गोरं करणाऱ्या क्रीम आणि गोरं करणाऱ्या साबणांचा खप फार मोठय़ा प्रमाणात होतो. त्वचेला रंग कशामुळे येतो? आपल्या त्वचेमधील मेलेनॉसाइट पेंशींमधून स्त्रवणाऱ्या मेलॅनिन या रंगद्रव्यामुळे त्वचेला रंग प्राप्त होतो. खरं तर याच मेलॅनिनमुळे आपल्या त्वचेला अतिनील किरणांपासून सुरक्षा मिळते म्हणूनच शास्त्रीयदृष्टय़ा सावळी त्वचा असणं ही एक निसर्गाने आपल्याला दिलेली भेट आहे. ज्या लोकांमध्ये मेलॅनिन कमी प्रमाणात तयार होते त्यांच्या त्वचेचा रंग  गोरा असतो. प्राणी पेशींमध्ये टायरोसिन नावाच्या विकरामुळे मेलॅनिन (रंगद्रव्य) तयार होण्याचं प्रमाण ठरतं. टायरोसिनप्रतिबंधक रसायनांमुळे मेलॅनिन (रंगद्रव्य) तयार होण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्वचा उजळते.
गोरं करणाऱ्या साबणांमध्ये मेलॅनिन (रंगद्रव्य) कमी करणाऱ्या विविध रसायनांचा वापर केला जातो. यासाठी हायड्रोक्विनोन, कोजीक आम्ल, हायड्रोजन पेरॉक्साईड, ग्लुटॅथायोन, अल्फा हायड्रॉक्सी आम्ल जसे लॅक्टिक आम्ल, सायट्रिक आम्ल आणि ग्लायकॉलिक आम्ल, अ‍ॅसकॉर्बकि आम्ल म्हणजेच जीवनसत्त्व ‘क’, अल्फा टोकोफिरॉल (जीवनसत्त्व ‘ई’), अल्फा लिपॉइक आम्ल, निआसिनामाईड ही रसायने साबणांमध्ये वापरली जातात.  
भारतात पूर्वीपासूनच गोरं होण्यासाठी केशर, हळद, दही, बेसन, चंदन, िलबू आणि मध अशा अनेक पदार्थाचा वापर होत आहे. दह्य़ामधील लॅक्टिक आम्ल, िलबूमधील जीवनसत्व ‘क’ ही रसायने मेलॅनिनचं प्रमाण कमी करून त्वचा उजळण्यास मदत करतात. केशरातील क्रॉसिन नावाच्या रसायनामुळे त्वचा उजळते.
हायड्रोजन पेरॉक्साइड, मध आणि िलबू यांच्या वापराने त्वचा ब्लीच (विरंजन) होऊन उजळते. पण हा परिणाम तात्पुरता म्हणजे काही काळापुरताच असतो. मधामध्ये शर्करेबरोबरच ग्लुटॉनिक, लॅक्टिक, ब्युटेरिक अशी अनेक आम्लं असतात त्यामुळे त्वचा उजळण्यास मदत होते. काही रसायनांचा वापर एकत्रित केला जातो, जसं िलबू आणि मध. काही फळांच्या रसांचा किंवा लगद्याचा वापर त्वचा उजळण्यासाठी केला जातो. या फळात असणारी रसायनं त्वचा उजळवतात.
 
मनमोराचा पिसारा: पुकारे तेरी परछाईयाँ
कैसी तेरी खुदगर्जी, ना धूप चुने ना छांव
कैसी तेरी खुदगर्जी, किसी थोर टिके ना पाव
बनलिया अपना पैगंबर, तर लिया सात समंदर
फिर भी सूखा मन के अंदर क्यू रेह गया
रे कबिरा मान जा, रे फकिरा मान जा
आजा तुझ को पुकारे तेरी परछाइयाँ
रे कबिरा मान जा, रे फकिरा मान जा
कैसा तू है निर्मोही, कैसा हरजाइया
टूटी चारपाई वही, ठंडी पुरवाई रास्ता देखे
दूधों की मलाई वही, मिट्टी की सुराही रास्ता देखे
कैसी तेरी खुदगर्जी, लब नमक रमे ना मिसरी
कैसी तेरी खुदगर्जी, तुझे प्रीत पुरानी बिसरी
मस्त मौला, मस्त कलंदर
तू हवा का एक भवंडर
बुझ के यू अंदर ही अंदर
क्यू रह गया,
आजा तुझ को पुकारे तेरी परछाईयाँ
कैसा तू है निर्मोही, कैसा हरजाईया
(संगीत : प्रीतम, गीतकार : अमिताभ भट्टाचार्य
चित्रपट  :  ये जवानी है दिवानी
कलाकार : दीपिका पडुकोण, रणबीर कपूर , रेखा भारद्वाज, तोची रैना)
थेट सुफियाना अंदाजाची आठवण करून देणारं हे गाणं खोलवर हाक मारतं.
असं वाटतं, कोण्या एका कलंदर भटक्या माणसाच्या प्रेमात पडलेल्या एखाद्या विरही रागिणीने त्या निर्मोही, खुदगर्ज प्रेमिकाला साद घातलीय. प्रेमाच्या आणाभाका झाल्या असतील, प्रणयाचे संकेत दिले घेतले असतील, पण काश! हवेच्या हलक्या झुळुकेसारखा मनात उमलणारा हा ‘फकिरा’, हा आत्मकेंद्री भँवरा, अचानक येणाऱ्या वावटळीसारखा आला नि गेला. मनात दाटून राहिली ती त्याची सय, आसक्त नजर आणि सहवासाची लगन.
