डीएनएचा एक महत्त्वाचा गुण म्हणजे अगदी सूक्ष्म जंतूपासून प्रगत मानवापर्यंत सर्व सजीवांत डीएनएची संरचना व घटक सारखेच असते.  म्हणजे डीएनएचा एखादा अंश (जनुक) एखाद्या जंतूमध्ये एका प्रथिनाची निर्मिती करण्यास कारणीभूत असेल तर ते जनुक जर आपण दुसऱ्या वनस्पतीमध्ये संकरित करू शकलो तर त्याच प्रथिनाची निर्मिती आपण वनस्पतीत करू शकू.
प्रत्येक सजीव पेशी एखाद्या रसायनाच्या कारखान्याप्रमाणे काम करत असते. पेशीच्या जीवनकालात प्रथिने, विकरे, हार्मोन्स अशा अनेक जैविक रसायनांची निर्मिती होत असते. आपल्या शरीरातील अन्नाचे चयापचन, प्राणवायूपासून ऊर्जानिर्मिती इ. अनेक जैवरसायनिक प्रक्रियांसाठी लागणाऱ्या विकरांच्या निर्मितीला डीएनएच जबाबदार असतो. डीएनएच्या या कार्याचा उपयोग करून कृषितंत्रज्ञान आणि वैद्यकीय तंत्रज्ञानाचा पाया रचला गेला आहे.
गाजर, पपईसारख्या रंगीत फळात बीटा कॅरोटीन नावाचे रसायन असते, ज्यापासून आपल्याला ‘ए’ जीवनसत्त्व मिळते. कृषिवैज्ञानिकांनी बीटा कॅरोटीनच्या निर्मितीला कारणीभूत असणाऱ्या जनुकाचे तांदळात संकर करून पिवळ्या रंगाचा ‘गोल्डन राईस’ बनविला आहे. ज्यामुळे आपल्याला त्या तांदळातून ‘ए’ जीवनसत्त्व मिळते. वर्तमानपत्रात बी. टी. कापूस व बी. टी. वांग्यावर झालेला ऊहापोह आठवत असेल. बॅसिलस जातीचा एक सूक्ष्म जीव असे एक रसायन बनवतो की ज्याचा उपयोग कीटकनाशक म्हणून होऊ शकतो. बॅसिलसमधील या रसायनाच्या जडणघडणीला कारणीभूत असणाऱ्या जनुकाचा संकर कापूस अथवा वांग्याच्या जनुकाशी करण्यात आला आहे. त्यामुळे अशा कापसाची बोंडे अथवा वांगी किडीच्या प्रादुर्भावापासून सुरक्षित असतात. असेच तंत्रज्ञान वापरून अधिक प्रथिने असणारी किंवा अधिक उपज देणारी तसेच अधिक स्निग्धांश असलेल्या तेलबियांची संकरित वाणे तयार करता येतात.
असेच तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रात पण वापरले जाते. मधुमेहावर वापरात असणारे इन्सुलिन डुकरापासून मिळविले जाते. पण आता मानवात इन्सुलिन बनविणारे जनुक ई. कोलाय या सूक्ष्मजीवात संकरित करून त्यापासून इन्सुलिनची निर्मिती करता येते. हे इन्सुलिन अधिक प्रमाणात मिळविणे शक्य असल्यामुळे ते कमी दरात उपलब्ध होऊ शकेल.    

प्रबोधन पर्व: काव्याचा खप व काव्यग्रहण या गोष्टी भिन्न..
‘‘समाजशास्त्रीयदृष्टया समाजाची ग्राहकता अनेकविध व्हावयास पाहिजे व अधिक सुशिक्षित झाली पाहिजे. समाजाकडून होणारें वस्तुग्रहण जसें जास्त कार्यकारी होतें तसा तो समाज अधिक समर्थ होतो. .. .. यासाठीं समाजाकडून जें प्रत्यक्ष काव्यग्रहण होतें तो विषय चर्चेचा केला पाहिजे. महाराष्ट्रीय जनतेच्या ज्या अनेक गरजा असतात त्यांत वाङ्मय ही किंवा काव्य ही गरज कितपत आहे ही गोष्ट आपण जाणली पाहिजे आणि तीवरून समाजाची या बाबतींतील उच्चनीचता ठरविली पाहिजे. ज्या समाजाला अधिक वाङ्मयाची गरज आहे तो समाज अधिक विकास पवलेला असें समजण्यास हरकत नाहीं.’’
