पेट्रोलियम खनिज तेलापासून मिळणाऱ्या पदार्थामध्ये हायड्रोकार्बन द्रावणांचा महत्त्वपूर्ण वाटा असतो. कमी तापमानाला ऊध्र्वपातित होणारी ही द्रावणे इतर पेट्रोलियम पदार्थाप्रमाणे एरॉमेटिक, पॅराफिनिक व नॅफ्थोनिक हायड्रोकार्बन रसायनांची मिश्रणे असतात, तर काही द्रावणे एकाच विशिष्ट प्रकारच्या हायड्रोकार्बन्सने युक्त असतात.
साधारणत: पाण्यासारखी रंगहीन दिसणारी ही द्रावणे पाण्यात अविद्राव्य असतात. परंतु ती अन्य औद्योगिक रसायनांना विरघळवितात. ज्या तापमानाच्या दरम्यान ही द्रावणे उकळतात, त्यानुसार त्यांचे चार मुख्य भागात वर्गीकरण केलेले असते.
विशेष उत्कलन िबदूच्या दरम्यान उकळणाऱ्या द्रावणांना ‘स्पेशल बॉईलिंग पॉइंट स्पिरिट्स’ (एस.पी.एस) म्हणतात व ते ३५ अंश सेल्सिअस ते १६० अंश सेल्सिअस तापमानाच्या दरम्यान उकळतात. औद्योगिक क्षेत्रातील विशिष्ट वापरानुसार त्यांचे उत्कलनिबदू मर्यादित केले जातात. ६४ ते ६९ अंश सेल्सिअस तापमानाला उकळणारे हेक्झेन हे द्रावण वनस्पती बियांपासून तेल मिळविण्यासाठी वापरतात. बियांचे तुकडे करून या द्रावणात मिसळतात, तेव्हा त्यात तेलाचा अंश विरघळतो. नंतर, हे द्रावण ऊध्र्वपतनाने वेगळे करतात व तेल मिळवतात. ही तेले खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी तसेच साबण व रंग तयार करण्यासाठी वापरतात. हेक्झेनमध्ये एरोमेटिक्स हायड्रोकार्बन्सचा अंश अजिबात नसतो व त्यामुळे खाद्यतेलापासून शरीराला अपाय होण्याची शक्यता नसते. त्याच्या उत्कलनिबदूची मर्यादा कमी असल्यामुळे, ते सहज उडून जाते व तेल प्राप्तीसुलभ होते. याशिवाय रबरापासून चिकटपट्टय़ा तयार करणे, जलरोधक तंतू निर्माण करणे, गॅसभट्टीत एल.पी.जी.ऐवजी इंधन म्हणूनदेखील हेक्झेनचा वापर होतो.
६० ते १२० अंश सेल्सिअसच्या दरम्यान ऊध्र्वपतित होणारी स्पिरिट्स द्रावणे मुख्यत: रबर उद्योगात मोठय़ा प्रमाणात वापरतात. विशेषत: गाडीचे टायर्स तयार करताना या द्रावणाचा मोठय़ा प्रमाणात वापर होतो. तसेच रंग किंवा वॉíनश तयार करताना, त्यांचा पातळपणा वाढविण्यासाठी हे द्रावण सर्रासपणे वापरले जाते. याशिवाय, कपडे ड्रायक्लीिनग करताना वापारलेले हे द्रावण सहज उडून जाऊ शकते व कपडा त्वरित सुकण्यास मदत होते.

प्रबोधन पर्व: ‘गीताई’कार विनोबा भावे
म. गांधी यांचे शिष्य आणि ‘भूदान’ चळवळीचे प्रवर्तक अशी विनोबा भावे यांची ओळख सांगितली जाते. तरुण वयात म. गांधी यांच्या भाषणाने प्रभावित होऊन त्यांनी ब्रह्मचर्याची शपथ घेतली आणि ते गांधींसोबत काम करू लागले. १९२१ साली वध्र्याला आश्रम सुरू केल्यावर त्याचे संचालक म्हणून म. गांधींनी विनोबांची नेमणूक केली. नंतरचे सबंध आयुष्य – भूदानयात्रा सोडल्यास – विनोबांनी वध्र्यात राहून तपश्चर्या करण्यात घालवली. रोज सात-आठ तास सूत कातणे, विणणे आणि शेतकाम करत. १९३० व ३२ च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी कारागृहवास भोगला. १९४० साली म. गांधींनी स्वराज्याकरिता वैयक्तिक सत्याग्रहाचे आंदोलन आरंभले. त्यात पहिला सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली. भारत-पाक फाळणी झाल्यानंतर परागंदा झालेले लक्षावधी शरणार्थी दिल्ली, पंजाब, राजस्थान यांमध्ये आले. त्यांना धीर देत विनोबांनी सर्वधर्मसमभावाचा मंत्र सांगत प्रेम आणि सद्भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला.  स्वातंत्र्यानंतर म. गांधींच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी ‘सर्वोदय समाजाची स्थापना केली. १९५१ साली त्यांनी ‘सब भूमी गोपाल की’ असा नारा देत ‘भूदान’ चळवळ सुरू केली. पुढे आणीबाणीचे ‘अनुशासन पर्व’ या शब्दांत समर्थन केले. विनोबांनी दोनशेच्या आसपास पुस्तके लिहिली आहेत. १९३०मध्ये त्यांनी ‘गीताई’ लिहिले. त्याच्या आतापर्यंत २५० हून अधिक आवृत्त्या निघाल्या असून सुमारे ५० लाख प्रती विकल्या गेल्या आहेत. १९३२ मध्ये धुळ्याच्या तुरुंगात विनोबांनी ‘गीता प्रवचने’ दिली, ती साने गुरुजींनी लिहून घेतली. त्याचे पुस्तक १९४५ मध्ये प्रकाशित झाले. या पुस्तकाच्याही आत्तापर्यंत ५०च्या आसपास आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांचे इतर भारतीय भाषांत अनुवाद झाले आहेत. १९८३ साली विनोबांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ ने गौरवण्यात आले.

