शेळ्यांच्या संख्येमध्ये जगात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. दरवर्षी साधारणपणे १५ टक्के मांसासाठी कत्तल आणि ५-७ टक्के मरतूक होऊनसुद्धा भारतातील शेळ्या सरासरी ३ टक्क्यांनी वाढत आहेत. आपल्या देशात एकूण २३ जातींच्या शेळ्यांची नोंदणी झालेली असून उपलब्ध असलेल्या १०-१५ जाती प्रादेशिक नावाने प्रचलित आहेत. महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असलेल्या जातींपकी उस्मानाबादी, संगमनेरी आणि बेरारी या जाती महत्त्वाच्या मानल्या जातात.
एखाद्या प्रदेशातील हवामानाशी समरस झालेली शेळी त्या प्रदेशात, हवामानात सिद्ध झालेली असते. शेळीपालनासाठी अशा शेळ्यांची निवड करणे फायदेशीर असते.
शेळी व्यवस्थापनाच्या मुख्यत: तीन पद्धती प्रचलित आहेत. सर्वात फायदेशीर व किफायतशीर पद्धत म्हणजे मोकाट किंवा चराऊ पद्धत. आपल्या देशात साधारणत: ९५ ते ९८ टक्के शेळीपालनाचे व्यवस्थापन या पद्धतीने चालते. या पद्धतीत चाऱ्यावरील खर्च शून्य असतो. विविध प्रकारचा चारा खाल्ल्यामुळे शेळ्यांना त्यांच्यातील औषधी गुणधर्म मिळतात व त्यांची पचनसंस्था सुधारून शरीरवाढ चांगली होते.
दुसरी पद्धत अर्धबंदिस्त व्यवस्थापन. यांमध्ये शेळ्यांना ४ ते ६ तासांपर्यंत चरायला सोडून बाकीच्या वेळेत गोठय़ामध्ये पूरक चारा व खाद्याची सोय करतात. या पद्धतीत नफ्याचे प्रमाण मोकाट पद्धतीपेक्षा कमी असते.
तिसरी पद्धत बंदिस्त शेळीपालनाची, ज्यामध्ये संपूर्ण चारा व आहार गोठय़ातच उपलब्ध करून द्यायचा असतो. यामध्ये चारा व आहाराचा खर्च वाढतो. त्यामुळे नफ्याचे प्रमाण वरील दोन्ही पद्धतींपेक्षा कमी असते. या पद्धतीत शेळ्यांना विविध प्रकारचा चारा मिळत नसतो. फिरणे नसल्यामुळे पचनसंस्था मंदावते. गोठय़ातील दरुगधी वाढल्यामुळे गोचीड, पिसवा या परोपजीवींचा प्रादुर्भाव वाढतो.
शेळीपालन व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी आपल्या भागातील शेळी निवडावी. शेळी शक्यतो दुसऱ्या वेतापासून जुळे करडे देते. त्यामुळे दीड ते दोन वष्रे वयाची शेळी निवडावी. शरीराने निरोगी, चपळ, काटक, उंच, भरदार छाती, पुढील दोन पायांत जास्त अंतर, मोठी कास असलेली शेळी पदाशीसाठी उत्तम असते.
वॉर अँड पीस: कॅन्सर : कर्करोग- भाग- २
अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयात काही व्यवस्थेतील भाग बघत असताना आमच्या एका आर्किटेक्ट मित्राच्या- श्याम देशमुख यांच्या आईला गर्भाशयाच्या कर्करोगाकरिता उपचार करावयाची संधी मिळाली.  कर्करोगाच्या प्रकाराकरिता मूलभूत चिकित्सा म्हणून उत्तरबस्तीचा आम्ही उपचार केला. सुमारे महिनाभराच्या उत्तरबस्तीच्या उपचारानंतर व दैनंदिन आरोग्यवर्धिनी वापरानंतर पुन्हा तपासणी केली. त्यात कर्करोगाची पूर्वी असलेली लक्षणे पूर्ण नाहीशी झाली होती. कॅन्सरचा सामना मूलभूत विचारावर आधारित आयुर्वेदीय चिकित्सा करू शकते हा अनुभव आम्हाला आला.
