आजकाल ‘पी.एच. (pH)  बॅलन्स्ड सोप’च्या जाहिराती दूरदर्शनवर आपण पाहतो. पी.एच म्हणजेच मराठीत सामू. pH आम्ल-आम्लारी आणि उदासीन या गुणधर्माशी निगडित आहे. एक ते सहा स्र्ऌ मूल्य असणं म्हणजे आम्लधर्मी, आठ ते चौदा pH मूल्य असणं म्हणजे आम्लारिधर्मी, आणि सात pH मूल्य असेल तर उदासीन गुणधर्म असतो. साबण आम्लारिधर्मी आहे. काही साबणांमध्ये िलबू वापरले जाते ते त्या साबणाचा pH मूल्य कमी करण्यासाठी. िलबामध्ये सायट्रिक आम्ल असतं. अशीच काही आम्लं नसíगक किंवा रसायनांच्या स्वरूपात साबणात वापरली तर त्याचा स्र्ऌ मूल्य कमी होतो. pH मूल्य जर सात करण्यात आला तर साबण उदासीन होतो. आता या पी.एच. आणि आपल्या त्वचेचा काय संबंध असेल की ज्यामुळे या ‘पी.एच (pH) बॅलन्स्ड सोप’चं महत्त्व जाहिराती आपल्याला सांगत असतात.
मानवी त्वचा तीन थरांची मिळून बनलेली असते. त्वचेच्या आतील थरात वेगवेगळ्या ग्रंथी असतात ज्यातून घाम, काही स्निग्ध पदार्थ आणि काही प्रमाणात आम्ल यांचा स्राव होत असतो. त्वचेच्या बाहय़ थरावर आम्लाचा थर जमा होतो, ज्याला ‘अॅसिड मॅन्टल’ असं म्हणतात. या आम्लाचा पी.एच. साधारणत: ४.५ ते ५.५ इतका असतो, जो व्यक्तीनुरूप वेगळा असतो. अॅसिड मॅन्टल धूळ, सूक्ष्म जिवाणू यांच्यापासून त्वचेच्या संरक्षणाचं काम करतं. साबण त्वचा स्वच्छ करतं, त्या वेळी ते धूळ, घाम, सूक्ष्म जीव काढून टाकतं, त्याच वेळी साबण आम्लारिधर्मी असल्याने त्वचेच्या अॅसिड मॅन्टलवर त्याचा परिणाम होतो. त्वचेचा सामू वाढतो. खरं तर थोडय़ाच वेळात त्वचेवर पुन्हा अॅसिड मॅन्टल तयार होते. वय, आरोग्य यानुसार प्रत्येक व्यक्तीचा अॅसिड मॅन्टल तयार होण्याचा वेगवेगळा असतो. साबणामुळे त्वचेचा पी.एच. बदलून ती अल्कलीधर्मी (अल्कली-पाण्यात विरघळणारे आम्लारी) होऊ शकते, त्यामुळे सूक्ष्म जीवांची वाढ होऊन त्वचारोग होऊ शकतात. काही आजारांमुळे त्वचेचा पी.एच. वाढतो. प्रत्येकाच्या त्वचेचा पी.एच.वेगळा असल्यानं प्रत्येकासाठी योग्य साबण वेगवेगळा असतो. स्र्ऌ मूल्य ७ (उदासीन) किंवा ७ च्या जवळपास असलेला साबण त्वचेसाठी चांगला असतो, जो सौम्य समजला जातो.

प्रबोधन पर्व: शास्त्रांच्या कामधेनूचे सत्त्व अगाध आहे!