काव्यग्रहण आणि परीक्षण यातून महाराष्ट्राची अभिरुची कसकशी प्रकट झाली याचा आलेख श्री. व्यं. केतकर यांनी ‘महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण’ (१९२८) मध्ये काढला आहे. ते लिहितात –
‘‘काव्याचा खप व काव्यग्रहण या गोष्टी भिन्न आहेत. पुस्तकाचा खप होणें म्हणजे ग्रहण नव्हे; ग्रहण म्हणजे वाचनहि नव्हे, तर ग्रहण वाङ्मयातील भाग समजानें उपयोगीकरून घेणें होय; या दृष्टीनें वाङ्मयाचे अवलोकन झाले पाहिजे. मराठी राज्यांत जरी या दोन बाबतींत काव्याचा उपयोग पुष्कळ झाला तरी जें काव्य निर्माण झालें त्यांतील शब्द चिरजीवि झाले नाहीत. काव्याचा एकंदर गोळाबेरीज परिणाम मात्र चिरजीवि झाला, व पूर्वीचीं जीं कथानकें होतीं, तीं कथानकें ज्या व्यक्तींवर होतीं, त्या व्यक्तींत शिवाजीमहाराज व संतमंडळी यांखेरीज इतर मंडळाची भर पडली नाहीं, याचें कारण राजपुरुष व कवि यांची एकमेकांच्या कार्यमहत्त्वासंबंधानें अनभिज्ञता हें तर आहेच, पण दूसरीहि कारणें आहेत. शिवाजीइतकी दूसरी कोणतीच व्यक्ति महाराष्ट्रीय मनावर परिणामकारी झाली नाहीं.. ऐतिहासिक वीरपुरुषांस महापुरुषत्व यावें याशिवाय लोकांची दुसरी गरज होती ती म्हणजे सामान्य उपदेशाची वाक्यें होत; तर त्या बाबतींमध्यें अनेक काव्यांमधून लोकांनीं आपणांस आवडणारे अंश काढून घेतले व ग्रहण केले असा सामान्यपणें लोकांच्या काव्यग्रहणाचा अगदीं स्थूल इतिहास देतां येईल’’

All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
Did you know that polyvalent astaxanthin is a natural colorant
Health Special : नैसर्गिक रंग देणारे बहुगुणी ॲस्टाझॅनथीन तुम्हाला माहीत आहे का?
Holi 2024, Natural Colors, Children, Celebrate, Harmful Chemicals, parents, caring tips, skin, eye, infection,
होळीतील रासायनिक रंगाने डोळे, त्वचेच्या आजाराचा धोका! मुलांची विशेष काळजी घेण्याची गरज

मनमोराचा पिसारा: ‘गॅबो’चं प्रेम..
‘गॅब्रिएल गार्सिया माक्र्वेझ’ (किंवा ‘माक्र्विझ’) नावाच्या झंझावाताचं माझ्या आयुष्यात आगमन झालं नि या ‘गॅबो’नं मध्यमवर्गीय, खुसखुशीत आणि गुळगुळीत विचार आणि समाज व्यवस्थेच्या संकल्पनांची वाताहत झाली. गॅबो वाचणं कठीण, पचवणं अधिक जटिल. तो  सत्याची अशी मांडणी करतो की, सत्य जादुई वाटतं. साहित्यविश्वात ‘मॅजिक रिअ‍ॅलिटी’ हा सत्याच्या मांडणीचा उद्गाता म्हणून प्रसिद्ध आहे.
गॅबो कोलंबिअन लेखक, पत्रकार, पटकथा लेखक, टी. व्ही. पर्सनॅलिटी, राजकीय विश्लेषक म्हणून प्रसिद्ध आहे. सर्वसाधारण प्रागतिक लेखक डाव्या विचारानं प्रभावित झालेला असतो असं मानलं जातं. त्यामुळे साहित्याकडे पाहण्याचा प्रागतिक परंतु डाव्या वळणाचा नि पोथीनिष्ठ दृष्टिकोन झाला आहे. गॅबो क्रांतिकारक विचारानं भारलेला आणि राजकीय विचारप्रणालीत ‘सत्या’ला अंतिम मूल्य मानणारा लेखक आहे.
आपल्याकडे अशा परक्या देशातल्या लेखकाविषयी माहिती कमी हे समजण्यासारखं आहे, पण त्याच्याविषयी उत्सुकता नसावी हे दुर्दैव आहे. मुळात साहित्याकडे चारघटका हसून हसून करमणूक म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन दृढ आहे.
