News Flash

कुतूहल: फायबर ग्लास

सिमेंट काँक्रीटमध्ये लोखंडी सळ्या टाकून मजबुती प्राप्त केली गेली. याच प्रमाणे प्लास्टिकवर प्रयोग सुरू झाले.

| July 26, 2014 06:20 am

सिमेंट काँक्रीटमध्ये लोखंडी सळ्या टाकून मजबुती प्राप्त केली गेली. याच प्रमाणे प्लास्टिकवर प्रयोग सुरू झाले. अनेक प्रयोगांनंतर ‘पॉलिएस्टर’ या प्लास्टिकच्या प्रकारात काचेचे धागे वापरून पाहिजे तशी मजबुती प्राप्त झाली व १९३०च्या सुमारास काचतंतू युक्त प्लास्टिक (ग्लास रिइनफोस्र्ड प्लास्टिक) निर्माण झाले. यालाच ‘एफआरपी’ या नावानं आपल्या देशात ओळखलं जातं, तर जगात इतरत्र मात्र ‘जीआरपी’ म्हणजेच ‘ग्लास रिइनफोस्र्ड प्लास्टिक’ या नावानं हा पदार्थ ओळखला जातो. वजनाला अ‍ॅल्युमिनिअम इतपत हलकं पण पोलादासारखं मजबूत, गंजण्याचा प्रश्नच नाही. सर्व प्रकारच्या हवामानाला, समुद्राच्या खाऱ्या पाण्यालासुद्धा वषरेनुवष्रे तोंड देऊन टिकाव धरणाऱ्या या पदार्थानं क्रांती करून टाकली.
काचतंतू म्हणजे प्रत्यक्ष काचेचे धागेच. अती उच्च उष्णतामानावर सिलिका हा पदार्थ(काच) वितळवून प्लॅटिनमच्या सूक्ष्म साच्यातून काचेचे धागे ओढले जातात. नारळाच्या दोरीला ज्याप्रमाणं पीळ द्यावा त्याप्रमाणं पीळ दिला जातो. या पदार्थाचा वितळणांक कमी करण्यासाठी सोडा अ‍ॅश (सोडिअम काबरेनेट) आणि चुनखडी (कॅल्शिअम काबरेनेट) वापरतात, तर रसायनविरोधक गुणधर्म वाढविण्यासाठी बोरॅक्स वापरतात. अशा रीतीनं तयार झालेल्या धाग्यांना निरनिराळ्या पद्धतीनं विणून चटई किंवा तागा तयार होतो. यानंतर पॉलिएस्टर या प्लास्टिकमध्ये फायबर ग्लास गुंफलं जातं. हे पॉलिएस्टर ‘डायबेसिक अ‍ॅसिड व डायबेसिक अल्कोहोल यांच्या संलग्नतेतून तयार होतो. स्टायरिन मोनोमर या द्रवरूप रसायनात त्याला विरघळवून ‘पॉलिएस्टर’ रेझिन तयार होतो. हे तेलासारखं रेझिन हार्डिनग एजंटच्या सहाय्यानं ठरावीक वेळेत कठीण दगडरूप बनू शकतं. अशा रीतीनं तयार केलेले हे दोन पदार्थ कुठल्याही आकाराच्या साच्यावर एकत्र आणून पसरल्यास काही ठरावीक वेळेनंतर त्याच आकारात कठीण होतात व साच्यातून ठरावीक आकाराची वस्तू तयार होते.  पाहिजे तो रंगही त्यात मिसळता येतो.
फायबर ग्लास हा वीजप्रवाह रोधक आहे, शिवाय बऱ्याचशा अ‍ॅसिडचा यावर परिणाम होत नाही. या गुणधर्मामुळे या पदार्थाचा इलेक्ट्रिक, केमिकल उद्योगातही उपयोग होऊ लागला. आखाती देशांतून पेट्रोलियम रसायनं साठविण्यासाठी प्रचंड आकाराच्या फायबर ग्लासच्या टाक्या बनविल्या आहेत.

