उच्च व अतिउच्च तन्यता तंतू  – सामान्यत: पॉलिस्टर तंतूची तन्यता इतर नसíगक आणि मानवनिर्मित तंतूंपेक्षा अधिक असली तरी काही औद्योगिक वापरासाठी यापेक्षाही जास्त तन्यतेचे तंतू लागतात. उदा. शिलाईचा दोरा, ताडपत्री बनविण्यासाठी वापरले जाणारे धागे, मासेमारीचे जाळे बनविण्यासाठी लागणारे धागे अशा उपयोगासाठी नेहमीपेक्षा अधिक तन्यतेचे पॉलिस्टर तंतू लागतात. अशा विशिष्ट उपयोगासाठी उच्च व अतिउच्च तन्यता असणाऱ्या पॉलिस्टर तंतूंची निर्मिती केली जाते. उच्च तन्यतेच्या तंतूंची तन्यता साधारणपणे ५.५० ते ६.८० ग्रॅम प्रती डेनिअर इतकी असते तर अतिउच्च तंतूंची तन्यता ७.०० ते ७.६ ग्रॅम प्रती डेनिअर इतकी असते. अशा तंतूंमध्ये अधिक लांबीच्या बहुवारिकाचा उपयोग केला जातो आणि वितळ कताईनंतर तंतूला अधिक खेच दिला जातो.  तंतूंच्या अंतिम उपयोगाच्या गरजेनुसार तंतूंची निवड केली जाते. औद्योगिक व तांत्रिक क्षेत्रामध्ये तंतू व कापडाचा वापर जलद गतीने वाढत आहे. यासाठी उच्च तन्यतेच्या तंतूंची गरज असते. या क्षेत्रांमध्ये पॉलिस्टर तंतूंचा वापर मोठय़ा प्रमाणावर केला जातो.
कपडे शिवताना शिलाईसाठी जो दोरा वापरला जातो त्याला फार महत्त्व आहे. हा दोरा उच्च तन्यतेचा तसेच कमी दोष असलेला असावा लागतो. नाहीतर शिलाई वारंवार उसवते आणि शिवताना दोरा सारखा तुटत राहतो. आधुनिक गतिमान यंत्रांसाठी शिलाईचा दोराही अधिक चांगला लागतो. या सर्व गरजा उच्च तन्यतेचे पॉलिस्टर तंतू पूर्ण करत असल्यामुळे तयार कपडय़ांच्या उद्योगात शिलाईचा दोरा म्हणून पॉलिस्टर तंतूंचा वापर होतो.  
सर्वसामान्यपणे नेहमीच्या वापराचे तंतू हे एक डेनिअर किंवा अधिक जाडीचे असतात. यापेक्षा कमी जाडीच्या तंतूंची गणना अतितलम तंतूंमध्ये केली जाते. अखंड व आखूड या दोन्ही प्रकारांमध्ये पॉलिस्टरचे अतितलम तंतू निर्मिले जातात. आखूड तंतूंमध्ये तंतूंची जाडी ही ०.८ ते ०.९ डेनिअर इतकी असते तर अखंड तंतूंच्या बाबतीत जाडी ०.६ ते ०.९ डेनिअर इतकी असते. या तंतूंची निर्मिती इ.स. १९७० मध्ये सर्व प्रथम जपानमध्ये झाली. त्यानंतर १९८० मध्ये यूरोपमध्ये या तंतूंचे उत्पादन होऊ लागले. आता ०.३ डेनिअर इतक्या तलमतेचे तंतू विकसित झाले आहेत त्यांना उच्च अति तलमतेचे तंतू असे म्हणतात.

