कृत्रिम तंतू तयार करण्यासाठी एकरेषीय बहुवारिकाची गरज असते. यासाठी तंतू तयार करताना प्रथम बहुवारिक एकरेषीय बनवावे लागते. पुनर्निर्मित तंतूंच्या बाबतीत निसर्गात इतर स्वरूपात उपलब्ध असलेले बहुवारिक घेऊन त्याचे रूपांतर एकरेषीय बहुवारिकामध्ये केले जाते. संश्लेषित तंतूंच्या बाबतीत बहुवारिकाचा मूळ रेणू आणि त्या रेणूपासून एकरेषीय बहुवारिक कारखान्यातच तयार केले जाते.
 या दोन्ही रीतीने मिळवलेले बहुवारिक हे द्रावण स्वरूपात किंवा वितळलेल्या द्रव स्वरूपात असते. असे जड व चिकट अशा द्रव स्वरूपातील बहुवारिक एका सूक्ष्म छिद्रे असलेल्या लहान चाळणीतून ज्याला तनित्र  (स्पिनरेट) म्हणतात, त्यातून मोठय़ा दाबाने (ज्याप्रमाणे चकलीच्या साच्यातून चकली केली जाते) लहान लहान धारांच्या स्वरूपात बाहेर ढकलले जाते. तनित्रातून द्रव धारांच्या स्वरूपातील बहुवारिकाचे वेगवेगळ्या पद्धतीने घनीकरण (सॉलिडिफिकेशन) केले जाते. घनीकरणाच्या पद्धतीवरून कृत्रिम तंतू तयार करण्याच्या प्रक्रियांचे तीन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते.
१. आद्र्र कताई (वेट स्पििनग) :
या पद्धतीमध्ये बहुवारिक हे द्रावणाच्या स्वरूपात असते आणि हे बहुवारिकयुक्त द्रावण तनित्रातून बाहेर आल्याबरोबर त्याची प्रक्रिया एका विशिष्ट रसायनाशी होते. हे रसायन द्रावणातील द्रवकाशी रासायनिक प्रक्रिया करते आणि बहुवारिक साक्याच्या (प्रेसिपिटेट) स्वरूपात घनीकरण होऊन बाहेर पडते. साक्याच्या स्वरूपातील हे धागे नंतर वाळवले जातात.
२. शुष्क कताई (ड्राय स्पििनग) :
या पद्धतीमध्येसुद्धा बहुवारिक हे द्रावणाच्या स्वरूपात असते. यातील द्रावक हा चटकन उडून जाऊ शकणाऱ्या द्रवाच्या स्वरूपात असतो.
 हे द्रावण तनित्राच्या बाहेर पडल्याबरोबर त्यास उष्णता दिली जाते आणि त्यामुळे द्रावक उडून जातो आणि द्रव्याच्या रूपातील बहुवारिकाचे घनीकरण होते.
३. वितळ कताई (मेल्ट स्पििनग) :
या पद्धतीमध्ये तंतूचे बहुवारिक हे वितळलेल्या द्रवाच्या स्वरूपात असते.
 हा वितळलेला द्रव तनित्राच्या बाहेर आल्याबरोबर त्याला थंड हवेच्या साहाय्याने थंड केले जाते आणि या पद्धतीने बहुवारिकाचे घनीकरण होते.

संस्थानांची बखर: दतियामधील गैर कारभारामुळे सामूहिक आत्महत्या
दतिया संस्थानचे राजे सर गोविंदसिंग यांची इ.स. १९०७ ते  १९४७  अशी चाळीस वर्षांची राजकीय कारकीर्द अत्यंत वादग्रस्त आणि अशांततेची ठरली. लहान वयात राजेपद मिळाल्यावर पहिली पाच सहा वष्रे मद्यपी आणि व्यसनाधीन मित्रांची संगत लागल्यामुळे ऐषाराम आणि बेजबाबदार वर्तनाची राजांना सवय लागली.
त्यांच्या कारभाराचे अनेक किस्से मोठे मजेशीर आहेत. एकदा त्यांचे दिवाण येऊन सांगू लागले की, गेल्या दीड वर्षांत एकाही खटल्याचा निकाल राजेसाहेबांनी लावला नसल्यामुळे बरेच खटले साचले आहेत. यावर राजेसाहेबांनी दिवाणाला खटल्यांच्या सर्व नस्तबंद्या (फायली) आणून राजांच्या टेबलावर ठेवण्याचा आदेश दिला. टेबलावर ठेवलेल्या चोवीस फायली राजेसाहेबांनी पत्ते पिसतात त्याप्रमाणे दोन-चार वेळा वर खाली केल्या. त्यानंतर त्यांनी दिवाणाला बारा बारा फायलींच्या दोन चळती करावयास लावून त्या टेबलावर ठेवण्यास सांगितले. त्यातली एकही फाइल उघडून न बघता, न्यायाधीशाच्या थाटात राजेसाहेबांनी सर्व चोवीस खटले निकाली काढले! निकाल होता, उजवी कडच्या फाईल्सचा निकाल फिर्यादींच्या बाजूने आणि डावी कडच्यांचा आरोपींच्या बाजूने!
१९११ साली गोविंददास या प्रतिष्ठित माणसावर त्याने शाही खजिन्यातील मोठी रक्कम लंपास केल्याच्या आरोपावरून राजा आणि दिवाणाने त्यास अटक केली. चार दिवसात ती रक्कम परत न केल्यास आरोपीची कातडी सोलून त्यात भुसा भरण्याची शिक्षा सुनावली गेली. पैसे परत आणण्यासाठी गोविंददासाला चार दिवसांसाठी मोकळे सोडण्यात आले. न केलेल्या गुन्ह्याबद्दल असली भयंकर, क्रूर शिक्षा ऐकून आणि गहाळ रकमेचा भरणा करण्यासाठी असमर्थ असलेल्या गोविंददास आणि त्याचे दोन बंधू व या तिघांची कुटुंबे मिळून २४ आबालवृद्धांनी दुसऱ्या दिवशी अग्नीत उडय़ा टाकून आत्महत्या केल्या!
राजपूत राज्यांमध्ये, राजघराण्यातील स्त्रियांच्या जोहाराच्या कथा प्रसिद्ध असतात. परंतु गोविंददास आणि त्यांच्या कुटुंबियांची ही कथा चटका लावणारी आहे.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

Vote From Home Eligibility and Procedure for Lok Sabha Election 2024 in Marathi
Vote From Home: घरबसल्या मतदान करण्यासाठी कोण पात्र? त्यासाठीचा फॉर्म 12D नेमका कसा भरायचा? जाणून घ्या
Techie doubles his income
वर्षाला १ कोटी रुपये कमावण्यासाठी व्यक्तीने शोधला जुगाड, लाखोंचे शैक्षणिक कर्जही फेडलं, एकाच वेळी केल्या….
How Suryanamaskar and pranayama can help you fight spring allergies
तुम्हालाही वारंवार शिंका येतात का? रोज करा ‘हे’ दोन प्रभावी प्राणायाम अन् व्हा अ‍ॅलर्जी फ्री
Why HbA1c test important for diabetes diagnosis Who should do it and how consistently
विश्लेषण : HbA1c चाचणी मधुमेह निदानासाठी महत्त्वाची का आहे? ती कुणी आणि किती सातत्याने करावी?