गॅबोच्या गोष्टी वाचून आपण बिचकतो. कारण तिथे नातीला धंद्याला लावणारी आजी भेटते, तर कधी सुगंधी समुद्राच्या तळाशी अन्नाचा शोध घेणाऱ्या जेकबला समुद्रात सोडलेल्या नि सडलेल्या प्रेतांच्या सौंदर्याचा मोह पडतो. ‘रेबीज’वर  मंत्र-तंत्राचा उपचार करणारे अंधश्रद्ध पाद्री भेटतात. भूमिगत तळघरं आणि बोगद्यांचा शोध घेऊन ‘रेबीज’ (?) झालेल्या १२ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडणारा ३५ वर्षांचा दुसरा पाद्री भेटतो. सर्वत्र ढासळलेली घरं नि समाज खोटय़ा प्रतिष्ठेनं बडेजाव करणारे बूज्र्वा उमरावजादे भेटतात. ‘नरेची केला किती हीन हा नर’ (/ नारी) याचा ठायी ठायी प्रत्यय येतो.
गॅबोच्या साहित्य प्रकारात मॅजिक रिअ‍ॅलिटीसोबत सररिअ‍ॅलिटी आढळते. सारंच अतिवास्तव पातळीवर घडतंय असं वाटताना हे सारं अवास्तव आहे असंही वाटतं. साल्वोदर दालीनं या सर्रिअ‍ॅलिझमला अत्यंत संयत रूप दिलं. ‘फॉर्म’ची मोडतोड म्हणावी तर त्याचे फॉर्म अत्यंत कोरीव, सौष्ठवपूर्ण वाटतात. इथे गॅबो दालीचा पूर्वसुरी स्पॅनिश चित्रकार व्हेलक्विझची आठवण करून देतो. तेच तंत्र गॅबोनं साहित्यामध्ये वापरलंय. विचित्र-अतक्र्य वाटणाऱ्या गोष्टी सहजपणे आपल्यासमोर घडताहेत, असं वाटतं. साहित्यातली ही प्रत्ययकारिता मनाला भावते. टोचते. जीवनाचं हे दर्शन ब्लीक (काळं निराशावादी) वाटतं. पण गॅबोनं हे सारं जवळून पाहिलं होतं. त्याच्या भोवतालचं वास्तव भीषण होतं. प्रत्यक्षात अर्थात त्याच्या जीवनाला वळण आणि आकार देणारं कुटुंब आणि पुढे पत्नी व मुलं होती. पण या सुबद्ध कुटुंबाच्या पलीकडे दिसणारं जग त्यानं झापडं पाहून पाहिलं नाही. त्याचप्रमाणे विशिष्ट राजकीय विचारांच्या चष्म्यातूनही पाहिलं नाही.
त्याच्या कथेत गरिबी आहे, दारिद्रय़ आहे, गुलामगिरी आहे, सौंदर्य, कौमार्य यांची विटंबना आहे. बेमुर्वतखोर आई-बाप आहेत. लैंगिक आसक्तीनं पछाडलेल्या स्त्रिया आहेत. मात्र गॅबो या वास्तवाचं वर्णन करताना बीभत्स रस परिपोष करीत नाही- काहीसा तिरकस, ब्लॅक ह्य़ूमर तो वापरतो. त्यामुळे आपण कथेमधल्या पात्रांशी एकरूप होत नाही तर एकप्रकारच्या त्रयस्थपणे. एखाद्या निरीक्षकाच्या भूमिकेतून पाहतो. ही गॅबोची खास निवेदनशैली आहे.
गॅबो वास्तवाची कास न सोडताही गूढवादी होतो. कादंबरीमधील नायक-नायिकेच्या परस्पर आकर्षणाला जितकी शारीरिकता आहे तितकाच परतत्त्वाचा स्पर्श आहे. हे गॅबो दोन-चार वाक्यांत ठसवतो. उदा. इनोसंट एरिंड्िंगमधली नायिका युलिसिस या नायकाला फक्त हाक मारते आणि त्याला अनेक मैलांवर ती सहज ऐकू येते. तर ऑफ लव्ह अ‍ॅण्ड अदर डेमन्समधील कुमारिकेला नायकाच्या स्पर्शानं आध्यात्मिक जाणिवा प्राप्त होतात.
गॅबोच्या साहित्यामध्ये सर्वात भिडणारी गोष्ट म्हणजे त्याचं ‘प्रेम’! ‘प्रेम’ ही भावना शारीरिक आसक्ती पार करून अधिक उन्नत होते. मानवाचं खरं स्वरूप अशा प्रेमामधून झळाळतं यावर गॅबोचा विश्वास होता. ग्रेस, जी ए कुलकर्णीच्या पलीकडे साहित्यशोध घेणाऱ्यांनी, किरण नगरकर आणि विलास सारंग यांची पुस्तकं वाचणाऱ्यांनी गॅबो सोडू नये. चिकाटीने वाचावा लागेल इतकंच.
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com