पूर्ण जीवसृष्टीची ही डीएनएची गाथा लिहिली जाते ती फक्त ४ मुळाक्षरांनी  (A, T, G, C). पण आपल्या साहित्यसृष्टीत फक्त ३६ मराठी मुळाक्षरांनी लिहिलेले प्रत्येक पुस्तक वेगळे असते तशीच प्रत्येक जीवाची अशी एक खास गाथा या डीएनएवर आलेखलेली असते. शेवटी जीव म्हणजे काय तर अनेक प्रथिने, मेद आणि कबरेदकांची एक पेशी. प्रत्येक पेशीतील महत्त्वाची कामे केली जातात ती मूलत: वेगवेगळ्या प्रथिनांद्वारे. चयापचयासाठी लागतात ती विकरे, सजीवाची वाढ अवलंबून असते ती हॉर्मोन्स ही सर्व प्रथिनेच असतात. सर्व जीवसृष्टीत प्रथिने बनविणारा डीएनए सारखाच असतो. सर्व जीवसृष्टीचा आलेख जरी या ४ मुळाक्षरांनी लिहिलेला असला तरी त्या मुळाक्षरांच्या क्रमवारीवर जैवविविधता अवलंबून असते.
आपण फक्त मानवसृष्टीचा विचार केला तरी लक्षात येते की, एक माणूस दुसऱ्यासारखा नसतो. अगदी जुळ्या भावंडांतही काही तरी फरक असू शकतो. हा फरक घडतो तो डीएनएवरील मुळाक्षरांच्या क्रमवारीत असणाऱ्या फरकामुळे. आपण लेखनात जशी विरामचिन्हे वापरून वाक्याला अर्थ देऊ शकतो त्याप्रमाणे डीएनएच्या या क्रमवारीत काही विरामचिन्हेही असतात. ही विरामचिन्हे म्हणजे दुसरे तिसरे काही नाही तर असा एखादा कोडॉन की जो कुठलेही अमिनो आम्ल दर्शवीत नाही. यांना ‘नॉन्सेन्स कोडॉन’ म्हणतात. असे कोडॉन्स विरामचिन्हांप्रमाणे काम करतात. आपल्या डीएनएमध्ये बराचसा भाग नॉनकोिडग म्हणजे अर्थहीन असतो. ज्याला आपण ‘जंक डीएनए’ म्हणतो. ९९% मानवी डीएनए हा सर्वाच्यात सारखाच असतो फरक घडतो तो उरलेल्या १% डीएनएमुळे, जो प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळा असतो.
जसे आपल्या हाताचे ठसे खास व्यक्तिगत असतात अथवा प्रत्येकाची डोळ्यांची बुबुळे वेगळी असल्यामुळे त्याचा उपयोग आपल्या ओळखपत्रात करता येतो. त्याचप्रमाणे या जंक डीएनएचा उपयोग करून ‘डीएनए िफगरिपट्रिंग’ हे नवीन तंत्रज्ञान विकसित केले गेले आहे. हे तंत्रज्ञान गुन्हेगाराचा तपास करण्यासाठी अथवा स्वामित्व अधिकारासाठी वापरता येते.

प्रबोधन पर्व: समाजांतील असंतुष्ट वर्गानें स्वसमाजत्याग करावा काय?
‘‘शंकराची पूजा केल्यानें मनुष्य स्वर्गास जात नाहीं किंवा बिस्मिल्ला म्हटल्यानें नरकास जात नाही. तर विशिष्ट उपासनेचा किंवा आचाराचा अभिमान तरी कां धरा? आम्ही जे ग्रंथ कोणीहि वाचीत नाहींत, त्या वेदांचें, पुराणांचें, वगैरे उगाच शाब्दिक म्हणजे खोटें अनुयायित्व कां पतकरावें? त्यांची उपासना करणें हा आमच्या बापजाद्यांचा धर्म असेल, पण तसें असलें म्हणून काय झालें? आम्ही मुसुलमान* होऊन बापजाद्यांचें श्राद्ध करावयाचें चुकविलें तर आमचे पितर नरकांत पडणार अशी आपली खात्रीच असती, तर मेलेल्यांचें हित पहावयाचें कीं जिवंतांचें हित पहावयाचें याचा विचार पडला असता. पण ती खात्री तरी आज आहे काय? स्वहिताकरतां स्व-समाजाचा त्याग करणें व परसमाजांत प्रवेश करणें, या गोष्टीचा तात्त्विक विचार झाला पाहिजे.’’
व्यक्ती आणि समाजाच्या परपस्पर-अपेक्षांचे सवाल करत श्री. व्यं. केतकर स्वसमाजत्यागातील अडचणीही (ज्ञानकोशाच्या प्रस्तावना खंडात) दाखवून देतात- ‘‘ समाजाच्या व्यक्तिविषयक अपेक्षांचें ज्ञान आणि त्यांच्या पूर्तीसंबंधानें करावयाच्या कर्तव्याची जाणीव ज्या मानानें मनुष्यास असेल, त्या मानानें समाजत्यागास त्याचें मन माघार घेईल. मनुष्याला नागरिकत्त्वाच्या निवडीचें ज्ञान प्राप्त होण्यापूर्वी त्यावर जे कांहीं पूर्वसंस्कार झालेले असतात, त्यांचा त्याग त्याच्यानें एकदम होत नाहीं. मातृभूमीचें किंवा समाजाचें ऋ ण मनुष्याला प्रत्यक्ष दिसत नसलें, तरी त्याच्या ठिकाणीं त्यासंबंधाची भावना जागृत असते. बाटलेल्या महारास* ख्रिस्ती अगर मुसुलमान समाजांतहि त्याच्या शैक्षणिक स्थितीमुळें कनिष्ठ स्थानच मिळणार. ख्रिस्त्यांतील जातिभेद हा या ठिकाणीं लक्षांत घेण्यासारखा आहे. स्वतपेक्षां संस्कृतिनें, ज्ञानानें, बुद्धिमत्तेनें, द्रव्यानें वगैरे कोणत्याहि एका प्रकारानें श्रेष्ठ अशा समाजांत शिरणाऱ्या नवख्या गृहस्थास उच्चपद मिळणें अशक्य असतें.’’
