत तत्त्वेही जनसामान्यांपर्यंत पोहोचवून महाराष्ट्राचे आपल्या परीने प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला.  आचार्य भागवत यांचा केवळ अध्यात्म, शिक्षण, नीतिमूल्ये यांचाच अभ्यास नव्हता, तर इस्लाम धर्म, अध्यात्म आणि विज्ञान यांचे परस्परसंबंध, स्त्रीचे समाजातील स्थान, ध्येयवाद, समाजधारणेची नवीन मूल्ये, मानवनिष्ठा व मानवप्रेम या विषयांवरही त्यांनी महत्त्वपूर्ण लेखन केले आहे.  घरोघर जाऊन खादीची विक्री करणे, कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण, चळवळी, आंदोलन यांमधील त्यांचा सहभागही लक्षणीय म्हणावा असाच आहे. भागवत यांनी जसे लेखनाला महत्त्व दिले, तसेच कार्यकर्त्यांची नवी पिढी घडवण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. भागवत यांच्या उक्ती आणि कृतीमध्ये एक तऱ्हेचा सडेतोडपणा, फटकळपणा आणि सुस्पष्टता होती. त्यामुळे वरकरणी त्यांचा स्वभाव काहीसा विक्षिप्त वाटत असला, तरी त्यांच्या व्यासंगाची नि चौफेर विद्वत्तेची प्रचीती त्यांच्या लेखनातून आल्याशिवाय राहत नाही.