तंतूच्या वर्गीकरणानंतर सर्वच तंतूंपासून वस्त्रनिर्मिती का होऊ शकत नाही, याबद्दल आपल्या मनात कुतूहल जागे झाले असेल. वडाच्या लांब पारंब्या, केळीच्या सालातून निघणारे तंतुमय धागे वस्त्रनिर्मितीमध्ये वापरले जाऊ शकतात का? निसर्गातील सर्वच तंतूंपासून वस्त्रनिर्मिती करता येत नाही. त्याचे कारण समजून घेण्यासाठी सूतनिर्मितीची प्रक्रिया समजून घ्यायला हवी.
कापूस तंतू रूपात :
तंतू एकमेकांमध्ये वा एकमेकांभोवती पिळले जाऊन सूतनिर्मिती होते, त्यामुळे पिळले जाण्याची क्षमता आणि त्यानंतर तुटेपर्यंत क्षमता टिकवून ठेवणे हे मुख्य गुणधर्म तंतूमध्ये असावे लागतात. या गुणधर्माला वस्त्र विज्ञानाच्या भाषेत कताई क्षमता (टेन्साइल स्ट्रेंथ) असे संबोधले जाते. कताई क्षमतेव्यतिरिक्त खालील गुणधर्म तंतूमध्ये असणे आवश्यक असते.
१) लांबी- तंतूची लांबी अधिक असल्यास त्यांना पीळ देणे सोपे होते. आखूड तंतू पीळ देताना तुटून जातात आणि प्रक्रियेस हानीकारक ठरतात. म्हणून दर्जेदार सूतनिर्मितीसाठी लांब तंतूंना प्राधान्य दिले जाते. तंतूच्या लांबीचा एकसारखेपणाही महत्त्वाचा असतो.
२) ताकद- तंतूची अंगभूत ताकद, जी एक नसíगक देणगी असते. तंतूमधली ताकद आणि त्यांचा एकसारखेपणा हे गुणधर्म त्यांच्या पीळदारपणाची क्षमता निश्चित करतात.
३) तलमता- सुताच्या काटछेदातील तंतूंची संख्या हा सुताच्या ताकदीचा महत्त्वाचा निकष ठरतो, या दृष्टीने तंतूची तलमता महत्त्वाची ठरते. तंतू जर जाडेभरडे असतील तर सुताची ताकद कमी होते. तंतू अतितलम असतील तर सूतनिर्मिती प्रक्रियेत अडचणी निर्माण होतात आणि सुताचा दर्जा घसरतो, म्हणून सुताची तलमता आणि तंतूंची तलमता यांचा मेळ साधणे महत्त्वाचे ठरते.
४) लंबन क्षमता- तंतूवर ताण दिला की तंतू तुटतो, पण तुटण्यापूर्वी त्याची लांबी वाढते ही लंबन क्षमता हा विशेष महत्त्वाचा गुणधर्म आहे. अधिक लंबन क्षमता सुताला फायदेशीर ठरते.
५) परिपक्वता- कापसासाठी हा गुणधर्म प्रामुख्याने विचारात घेतला जातो. अपरिपक्व तंतू सूतनिर्मिती प्रक्रियेसाठी हानीकारक मानले जातात.
६) तंतूमधील कचरा पुढील सर्व प्रक्रियांसाठी घातक ठरतो म्हणून तंतूमधील कचरा स्वच्छ करून मगच ते पुढे सूतनिर्मितीमध्ये वापरले जातात.

संस्थानांची बखर: कंपनी सरकारचे नवे विस्तारतंत्र
‘कंपनी सरकार’ने प्रथम राज्यांवर आक्रमण करून त्यांच्यावर कबजा करण्याच्या तंत्राचा अवलंब केला. परंतु त्यामुळे लढायांमध्ये होणारी मनुष्यहानी, अवाढव्य खर्च टाळण्यासाठी ब्रिटिशांनी मुत्सद्दीपणे काही योजना आखल्या. अशा विविध योजनांपकी लॉर्ड डलहौसीने तयार केलेल्या ‘डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स’, ही संस्थाने खालसा करण्याची योजना अधिक परिणामकारक ठरली. ज्या संस्थानिकांना आपला नसíगक पुरुष वारस नव्हता त्यांनी दत्तक घेऊन वारस नेमण्याचा अधिकार या योजनेमुळे रद्द झाला.
डलहौसीने दत्तकविधान नामंजुरीचा कायदा करताना, मोगल बादशाहसुद्धा आपल्या मांडलीक राजे आणि जहागीरदारांच्या बाबतीत असा कायदा वापरीत होते अशी पुष्टी जोडली होती. या कायद्यान्वये १८३९ ते १८४२  या काळात मांडवी, कुलाबा, जलोन, सुरत ही राज्ये तर १८४८  ते १८५४  या काळात सातारा, नागपूर तसेच जैतपूर, संबळपूर, बालाघाट, उदयपूर, आणि झांशी ही राज्ये त्यांचे दत्तकविधान नामंजूर करून ब्रिटिश इलाख्यांमध्ये विलीन केली गेली.  यापैकी झाशीच्या राणीने केलेल्या प्रतिकाराची गाथा अजरामर ठरली आहे.
अन्य राज्यांशी ब्रिटिशांना लढावे लागले नाही. मोगल राज्यकर्त्यांचे सुरुवातीचे धोरण दुसऱ्या लहान राज्यांचा युद्धात पराभव करून त्यांचा पूर्ण विध्वंस करावयाचा, मनुष्यहानी करावयाची, हे पुढे त्यांनी बदलले. त्या ऐवजी त्या राज्याशी तह, करार करुन अंकित करुन घेण्याचे धोरण त्यांनी अंगिकारले. कंपनी सरकार आणि ब्रिटिश राजवट यांनी पुढे हेच धोरण स्वीकारले.
सुनीत पोतनीस –  sunitpotnis@rediffmail.com

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?