मनमोराचा पिसारा: संकल्पाची गोष्ट
किती छान वाटतं ना की आपण नेमेचि येतो मग पावसाळा; या चालीवर नेमेचि येतो मग पाडवा! असं म्हणत नाही! आपण दरवर्षी पाडव्याचं स्वागत आकाशवाणीवरील हिन्दी भाषेप्रमाणे ‘हर्षउल्हास के साथ’ करतो. आणि बडी धूमधाम से महाराष्ट्र में पाडवा (याचा उच्चार दरवर्षी बदलतो, उदा. पडवा, पडावा, इ.) मनवतो.
आता हा हर्षउल्हास आणि धूमधाम मराठमोळ्या उपनगरात (गिरगाव निसटलंय!) धूमधडाक्यानं रस्त्यावर साजरा होतोय. आपण मंडळी तशी हौशी या सदरात जमा होत असणार. माझ्या नॉर्वेजियन मित्राला म्हटलं की तुमचा धूमधडाक्यात साजरा होणारा सण कोणता? तर ख्रिसमसपलीकडे त्याला आठवेना. तुमच्याकडचे सण कोणते, असं विचारल्यावर म्हटलं, ‘आमच्याकडे सणांची रिले रेस वर्षभर चालू असते. एक संपतो तो नवा हजर!’
असा हा पाडवा. मुलांच्या परीक्षेच्या घाईगडबडीत दरवर्षी येतो. त्यामुळे श्रीखंडपुरी आणि चार-दोन कडुनिंब पानावर साजरा होतो. या धामधुमीत एका गोष्टीचा विसर पडतो. मित्रा, ‘थट्र्टी फस्ट’च्या रात्री नव्या वर्षांकरता दरसाल संकल्प सोडतोस! तसा पाडव्याला संकल्प सोडतोस (खरं म्हणजे धरतोस) का? नसशील तर पुन्हा एक संधी मिळत्येय अजूनही विचार कर. इट इज नेव्हर लेट हू लर्न टू लिव्ह हॅपिली!
वास्तविक पाहता, संकल्प सोडण्यासाठी रोजच नवं वर्ष उलगडत असतं. हर दिन नया दिन असतो. वर्षांची सुरुवात होण्यासाठी ना १ जानेवारी लागत ना गुढीपाडवा! रोजचा दिवस नव्यानं, उत्साहानं जगण्याचा वर्षांरंभ किंवा खरं तर आयुष्यारंभ असतो. अगदी ‘नवीन आले साल आजला, उजेड पडला नवा..’ असं गाणं रोज म्हणायला काय हरकत आहे? आता नव्या वर्षांचा एक संकल्प करू आणि नव्या उमेदीनं जगायला सुरुवात करू.. त्यासाठी एक अनुभव शेअर करतो.
एक संकल्प. रोज दिवसातलं एखादं तरी ठरावीक काम बिनचूक त्या ठरलेल्या वेळी करणार आहे! मित्रा, आपलं आयुष्यच नव्हे तर प्रत्येक दिवस नि रात्र यांचं ‘चक्र’ वर्तुळाकार असतं. वर्तुळ कितीही लहान अथवा मोठं असलं तरी त्याला एकच केंद्र असतं. त्या केंद्राभोवतीच आपला रोजचा दिनक्रम फिरू शकतो.
एका आजीने हे रहस्य मला सांगितलं.  ‘आता मी एकटी. रोजच्या व्यवहारात कंटाळा करू लागले. आळशी झाले. कशात मन रमेना. एक दिवस बाल्कनीत मीच लावलेलं तुळशीचं रोप पाहिलं. माझ्या दुर्लक्षामुळे त्या तुळशीतला जीव संपत आला होता. टच्कन पाणी आलं रे डोळ्यात! उठून आत गेले. हळदी-कुंकवानी तिची पूजा केली नि संकल्प केला रोज सकाळी नित्यनेमाने तिला पाणी घालायचं. तिची काळजी घ्यायची. त्यानंतर रोजचा नेम कधी चुकला नाही. माझा दिनक्रम पुन्हा नीट झाला. रोजच्या जगण्यात उत्साह आला. एखादी तरी गोष्ट नेमानं केली की सगळं यथास्थित पार पाडता येतं. बघ. मी संकल्प सोडला तो दिवस माझ्यासाठी गुढीपाडवा ठरला!’
मित्रा, माझा संकल्पही तसाच रोज मनमोराचा पिसारा फुलवायचा, तुझ्यासाठी म्हणजे माझ्यासाठी, नववर्ष शुभेच्छा!
डॉ. राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com