संरक्षित अर्थव्यवस्थेमुळे नवीन उद्योगांसाठी परवाना पद्धत उदयास आली. या पद्धतीमध्ये मागणी व पुरवठा यांचा मेळ घालून ठरावीक मर्यादेपर्यंतच नवीन उद्योगांना परवानगी देण्याची सोय होती. यामुळे देशातील उद्योगांना आपल्या अंतर्गत बाजारपेठेमध्ये परदेशी उद्योगांकडूनच नव्हे, तर देशातील उद्योगांकडूनदेखील स्पर्धा नव्हती. अशा बाजारपेठेमध्ये पुरवठादारांची मक्तेदारी (मोनोपॉली) तयार झाली व त्यांच्याकडून माल खरेदी करण्यावाचून ग्राहकास अन्य पर्याय उपलब्ध नव्हता. याचा उद्योगांनी काही प्रमाणात गरफायदा घेतला व उत्पादनांचा दर्जा वाढविण्यास आणि किंमत कमी करण्यासाठी कधीही प्रयत्न केले गेले नाहीत. इतर विकसित देशांतील उत्पादनांचा दर्जा आपल्या देशातील उत्पादनांच्या तुलेनेने खूपच चांगला असे व किमतीही वाजवी असत. पण ही उत्पादने खुलेपणे आपल्या बाजारपेठेत आणता येत नसल्यामुळे चोरटय़ा मार्गाने (स्मगिलग) अशा मालाची आयात होऊ लागली. कापडाच्या बाबतीतही जपानसारख्या देशातून कापडाची चोरटी आयात मोठय़ा प्रमाणावर होत होती. विकसित देशांचा असा समज झाला की विकसनशील देशातील उद्योग चांगल्या दर्जाच्या मालाचे उत्पादन करूच शकत नाही व या देशांमध्ये चांगल्या दर्जाच्या मालाला मोठी मागणी आहे. त्यामुळे हे सर्व देश जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत आले तर विकसित देशातील उद्योगातील उत्पादनांना मागास देशांच्या बाजारपेठेत मोठी मागणी मिळेल व या मागास देशातील उद्योग बंद पडतील.
वस्त्रोद्योगाच्या बाबतीत जागतिकीकरणाच्या पूर्वी विविध देशांमध्ये ‘बहुविध धागा करार’ (मल्टी फायबर अ‍ॅग्रीमेंट) या नावाचा करार होता. यामध्ये एका देशामध्ये दुसऱ्या देशामधून तंतू, सूत किंवा कापड यांची जेवढी आयात करण्यात येत असे, त्या प्रमाणात त्या देशामध्ये निर्यात करण्याची मुभा असे. यासाठी प्रत्येक देशाला निर्यातीसाठी काही ठरावीक कोटा देण्यात येत असे. भारतामध्ये विकसित देशांकडून अत्यंत अत्यल्प प्रमाणात आयात करण्यात येत असल्यामुळे निर्यातीसाठी कोटाही अतिशय कमी प्रमाणात होता, म्हणून निर्यातीवर मर्यादा येत असत. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत ही कोटा पद्धत टप्प्याटप्प्याने काढून टाकण्याचा निर्णय घेतला गेला व याची सुरुवात इ.स. १९९५ पासून झाली. २००५ साली ही प्रक्रिया पूर्ण करावयाची होती.

बखर संस्थानांची: भोपाळची शाहजहान बेगम
भोपाळच्या गाजलेल्या चार बेगमांपकी तिसरी बेगम शहाजहान बेगम हिची कारकीर्द १८४४ ते १८६० आणि १८६८ ते १९०१ अशी दीर्घकाळाची होती. दिल्लीचा एकेकाळचा मोगल बादशाह शाहजहान याच्याशी तिच्या नावाचे साधम्र्य होतेच, पण तिलाही बादशहा शहाजहान याच्याप्रमाणेच स्थापत्यशास्त्रात स्वारस्य होते. स्वतच्या नावावरून शाहजहानाबाद हे भव्य शहर तिने वसविले. तिने बांधलेल्या इतर प्रसिद्ध इमारतीत  अली मंजिल, बेनझीर संकुल, नवाब मंजिल यांचा समावेश आहे. तिच्या नव्या राजवाडय़ाचे नावही तिने ‘ताजमहल’ असे ठेवले होते!
स्वत कवयित्री असलेल्या शाहजहानने सांस्कृतिक उत्कर्षांस प्राधान्य देऊन भोपाळ हे एक संपन्न संस्थान बनविले. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भोपाळच्या बेगमांकडे सततचा कारभार राहण्यापेक्षा पुरुष नवाब निवडण्याचा आग्रह धरला. त्यावर, ‘ब्रिटिश साम्राज्य जर साम्राज्ञी व्हिक्टोरिया योग्यरीत्या सांभाळू शकते तर भोपाळच्या बेगमा हे का करू शकत नाहीत?’ असे विचारून तिने त्यांना निरुत्तर केले होते.
बेगम शाहजहान नंतर सुलताना कैखुश्रोजहान बेगम भोपाळची चौथी नवाब बेगम झाली. सुलताना जहान ही नवाबपदावर इ.स. १९०१ ते १९२६ अशी पंचवीस वष्रे होती. या आधीच्या इतर बेगमांप्रमाणे सुलताना जहानने बुरखा, पडदा पद्धत झुगारून स्त्री उत्कर्ष आणि शैक्षणिक कार्याला प्राधान्य दिले. ही बेगम अलीगढ मुस्लीम विद्यापीठाची पहिली कुलगुरू होती. अनेक शैक्षणिक समित्यांवर अध्यक्ष होती. िहदू धर्मीयांनाही सरकारात महत्त्वाची पदे देऊन तिने िहदू-मुस्लीम बंधुभाव वाढविला. पंपाने पाणीपुरवठा, रेल्वे, रस्ते अशा नागरी सुविधा तिने भोपाळ संस्थानाला दिल्या. भोपाळच्या महानगरपालिका मुख्यालयाची ‘सदर मंजिल’ ही इमारत (सोबतचे छायाचित्र पाहा)  तिनेच बांधली.
सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com

nestle India shares slip after reports says baby food contain high levels of added sugar
नेस्लेला ८,१३७ कोटी बाजार भांडवलाची झळ; दुग्धजन्य पदार्थांबाबतच्या वृत्ताने भांडवली बाजारात समभागात घसरण
With restrictions on the export of non basmati rice the demand from the domestic market also declined Pune news
आंबेमोहर, कोलमचे दर घसरले; जाणून घ्या, ग्राहकांना काय फायदा होणार ?
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?
cashew farmer marathi news, konkan farmer marathi news
काजू वायदे : कोकणातील उत्पादकांना वरदान