‘‘भौतिकशास्त्रांनी आपल्या जीविताची सगळी तबाच बदलून टाकली आहे, हे आपण प्रत्यक्ष पाहत आहोत. शंभर वर्षांपूर्वी युरोपातील किंवा अमेरिकेतील बहुजन समाजाची स्थिती काय होती याची वर्णने त्या त्या समाजाचे इतिहास लिहिणाऱ्यांनी दिलेली आहेत. ती फारच बोधप्रद वाटतात. इंग्लंडातील मोलकरणीला वर्षांतून एखाद्या वेळी साखर ही वस्तू खावयास मिळत असे, हे आज कोणाला सांगितले तर खरे तरी वाटेल काय? इंग्लंडातील गरीब मनुष्य बाजारातून जो रोट विकत आणीत असे त्यांत प्रसंगविशेषी गव्हाच्या कणकीच्या भरीला हाडांची पूड घातलेली असे; हा इतिहास विश्वासार्ह आहे असे तरी कोणाला वाटेल काय? तीच मोलकरीण आणि तोच गरीब मनुष्य आजच्या घटकेला पहा; त्यांच्या जीवनात किती तरी फरक पडलेला दिसेल. अमेरिकेतून नुकतेच जाऊन आलेले एक पुढारी सांगत होते की, कामधंद्याची वेळ संपली म्हणजे जी खरोखर मोलकरीण आहे ती एखाद्या राजकुमारीसारखी झकपक बनून आपल्या घरातून बाहेर पडते. तिला स्वतंत्र खोली असते आणि तिची राहणी चांगल्या सुखी माणसासारखी दिसते. हा पडलेला फरक जसा इतर काही कारणांनी पडला आहे, तसा तो भौतिकशास्त्रांनी मिळून दिलेल्या सुखसाधनांनीही पडलेला आहे.’’ शास्त्रांचा पुरस्कार करत त्यांना शरण जाण्याचा मार्ग सांगताना श्री. म. माटे लिहितात-
‘‘अडचणीचा प्रश्न कोणता हे माणसाला कळले आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा यांची अमाप समृद्धी कशी होईल, हाच तो प्रश्न होय. पण या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी शास्त्रांना शरण जाण्याची बुद्धी आपल्याला अजून होत नाही.. जर आपण भौतिकशास्त्रांच्या मार्गाने गेलो आणि त्यांची योग्य ती आवाहने केली तर ‘देतां किती घेशिल दो कराने’ अशी आपली अवस्था ही शास्त्रे करून टाकतील. आणि असे झाले म्हणजे मालकी हक्काची वासना आणि संग्रहाची सावधगिरी यांचा मागमूसही शिल्लकराहणार नाही. परंतु दुर्दैव हे की, या कामधेनूचे सत्त्व किती अगाध आहे आणि ती शरणागतीस कशी पात्र आहे याचे मर्मच आम्ही माणसांनी अजून पुरते ओळखलेले नाही.’’

What is Microsoft warning to India about China regarding AI
‘एआय’च्या माध्यमातून निवडणुकांमध्ये गोंधळ उडवणे शक्य? चीनबाबत मायक्रोसॉफ्टचा भारताला कोणता इशारा?
How to improve Cibil score tips to increase
‘सिबिल’ स्कोअर कसा सुधाराल?
Have you been drinking water from a plastic bottle
पाणी नव्हे, तुम्ही प्लास्टिक पिताय! प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी आरोग्यासाठी हानिकारक; संशोधनातून धक्कादायक माहिती स्पष्ट
documentry article lokrang marathi news, lokrang article marathi
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : वन्यजीवांवरील रोमांचक प्रकल्प

मनमोराचा पिसारा: कॅबिनेट म्हणजे कपाट?
भाषा आणि भाषेतले शब्द यांचे अर्थ केव्हा आणि कसे बदलतात, यांचा काही नेम नसतो. विशिष्ट स्वराच्या वापराने एखाद्या वस्तूचं नाव आणि अर्थ बदलतो. त्याची गंमत पाहायला मजा वाटते. साधारणपणे पुल्लिंगी अर्थाच्या शब्दाचं स्त्रीलिंग रूपांतर केलं की, ती वस्तू लहान असल्याचं सूचित केलं जातं. उदा. वडा आणि वडी, डबा आणि डबी! प्रत्येक भाषेतच अशा प्रकारे एका शब्दाला प्रत्यय जोडून अथवा थोडी मोडतोड करून त्यांचे अर्थ बदलता येतात. म्हणून मोठय़ा काप-कट, छोटा काप म्हणजे कटलेट!