ती त्याला आता हाक घालते आहे, तिच्याकडे देण्यासारखं आता फक्त एकच आहे ती स्वत:! अशा अलवार भावना मनात तरंगांसारख्या उमटल्या आणि आत्ममग्नतेच्या गर्द गहिऱ्या एकांतात ती गात राहिली. त्या अनुरक्त प्रणयिनीच्या भावना माझ्याही मनात गुंजत राहिल्या.
गाण्यातले शब्द अतिशय मोजके आणि बोलके आहेत. गाण्याची पेशकश आर्त. या गाण्यानं मला स्तब्ध केलं. पुरुष आणि स्त्री, नर आणि नारी यांच्या नातेसंबंधांमधला नाजूक पदर इथे प्रतीत होतो. स्त्री प्रेमाच्या बांधीलकीशी एकनिष्ठ असते, तर पुरुष स्वकेंद्री आणि ‘जोग्या’सारखा निर्मोही. पुढे गाण्यात म्हटलंय की तुझ को पुकारे तेरी परछाईयाँ! पुरुष आणि स्त्रीच्या नातेसंबंधांच्या ‘अतीत’मधली ही परछाई आहे आणि इथेच या गाण्यातला सुफियाना अंदाज जिव्हारी पोहोचतो.. तो पुरुष प्रियकर नाहीये, तू सनम भी है, खुदा भी है!
 मित्रा, डोळे मिटून गाणं ऐक, ‘ पुकार’ तुलाही ऐकू येईल..
 पुकारे तेरी परछाईयाँ!
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व: आधुनिक महाराष्ट्रातील तीन दास्ये
‘‘राजकारणातील टिळकांची राजवट संपली आणि थोडय़ा फार वर्षांच्या अंतराने तीन निरनिराळे मतपंथ महाराष्ट्रात उद्भवले. एक गांधींचा पंथ, दुसरा रशियावाद्यांचा पंथ, आणि तिसरा रा. स्व. संघाचा पंथ.. या तीनही पंथांनी तीन प्रकारची दास्ये महाराष्ट्रात रूढ केली आहेत, असे माझे मत आहे.. मी सामान्य जनसमूहाविषयी बोलतच नाही. महाराष्ट्रातील बुद्धिमान वर्गात हे दास्य उत्पन्न झाले, पोसले व अजून शिल्लक आहे.’’ असे सांगत श्री. म. माटे ‘आधुनिक महाराष्ट्रातील तीन दास्ये’ या लेखात ती क्रमवार नोंदवतात –
‘‘शेकडो ‘बुद्धिमान’ महाराष्ट्रीय असे आहेत की, गांधींचे सर्वाधिकारित्व, त्यांचे ते सूक्ष्म सत्यान्वेषण, त्यांचा आतला आवाज, त्यांची दैवी संपत् जी अहिंसा ती, त्यांचे उपासतापास, त्यांच्या प्रार्थना, त्यांचा विरागी वेष, या सर्वावर (त्यांची) मनापासून श्रद्धा आहे. या लोकांविषयी मी बोलत आहे. साधा समाज तर भाबडाच आहे. त्याने व यांनी मिळून महात्माजींना मोठाच आधार उत्पन्न करून दिला. महाराष्ट्रातील लोकांनी आपली तर्कबुद्धी विसरावी आणि असल्या गोष्टींवर परमार्थाने श्रद्धा ठेवावी हे खरे खरे दास्य आहे.
‘‘दुसरे दास्य रशियाच्या अभिमानी लोकांत वसलेले दास्य होय.. बुद्धिमान लोक, आणि ते मतभेद दाखविनात, किंवा विकल्प सुचविनात. किंवा मतांतरे काढीनात, तर ते बुद्धिमान कसले! खुद्द रशियात जर नाना तऱ्हांचे विकल्प उत्पन्न होत राहिले आहेत तर ते यांना का कधी सुचू नयेत? हेही एक दुष्ट दास्यच आहे.
‘‘तिसरे दास्य रा. स्व. संघाच्या पंथाने उत्पन्न केलेले दास्य होय.. देशात होणाऱ्या शेकडो प्रश्नांची माहिती या तरुणांना करून देणे व त्यांसंबंधीची संघाची भूमिका त्यांच्या मनात कायम करणे हे संघाने योजनापुरस्सर केले पाहिजे, ते संघ करीत नाही. त्या तरुणांना तो नुसते ‘हो’ म्हणावयास लावतो. हे दुष्ट दास्य आहे.. माझ्या ओळखीचेच कितीतरी तरुण लोक आहेत, की जे संघाचे अभिमानी असूनही त्यांना आपली वाढ पुरी होत नाही असे वाटते.’’

Fatty Liver Can Happen Without Drinking Alcohol Check These Changes Signs
मद्यपान न करताही होतो फॅटी लिव्हर; भूक, लघवीचा रंग व त्वचेसह ‘या’ ८ बदलांमधून शरीर देतं संकेत, उपचार काय?
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….