शास्त्रकारांनी ‘रोगाला नाव नाही देता आले तरी चालेल, पण रोगावस्था समजून घ्या’, त्यामुळे विविध औषधी व उपचारांची योजना करता येते, असा दिलासा दिलेला आहे. कर्करोग असाध्य रोग नव्हे. त्या त्या रोगावरची ती कष्टसाध्य, शस्त्रकर्मसाध्य अवस्था आहे, असे समजून नेमकी तपासणी व औषधी योजना केली तर प्राचीन ग्रंथात सांगितल्याप्रमाणे ‘अर्बुदचिकित्सा’ शंभर टक्के फलदायी ठरते. चिकित्सेची सामान्य दिशा कफघ्न व रक्तवर्धक असावी. सर्व प्रकारच्या कॅन्सरविकारात मूळ कारणांचा शोध घ्यावा. रक्ताचे प्रमाण, रक्त खर्च होण्याचा वेळ, ईएसआर याकडे लक्ष असावे. मधुमेहाला विसरू नये. संबंधित अवयवाची स्वच्छता पाळावी. रुग्णाच्या रक्ताच्या प्लेटलेट काऊंटवर सतत लक्ष हवे. रोगप्रतिकारशक्ती, डब्ल्यूबीसी काऊंट याकडेही ध्यान असावे.
शरीरातील अनेकानेक अवयवांना विशेषत: फुफ्फुस, गर्भाशय, यकृत, प्लीहा, मूत्रपिंड, रक्त, गुद, मेंदू यांना कर्करोगाची बाधा झालेली उदाहरणे प्रत्यही वाढत आहेत. कॅन्सर या शब्दाने न घाबरता मुखपाक, राजयक्ष्मा, आर्तवविकार, कावीळ, वृक्कविकार, पांडू, पक्वाशयाचे शेवटचे टोक, मेंदू या अवयवांच्या शरीरवैगुण्याचा, कार्यबिघाडाचा मागोवा घ्यावा. संबंधित पथ्यपाणी पाळावे. अतिरेकी उपाय टाळावे. कॅन्सररूपी ब्रह्मराक्षसावर निश्चयाने मात करता येते. शुभं भवतु।
वैद्य प. य. वैद्य खडीवाले
आजचे महाराष्ट्रसारस्वत: २१ सप्टेंबर
१८८२>लेखक आणि प्राचीन मराठी काव्याचे अभ्यासक बाळकृष्ण माधव खुपेरकर यांचा जन्म.
१८३५> धर्म, तत्त्वज्ञान, इतिहास या विषयांचे लेखन आणि मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूलचे पहिले भारतीय प्राचार्य वामन आबाजी मोडक यांचा जन्म.
१९२६> समीक्षक, संपादक, संशोधक डॉ. सुरेश डोळके यांचा जन्म. विदर्भातील संतकवी व काव्य यांच्यावर लेखमाला व ‘रुक्मिणी स्वयंवर’ या ग्रंथाचे संशोधन, याशिवाय डॉ. दप्तरी यांचा ‘धर्ममीमांसा’ हा ग्रंथ तसेच ‘प्राचीन मराठी काव्य, संशोधन शलाका, संशोधन समस्या, संशोधन समीक्षा’ ही त्यांची समीक्षात्मक पुस्तके प्रकाशित.
१९३९>कवी, कथा-कादंबरीकार लक्ष्मीकांत तांबोळी यांचा जन्म. हुंकार, अस्वस्थ सूर्यास्त, मी धात्री,मी धरित्री हे काव्यसंग्रह, तर ‘तवंग’, ‘सलामसाब’, ‘कृपणकाल’, ‘गंधकोषी’ ही पुस्तके आणि ‘दूर गेलेले घर’ ही कादंबरी प्रकाशित.
१९८२> कवी, कथाकार, अनुवादक सदानंद शांताराम रेगे यांचे निधन.  ‘अक्षरवेल’, ‘गंधर्व’, ‘देवापुढचा दिवा’, ‘वेडय़ा कविता’ हे काव्यसंग्रह, तर ‘जीवनाची वस्त्रे, ‘चांदणे’, ‘मासा आणि इतर विलक्षण कथा’ हे कथासंग्रह गाजले. काही अनुवादित नाटके प्रकाशित.