मनमोराचा पिसारा ‘नोबल हाऊस – ’ रंजक, उत्कंठावर्धक!
सहज प्रवास करता करता चाळायचं असेल, झोप येण्यासाठी डोळ्यांसमोर धरायचं असेल तर ‘नोबल हाऊस’ या हजार पानी कादंबरीच्या भानगडीत पडू नये. पुस्तकाच्या खनपटी बसून, त्यातले प्रसंग, नाटय़ आणि कथा चघळत चघळत वाचायचं असेल तर ही उत्तम रंजक कादंबरी आहे.
१९६३ चा काळ. हाँगकाँग हे ब्रिटिशांच्या आधिपत्याखालचं शहर. मुंबईच्या एकचतुर्थाश. बाकी कॉस्मॉपॉलिटन, बंदर, आर्थिक उलाढालींचं केंद्र असणं ही तुलना सोडून कादंबरीत सूर मारून उतरायचं.
कथानक थोडक्यात सांगण्यासारखं नाही. इयान डनरॉस हा कादंबरीचा कथानायक. त्याची सर्वात जुनी ट्रेडिंग कंपनी डबघाईला आलेली असताना एका वादळी रात्री गोष्टीला सुरुवात होते. ‘डनरॉस’ला तायपान (मुख्य बॉस) हे पद मिळतं आणि संकट मालिकांना सुरुवात होते. नोबल हाऊसचा ताबा मिळविण्यासाठी त्याचा प्रतिस्पर्धी टपलेला असतो. भरीसभर म्हणून एका अमेरिकन धनाढय़ाला कंपनी ओव्हरटेक करायची असते.
ही या कादंबरीची मूळ चौकट. परंतु, ही कादंबरी नोबल हाऊसची म्हणजे त्या फक्त पात्रांची नव्हे. प्रत्येक पात्राला खोली नि उंची आहे. मैत्रीला इतिहास आणि वैराला वारसा आहे. प्रत्येक  पात्रामागे अनेक लहान सब-प्लॉट आहेत. प्रत्येकाची स्वतंत्र मजबुरी आणि मग्रुरी आहे.
पुन्हा काळ साठीच्या पूर्वभागातला. त्यामुळे शीतयुद्धाचे पडघम वाजत आहेत. रशिया आणि अमेरिका यांचे हस्तक, हेर, व्यापारी आहेत. नोबल हाऊसमध्ये बिनबोभाट वावरून इकडची माहिती तिकडे करणारे औद्योगिक एस्पिओनान्चं जाळं आहे. चोर आहेत, कंगाल आहेत. भंगार उचलणाऱ्या चाकरांना घबाड लागण्याच्या गोष्टी आहेत. यातील काही रहस्य तर वाचकांना कळतात, पण कादंबरीतील पात्रांना शेवटपर्यंत उलगडत नाहीत.
यामध्ये ‘चीन’ची साम्राज्यवादी भूमिका आहे, पण चुपके चुपके. या सर्वाची चोख माहिती ठेवणारं ब्रिटिश एमआय फाइव्ह आहे. चिनी पात्रं आहेत. त्यातल्या एका पात्राचं खरं आणि संपूर्ण नाव आपल्याला काय पण इतर पात्रांनाही शेवटपर्यंत कळत नाही. त्याचं नाव असतं ‘फोर फिंगरवु’.
कादंबरी संपते तेव्हा असं वाटतं की आता तर खरी सुरुवात झालीय. पुढं बरंच काही घडणार आहे. अखेर या कादंबरीतलं अत्यंत गुंतागुंतीचं पात्र ठरतं ते म्हणजे ज्या छोटय़ाशा शहरात ही गोष्ट घडते ते हाँगकाँग शहर. त्यातले रस्ते, गल्ल्या, छोटी दुकानं, चिल्लर उद्योग करणारे व्यापारी, तिथल्या फेरी बोटी आणि अर्थात तिथला निसर्ग.
समुद्राच्या भरती-ओहोटी तर सामान्य, पण मोठी वादळं-चक्रीवादळं यांनी कथा पुढे जाते. अशातच अतिश्रीमंत लोकांच्या तरंगत्या बोटीतील रेस्तराँला आग लागते. तिथले बचावकार्य, डनरॉस आणि त्याचा प्रतिस्पर्धी क्विंटन ग्रॉट यांची भेट, सारंच खिळवून ठेवतं.
बोटीतली आग काहीशी मानवनिर्मित तर हाँगकाँगच्या मुख्य भागात दरड कोसळणं, मातीचे ढिगारे तयार होणं, इमारत जमीनदोस्त होणं, त्यात अडकलेले खलनायक आणि या वादळी पाश्र्वभूमीवर इयान डनरॉसच्या डोक्यावर टांगलेली ‘टेक ओव्हर’ची तलवार..
मी ही कादंबरी वाचून वीस-पंचवीस र्वष झाली, पण तिचा मनावर कायमस्वरूपी ठसा उमटलाय. कादंबरी पुन्हा उजळली याची दोन कारणं, ‘नोबल हाऊस’ नावाची मिनी सीरियल टीव्हीवर गाजली. प्रत्यक्ष चित्रण, पात्रांची अचूक निवड आणि उत्कंठावर्धक मांडणी होती. पण त्यात पिअर्स ब्रॉस्ननला प्रथम प्रमुख भूमिका मिळाली होती. देखणा, आक्रमक, धूर्त, इयान डनरॉस ओरिजिनल आहे असं वाटतं. ही सीरिज साधारण ८७-८८ सालातली. इथलं हाँगकाँग १९८० सालचं. कादंबरीच्या तोडीस तोड मांडणी होती.
कादंबरी पुन्हा भेटली. डिजिटल पुस्तकांच्या नव्या जमान्यात. ‘नोबल हाऊस’ ऑडिओ फॉर्ममध्ये ऐकायला मिळते. कादंबरीतलं इंग्लिश (लिखित/बोली) तीन-चार प्रकारचं, स्कॉटिश, अमेरिकन, ऑस्ट्रेलियन आणि चिनी अ‍ॅक्सेंटचं इंग्लिश. वाचणारा तो माहोल, भाषा आणि स्वभाव यांचं रेखाटन अत्यंत श्राव्य आहे. रसिकांनी अजिबात सोडू नये, अशी ही कादंबरी.