हल्ली सर्वत्र ऐकू येणारा शब्द म्हणजे कॅबिनेट. कॅबिनेटचा एक अर्थ अलमारी अथवा छोटं कपाट. कारण केबिन/ कॅबिन म्हणजे मोठं कपाट. (रूढार्थाने लहानशी खोली!)
लहान कपाटाचा आणि मंत्रिमंडळाचा अर्थाअर्थी काय संबंध?
‘कॅबिनेट’ या शब्दाची व्युत्पत्ती समजून घ्यायची असेल तर गृहस्थापत्यशास्त्राचा इतिहास शोधावा लागतो. तोसुद्धा इंग्लंडमधल्या चौदाव्या-पंधराव्या शतकातल्या घरांचा आणि घरातल्या खोल्यांच्या रचनेचा. त्या काळी आजच्यासारख्या ‘खासगी व्यवहारासाठी स्वतंत्र खोल्या असाव्यात असं फारसं मानलं जायचं नाही. थंडी-वाऱ्यापासून सामान्य माणसांना संरक्षण मिळावं अशा माफक अपेक्षेने लोक घरं बांधायचे. जेव्हा व्यापार-उदिमात ब्रिटिश मंडळींनी अमाप पैसा मिळविला तेव्हा त्यांच्या घराविषयीच्या कल्पना अधिक स्पष्ट झाल्या आणि मग प्रार्थना, खाणं, पिणं, वाचनालय, संडास-बाथरूम इ. गोष्टींसाठी खोल्या बांधल्या जाऊ लागल्या.
यातूनच ‘बेडचेम्बर (खाटांची खोली) ही कल्पना आली तरी ‘बेडरूम’ म्हणून लैंगिक जीवनाकरिता सोय आणि अवकाश असा अर्थ प्राप्त झाला नव्हता. हळूहळू बेडरूममधल्या खाटेवरच्या इतर उद्योगांचा संकोच होऊ लागला. त्या खोलीत अत्यंत खासगी मानल्या जाणाऱ्या वस्तू ठेवण्याकरिता एक छोटंसं कपाट ठेवण्यात येऊ लागलं. त्यामुळे खासगी कामाचं कपाट म्हणजे कॅबिनेट. फ्रेंच मंडळींना या छोटय़ा कपाटाची कल्पना फारच आवडली आणि त्यांनी सगळ्या खोल्यांत कॅबिनेट नेली.
पण इंग्लिश मंडळींनी मात्र या कॅबिनेटचा उपयोग खासगीपणासाठी इतका वाढवला की, खासगी लोकांसाठीदेखील कॅबिनेट तयार करून घेतली जाऊ लागली (म्हणजे, त्यात हळूच लपून बसता येईल. कशासाठी हे सुज्ञासी सांगणे न लगे.) इंग्लिश लोक कॅबिनेट संकल्पनेवर इतके खूष झाले की त्यांनी अत्यंत खासगी (लैंगिक व्यवहाराव्यतिरिक्त) सल्लामसलतीसाठी मोजक्या लोकांना बोलावायचं असल्यास ‘कॅबिनेट’मध्ये मीटिंग घ्यायला सुरुवात केली आणि इथेच शब्दांनी उडी घेतली. या खासगी लोकांना भेटण्याच्या जागेवरून त्या खास वैशिष्टय़पूर्ण काम करणाऱ्या लोकांना (राजाचे सल्लागार होते) कॅबिनेट म्हणायला सुरुवात झाली.
आता या घटनेला चारशे वर्षे उलटली. कॅबिनेट म्हणजे ‘कपाट’ हा अर्थ संपला. इतकंच काय किचन कॅबिनेट म्हणजे स्वयंपाक घरातलं कपाट नसून, खासगीतलं खासगी (चौकडी) मंत्रिमंडळ म्हणजे किचन कॅबिनेट. स्व. इंदिरा गांधींच्या संदर्भात हा शब्द भारतात प्रथम वापरला. त्या वेळी कॅबिनेट कपाट नसून, ‘कपट’ झालं.
आता इतिहास- जाऊ दे, भविष्य घडविण्याकरिता नवे कॅबिनेट उघडू.
डॉ.राजेंद्र बर्वे
संदर्भ : अॅट होम- बिल ब्रायसन.