संजय वझरेकर
जे देखे रवी..      देहबोली
कधी कधी मी फार तावातावाने बोलू लागलो, तर ही म्हणते, ‘‘तुला बघून तुझे पेशंट दचकत असणार, निदान बिचकत तरी असतील.’’ अनेक वर्षांपूर्वी आम्ही दक्षिणेतल्या अरण्यात वन्यप्राणी बघायला गेलो होतो. तेव्हा एक मला म्हणाला, तुम्ही अ१े८ मध्ये आहात का हो? ही एवढी खूष झाली. मला म्हणाली, ‘‘बघ, तुझ्या देहबोलीत काही तरी कडक असल्याचा भास आहे.’’ अर्थात हे कडकपण खोटे आहे हे तिलाही माहीत आहे. बायका आपल्या नवऱ्यांना (किंवा हल्ली आपल्या पुरुषांना) नुसत्याच ओळखत नाहीत, तर ओळखून असतात. थोडी फार जबरदस्ती होत असेलही कदाचित, परंतु पुरुषांचा असाहाय्य उतावळेपणा त्यांनी अनुभवलेला असतो. देहबोलीबद्दल ज्ञानेश्वरांनी फार फार सुंदर लिहिले आहे. अर्थात त्यांचा रोख वरील ओळींच्या मानाने खूपच जास्त गहन आणि मातबर आहे. ज्ञानी माणूस, ज्याला या निसर्गाचे रहस्य कळले आहे तो आपोआप स्वार्थ टाकून सद्गुणी होतो असा तेराव्या अध्यायाचा गाभा आहे आणि तो कपिल नावाच्या निरीश्वरवादी वैज्ञानिकाने सांख्य योग सांगितल्यावरून घडला आहे. कपिल मुनी माझा अवतार आहे, असे श्रीकृष्ण म्हणत असेलही, पण श्रीकृष्ण हा स्वत: ब्रह्म असे गृहीत धरले तर शेवटी तोही कपिल मुनींप्रमाणेच ब्रह्माचाच अवतार असतो. देहबोलीबद्दल पुढची ओवी बघा-
पोषाखाचे नाही मंजन। टाळतो खुषामत आणि मनोरंजन। जे मिळाले अंजन। त्याचा सौदा नाही।।
मंजन हा शब्द उगाच लांबण लावू नकोस असा आधुनिक आहे. खुषामत अधिकाऱ्यांची करतात काही तरी मिळवण्यासाठी. त्या प्रवाहात विनोद चुटके सांगून साहेबाला वश करायचे असते. अंजन या शब्दाचा अर्थ संदर्भाचे भान ठेवून शब्दांचा अर्थ लावणे, असा आहे. परिस्थितीचे भान, एकंदरच जाण, जाणीव किंवा ज्ञान या अंजनाशिवाय शक्य नसते (अनेकार्थस्य शब्दस्य वाचकत्वं नियंत्रिते) अंजन याचा रूढार्थ इंग्रजीत डोळ्याचे ड्रल्ल३ेील्ल३. याचे मूळ ंल्लल्ल्रल्ल३ म्हणजे दीक्षा देणे. ही दीक्षा भाषेच्या माध्यमातून येते. अल्लल्ल्रल्ल३ आणि अंजन या शब्दांमधले साम्य लक्षणीय आहे, पण या ज्ञानाचा सौदा करायचा नसतो. पोशाख साधा असलेला उगीचच फालतू टाइमपास न करणारा परिस्थितीची जाण असणारा हा. त्याच्या जाणिवांचा दुरुपयोग व्यवहारात सौदा मांडून करत नाही असा संपूर्ण अर्थ आहे. ही देहबोली आपण मधूनमधून बघतो आणि ओळखतोही आणि नम्रही होतो. मेघासारखा विरळ। वाटते वाऱ्याने विखरेल। पण तोच ढग। त्याच्या बघा बरसणाऱ्या धारा। आणि टणटणा कोसळणाऱ्या गारा।। अदंभाची किंवा ढोंग अथवा सोंग न करणाऱ्याची देहबोली सांगण्यासाठी या ओव्या सांगण्यात आल्या आहेत.
रविन मायदेव थत्ते