वस्त्र संस्कृतीच्या गेल्या तीन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास वाचताना तीन तंतूंचा उल्लेख अनिवार्यपणे वारंवार येतो. हे तीन तंतू म्हणजे कापूस, लोकर आणि रेशीम. यातही  नसíगक आणि वनस्पतीजन्य मुबलकता यामुळे कापसाला तंतूंच्या राजाचा सन्मान मिळतो. पुढील कारणांमुळे कापसाला हा सन्मान मिळाला आहे.
१) ऑस्ट्रेलिया, आशिया, युरोप, आफ्रिका आणि अमेरिका पाचही खंडांत कापसाचे मुबलक प्रमाणात उत्पादन घेतले जाते, अशा प्रकारचा हा एकमेव तंतू आहे.
२) नसíगक आणि मानवनिर्मित तंतूंपासून बनवलेल्या वस्त्रनिर्मितीत अनेक वर्षे कापूस अग्रगण्य आहे.
३) कताई, धुलाई, विणाई, रंगाई, छपाई या सर्व प्रक्रिया कापसावर सुलभतेने पार पडतात.
४) कापसापासून बनवलेले कापड हे आíथकदृष्टय़ा सर्व प्रकारच्या उत्पन्न वर्गासाठी वाजवी किमतीत उपलब्ध होऊ शकते.
कापसाने व्यापलेले क्षेत्र, वाढीव अंतिम उत्पादन, सातत्याने वाढणारी उत्पादन क्षमता, सतत वाढीव वापर व उपभोग्यता या सर्व कारणांमुळे कापसाला हा सन्मान मिळाला आहे.
आता तर रंगीत कापूससुद्धा उत्पादनात अग्रेसर आहे. या सर्व कारणांमुळे कापसाला तंतूंचा राजा म्हणणे किती समर्पक आहे, हे लक्षात येईल. कापूस हा वनस्पतीजन्य तंतू आहे. साहजिकच कापसाचे गुणधर्म मातीचा कसदारपणा, पर्जन्यमान आणि पाणीपुरवठय़ाची परिस्थिती या घटकांवर अवलंबून असतात. कापसाचे उत्पादन पाचही खंडांत होत असल्यामुळे या घटकांमध्ये विविधता आढळते. त्यामुळे कापसाच्या गुणधर्मातही फरक पडतो. या गुणधर्मानुसार कापसाच्या जाती हब्रेरियम, हब्रेसियम, हिसुर्तम आणि बर्बादेन्से या चार वर्गात विभागल्या जातात. हब्रेरियम जातीतील कापूस कमी लांबीचा आणि जाडाभरडा असतो आणि बर्बादेन्से या वर्गातील कापूस जास्त लांबीचा आणि तलम असतो. ही विविधता हे कापसाचे वैशिष्टय़ आहे, पण त्यापासून वस्त्रनिर्मिती हे आव्हान आहे. शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांनी अविरत परिश्रम करून हे आव्हान स्वीकारले आहे.   

संस्थानांची बखर: ‘कंपनी सरकार’चा राज्यविस्तार  
प्लासीच्या लढाईनंतर भारतीय प्रदेशामध्ये सत्ता स्थापन करणे हेच ध्येय ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीने ठेवले. शेकडो देशी राज्यांच्या आपसातील झगडय़ांचा फायदा उठवीत कंपनी सरकारने आपली कूटनीती आणि सनिकी शक्ती वापरून १७५७ ते १८५६ या शतकभरात भारताच्या निम्म्याहून अधिक भूप्रदेशावर ताबा बसविला. एक- एक टप्प्याने भारतातील बहुतेक देशी राज्ये प्रथम कंपनी सरकारात व नंतर बिटिश साम्राज्यात सामील केली गेली.
त्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी  निरनिराळ्या पद्धतींचा अवलंब केला. प्रथम त्यांनी काही राज्यांमध्ये कुरबुरी वाढवून त्यांच्यावर सरळ आक्रमण करुन ती राज्ये कंपनी सरकारात सामील केली.  सन १७५६ पर्यंत कर्नाटक आणि तंजावर हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधीन झाले होतेच १७५६  ते १७९८  या काळात प्रबळ मराठे, अफगाण आणि म्हैसूरचे शासक यांच्या आक्रमणांपासून स्वतचे रक्षण करण्यासाठी अनेक लहान राज्ये कंपनीच्या स्वाधीन झाली.
या राज्यांपकी काहींनी संरक्षणाचा करार करण्याचा मार्ग पत्करला,  तर काही कंपनी सरकारात विलीनच झाली असली तरी शासकांचे काही अधिकार कंपनीने मान्य केले. अशा  प्रकारे अधीन झालेल्या देशी राज्यांना ब्रिटिश लोक ‘प्रिन्सली स्टेट्स’ म्हणत तर भारतीय लोक ‘संस्थान’, ‘रियासत’, ‘देशी रियासत’, ‘राजसी रियासत’ अशा नावांनी संबोधत.
सुनीत पोतनीस –  sunitpotnis@rediffmail.com