संस्थानांची बखर: डोगरा समाज
डोगरा हा समाज मूळचा हिमालयाच्या शिवालिक पर्वतरांगांच्या पायथ्याशी राहणारा. डोगरी ही त्यांची भाषा. बहुसंख्य डोगरा समाज िहदूधर्मीय आहे, पण मुस्लीम डोगरा समाजही मोठय़ा प्रमाणात आढळतो. जम्मू, कथुआ, उधमपूर येथे डोगरांची वस्ती अधिक असली तरी शेजारच्या पंजाब आणि हिमाचल प्रदेश या राज्यांतही हा समाज आढळतो. मूळ डोगरा समाज सर्व िहदू धार्मिकच होता, परंतु पुढे मोगलशाहीच्या काळात मोठय़ा प्रमाणात धर्मातर होऊन मुस्लीम डोगरा समाज निर्माण झाला. जम्मू, उधमपूर, पंजाब वगरे प्रदेशांत मुस्लीम डोगरा वास्तव्यास आहेत. भारत-पाक फाळणीनंतर बहुसंख्य मुस्लीम पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात स्थलांतरित झाले. राजा या नावाने त्यांना तिकडे संबोधले जाते. िहदू डोगरा समाजातील जमवाल राजपूत डोगरा घराण्याच्या राज्यकर्त्यांनी जम्मू आणि उधमपूर या प्रदेशांवर अनेक शतके आपले शासन दिले. जम्मूचा राजा गुलाबसिंग जमवाल याने १८४६ साली लडाखसहित संपूर्ण काश्मीर खोरे ईस्ट इंडिया कंपनीकडून ७५ लाख रुपयांना विकत घेतले. राजपूत डोगरांमध्ये झीर डोगरा ही एक जमात आहे. हे स्वत:ला कश्यप राजपूत म्हणवून घेतात. झीर म्हणजे आचारी. अलीकडे त्यांनी धाबे, लहान हॉटेलांचा व्यवसाय सुरू केलाय. एकूणच डोगरा राजपूत त्यांचा कडवा प्रतिकार आणि लढवय्येपणा याबद्दल प्रसिद्ध आहेत. ब्रिटिश इंडियन आर्मीमध्ये डोगरा रेजिमेंटने दोन्ही विश्वयुद्धांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली. डोगरा ब्राह्मण समाज हा बहुसंख्य सारस्वत आहे. डोगरा समाजातील अनेक व्यक्ती विविध क्षेत्रांमध्ये ख्यातनाम आहेत. प्रसिद्ध संतूरवादक शिवकुमार शर्मा, तबलावादक अल्लारखा आणि त्यांचे पुत्र झाकीर हुसेन, गायक-अभिनेता कुंदनलाल सगल, चरित्र अभिनेता ओमप्रकाश, अभिनेत्री विद्युत जमवाल, चित्रपट निर्माते-दिग्दर्शक वेद राही, जनसंघाचे पूर्वाध्यक्ष बलराज मधोक, भारतीय सेनेतील पहिल्या परमवीरचक्र या बहुमानाचे मानकरी सोमनाथ शर्मा आणि जम्मू राजघराण्यातील सध्याचे वारस आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे खासदार करणसिंग या सर्व ख्यातनाम व्यक्ती डोगरा समाजातीलच.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

nestle India shares slip after reports says baby food contain high levels of added sugar
नेस्लेला ८,१३७ कोटी बाजार भांडवलाची झळ; दुग्धजन्य पदार्थांबाबतच्या वृत्ताने भांडवली बाजारात समभागात घसरण
Is this waitress serving at a restaurant in China robot or human Find out
भारताला ‘कॅन्सर कॅपिटल ऑफ द वर्ल्ड’ का म्हटले जाते? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कारण…
Madhabi Puri Buch, SEBI, Indian market, GST, investment
गुंतवणूकदारांच्या वाढत्या आस्थेमुळे भांडवली बाजाराला उच्च मूल्यांकन – सेबी
idli rajma among top 25 dishes most damaging biodiversity reseach
आलू पराठ्यापेक्षा इडली जास्त हानिकारक, चणा मसाला, राजमा खाण्यापूर्वी ‘हा’ धक्कादायक अहवाल वाचाच