(* वरील शब्द  १९२० साली लिहिले-छापले गेले असून ते त्याच सामाजिक संदर्भात वाचावेत)

मनमोराचा पिसारा: हार्डी व्यक्तिमत्त्व
मानसशास्त्र आणि मानसोपचारशास्त्र यांना कायम आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून एका गोष्टीची फिर्याद केली जाते. ‘..तुम्ही मंडळी सदैव, मनातले भयगंड, न्यूनगंड, विकार, व्याधी आणि विकृतीभोवती घोटाळत राहता. जरा मानसिक सुदृढतेवर, मनोविकासासंबंधी चर्चा करा.. मानसिकरीत्या बिघडलेली अवस्था काही टक्के लोकांना सहन करावी लागते, पण आमच्यासारख्यांचं काय हो?’
मित्रा, काही वर्षांपूर्वी हा आरोप मानस (विकार नाही तर विकासासंबंधी) वैज्ञानिकांनी गंभीरपणे स्वीकारला. एका नव्या उपशाखेची निर्मिती झाली, येस पॉझिटिव्ह सायकॉलॉजी! तसं म्हटलं तर, नॉर्मल माणसांच्या मानसशास्त्राचा अभ्यास होत नव्हता असं नाही; पण त्यामधल्या संशोधनाविषयी उद्योग-व्यापार आणि वित्तसंदर्भात माणसं कसे निर्णय घेतात यासंबंधी होता. पॉझिटिव्ह सायकॉलॉजी म्हणजे आनंदी, संपन्न जीवन जगणाऱ्या माणसांचा अभ्यास. ही मंडळी जन्मत:च प्रसन्न वृत्तीची असतात की, पुढे समाज नि कुटुंबांनी केलेल्या संस्कारानं घडतात, हा प्रश्न ऐरणीवर घेतला. या विषयाचा आज अमेरिकेतल्या स्टॅनफर्ड, येल, कोलंबिया आणि एमआयटीसारख्या संस्थेमधून अभ्यास होतोय. यातले काही निष्कर्ष आता प्रसिद्ध झालेत. मित्रा, यू टय़ूब, हेड टॉक्स, गुगल टॉक्सवर या विषयाचा शोध घे.. भरभरून पाहायला नि ऐकायला मिळेल.
मनावर आलेल्या आपत्तीना तोंड देणाऱ्या आणि त्यामुळे अधिकच उजळणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला आता ‘हार्डी पर्सनॅलिटी’ असं संबोधतात. विशेष म्हणजे अशा व्यक्तिमत्त्वांना शारीरिक अथवा मानसिक व्याधी होतच नाहीत, असं नाही, तर त्यांच्यामध्ये अशा संकटावर मात करण्याचं सामथ्र्य असतं. असं असूनही या व्यक्ती गेंडय़ाच्या कातडीच्या, निबर, बेदरकार, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नसतात, तर त्या इतरांपेक्षा अधिक संवेदनशील, भावनिक असतात. विशेष प्रसंगीच त्यांच्या मनाचे हे भावनिक अंग प्रत्ययास येतं. अशा भावनिक अनुभवातून ते पटकन सावरतात आणि नेटाने आपलं काम करीत राहतात.
त्यांच्या मानसिक वैशिष्टय़ांवर संशोधन केल्यावर लक्षात आलं की, जीवनातल्या तीन ‘सी’वर त्यांचा दृढविश्वास असतो.
पहिला ‘सी’ म्हणजे कंट्रोल. हळव्या मनाच्या व्यक्ती सदैव आपल्या कंट्रोलपलीकडील गोष्टींचा विचार करतात, तर ‘हार्डी’ व्यक्ती सदैव आपल्या नियंत्रणकक्षेतल्या गोष्टींचा विचार करतात. हळव्या मनाच्या व्यक्तींना सतत असहाय हेल्पलेस वाटतं, तर हार्डी व्यक्ती नेहमी रिसोर्सफुल असतात!
दुसरा ‘सी’ ‘चॅलेंज’. हार्डी व्यक्तिमत्त्वाच्या माणसांचा दृष्टिकोन महत्त्वाचा. म्हणजे होकारात्मक असतो म्हणण्यापेक्षा वास्तविक असतो. त्यामुळे भोळसटपणानं ते धाडस करीत नाहीत, तर ते संकटावर मात करण्यासाठी योग्य नियोजन करतात. त्यांच्या दृष्टिकोनातून आवाहन प्रतीत होतं. तिसरा ‘सी’ कॉन्फिडन्स. आत्मविश्वासाबद्दल त्यांचा विचार स्पष्ट असतो, नियंत्रणकक्षेत असलेल्या कार्यक्रमाचं नियोजन करताना ते आपल्याला हे आवाहन स्वीकारता येईल असं गृहीत धरतात. आत्मविश्वास अनुभवावरून मिळतो. आत्मविश्वास म्हणजे कौशल्य!
यापलीकडे ‘हार्डी’ पर्सनॅलिटीकडे प्रचंड ऊर्जा असते. तीन ‘सी’ हे ऊर्जेचे चॅनेल असतात.
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com