प्रबोधन पर्व  अद्वैताच्या अमानुष कल्पना हेच मराठी साहित्याच्या अध:पाताचे खरे कारण
‘‘धार्मिक ग्रंथांचा आदर करणे हे ठिक आहे, पण या सर्व प्राचीन ग्रंथांना दोन बाजू आहेत, त्यात अनेक गोष्टी चांगल्या आहेत तर अनेक गोष्टी पूर्णपणे कालबाह्य़ झालेल्या आहेत.. समानता, भावनात्मक एकता व सोज्वळ मानवता यांचा संदेश देणाऱ्या ध्येयवादी साहित्याची आज गरज आहे. तसेच ते मुलाच्या मनाची, मेंदूची व मनगटाची मजबूती करील तेच खरे साहित्य.. भौतिक संसारातील वास्तविक समस्यांवर भारतीय साहित्यिक आपले लक्ष केंद्रीत करीत नाहीत; तोपर्यंत आमच्या साहित्याचा विकास होत नाही. पायाखालची जमीन सोडून केवळ आकाशातील काल्पनिक शक्तीवर श्रद्धा ठेवलेले अभंग, ओव्या व आर्या रचने मानवी उद्धाराचे साहित्य नव्हे. खरे काव्य मानवी संसार व व्यवहार यात आहे. प्रत्यक्ष संसारातील वास्तविक सुखदु:खाची उकल समाजाला दाखवून द्या, म्हणजे तुमच्या उद्धाराचा जिवंत प्रवाह तुमच्या वाङ्मयातून वाहू लागेल.’’
डॉ. पंजाबराव देशमुख साहित्यिकांना जीवनाभिमुख होण्याचा सल्ला देत साहित्याबाबतचे आक्षेप नोंदवताना म्हणतात –
‘‘मानवी भावना, संवेग, उपजत प्रेरणा आणि मानवी संसार हे काव्याचे विषय टाकून भारतीय मन अपौरुषेय विश्वात विहार करायला लागले म्हणून भारतीय वाङ्मयाने मानवी मनाचा ठाव घेणं बंद केलं.. जगाच्या उत्पत्तीसंबंधी गृहित धरलेल्या अद्वैताच्या अमानुष कल्पना हेच मराठी साहित्याच्या अध:पाताचे खरे कारण आहे.’’
..तर कलावंत आणि कलेविषयी म्हणतात –
‘‘कलावंतांची कला कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.. कलेचा दुरुपयोग कष्टकरी समाजाचे शत्रू अध्यात्माच्या क्षेत्रात सतत करीत आले.. सांस्कृतिक परिवर्तनासाठी ललितकलांएवढे प्रभावी माध्यम नाही, म्हणून कलेच्या विकासात सांस्कृतिक परिवर्तनाची बीजे दडलेली आहेत..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2014 6:20 am

Web Title: curiosity fiberglass
टॅग : Curiosity
Next Stories
1 कुतूहल: खाण्यासाठी योग्य तेल
2 कुतूहल: कोलेस्टेरॉल आणि तेल
3 कुतूहल – वनस्पती तेलापासून तूप
Just Now!
X