दोन सारख्याच आकारमानाचे डबे घेतले. एका डब्यात काठापर्यंत कुरमुरे भरले व दुसऱ्या डब्यात काठापर्यंत तांदूळ भरले. तांदळाने भरलेला डबा जड लागतो पण कुरमुऱ्यांनी भरलेला डबा मात्र तुलनेने हलका लागतो. दोन्ही डबे सारख्याच आकाराचे, कुरमुरे तांदळाचेच बनलेले असतात. मग एक डबा हलका व दुसरा जड, असे का होते?

How Sugar Effects On body can digestive cookie make you fat
बिस्किटाच्या पुड्यात किती साखर असते? क्रीम, गोडाची व चटपटीत बिस्किटांची निवड करताना काय बघावं?
heat wave, heat control action plan,
विश्लेषण : उष्णतेची लाट म्हणजे काय? उष्णता नियंत्रण कृती आराखडा कसा तयार केला जातो?
Surya Gochar 2024
Surya Gochar 2024 : २४ तासांमध्ये पालटणार ‘या’ राशींचे नशीब, एका महिन्यात मिळणार भरघोस पैसा अन् यश
How To Avoid White Clothes Getting Stain Of Color Dresses
Video: कपडे धुताना ‘हा’ पांढरा खडा वापरून वाचवा पैसे; बादलीत एका कपड्याचा रंग दुसऱ्याला लागणारच नाही

असे होण्याचे कारण घनता.

कुरमुरे करताना तांदळाचा प्रत्येक दाणा फुगतो. म्हणजेच त्याचे आकारमान वाढते. आकारमान वाढल्याने एक डबाभर तांदळाचे सर्व  कुरमुरे  त्याच डब्यात भरले तर ते त्या डब्यात मावत नाहीत. काही कुरमुरे बाहेर राहतात. कारण  कुरमुऱ्यांचे आकारमान वाढलेले असते.

वस्तूचे वस्तुमान व आकारमान यांच्या गुणोत्तरास घनता म्हणतात. वस्तुमानाचे एकक ग्रॅम व आकारमानाचे एकक घन सेंटीमीटर म्हणून ग्रॅम प्रति घनसेंटीमीटर हे घनतेचे एकक आहे. वरील उदाहरणात तांदळाच्या एका दाण्याचे वस्तुमान व त्याचे आकारमान यांचे गुणोत्तर (भागाकार) घेतल्यास काहीतरी संख्या मिळेल. त्याच तांदळाचा कुरमुरा बनविल्यास, त्या कुरमुऱ्याचे आकारमान मूळ तांदळाच्या दाण्यापेक्षा वाढलेले असेल. आकारमानातील या वाढीमुळे मूळ तांदळाची घनता व कुरमुऱ्याची घनता यात फरक मिळेल. तांदळाची घनता जास्त असेल; तर त्या पासून बनलेल्या कुरमुऱ्याची घनता कमी असेल.

वेगवेगळ्या धातूंची घनता वेगवेगळी असते.

याचाच दुसरा अर्थ , सारख्याच आकारमानाचे वेगवेगळ्या धातूंचे ठोकळे घेतल्यास त्यांचे वस्तुमान भिन्न असेल.

त्याचाच तिसरा अर्थ; सारख्याच वस्तुमानाचे वेगवेगळ्या धातूंचे ठोकळे घेतल्यास त्यांचे आकारमान भिन्न असेल.

याचे व्यवहारातील उदाहरण बघू.

१० ग्रॅम शुद्ध सोन्याचा  एक ठोकळा  केल्यास, त्याचे आकारमान ०.५२ घनसेंटीमीटर असेल; परंतु तितक्याच वस्तुमानाचा म्हणजे १० ग्रॅम शुद्ध अ‍ॅल्युमिनियमचा ठोकळा केल्यास, त्याचे आकारमान ३.७ घनसेंटीमीटर असेल.

असे का होते?

शुद्ध सोन्याची घनता १९.३२ ग्रॅम प्रति घनसेंटीमीटर तर शुद्ध अ‍ॅल्युमिनियमची घनता २.७० ग्रॅम प्रति घनसेंटीमीटर आहे. शुद्ध सोन्याची घनता ही शुद्ध अ‍ॅल्युमिनियमच्या घनतेपेक्षा जास्त आहे.

शुद्ध धातूची घनता माहीत असल्याने वस्तुमान व आकारमान  मोजून त्या धातूची शुद्धता तपासता येते.

डॉ. हिरण्मयी क्षेमकल्याणी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२   

office@mavipamumbai.org

 

व्यापक अशांतीत समन्वय आणणं, हे साहित्याचं लक्ष्य

१९७९ चा ज्ञानपीठ हा सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, ‘पुरस्कार समर्पण समारंभात पुरस्कारप्राप्त साहित्यिकाचे विचार व्यापकपणे मांडले जाणे स्वाभाविक आहे आणि योग्यही आहे. माझ्या दृष्टीने या मागे दोन सुनिश्चित मूल्ये आहेत .. एक हे की, .. भलेही भारतीय साहित्य अनेक भाषांतून लिहिले जावो, पण मूलत: हे एकच आहे.. यामध्ये एक स्वर असा आहे की, जो सगळ्या भारतीय भाषांमधील साहित्याला व्यापून उरलेला आहे. हा स्वर मानवतेचा, करुणेचा, परस्पर सहिष्णुतेचा आणि सार्वत्रिक समन्वय-भावांचा. ही तत्त्वे आमच्या बहुभाषारूपी साहित्याला संग्रहित करतात. त्यामुळे राष्ट्राच्या आंतरिक एकतेला पोषण मिळते, मानवाच्या मुक्तीतही ते सहायक बनतात.

या पुरस्कार योजनेचं दुसरं वैशिष्टय़ हे आहे की, विभिन्न भाषांमधील, विविध साहित्यिक कृतीमधून साहित्य निवडण्याची प्रक्रिया; जी समीक्षा जगतासाठी एक महत्त्वपूर्ण घटना बनते. स्वभावत:च विभिन्न भाषांचे, क्षेत्रिय साहित्याचे आपले आपले मापदंड आहेत. भारतीय ज्ञानपीठाने हे सगळे आत्मसात करत मूल्यांकनाची एक सर्वग्राही अशी पद्धती विकसित केलेली आहे. काही काळाने ही पद्धती संपूर्ण भारतातील साहित्याच्या मूल्यांकनाची पद्धती म्हणून स्वीकारली जाऊ शकते. लेखकासाठी तर अशा पद्धतीच्या आधारे केलेली निवड अत्यंत मूल्यवान ठरते..

जीवनातील व्यापक अशांतीमध्ये समन्वय आणि सामंजस्य आणणं हे साहित्याचं लक्ष्य असतं आणि हे मोठय़ातल्या मोठय़ा लेखकासाठीही, सामान्य काम असत नाही.  एकदा एका भारतीय राजनीतिज्ञ विचारवंताने म्हटलं होतं की, २० व्या शतकाचे वैशिष्टय़ हे आहे की, यावेळी विश्वभरातील जनसमुदाय अन्यायाविरुद्ध विद्रोह करून उठला आहे. .. ..  अशामध्ये साहित्याचा आणि साहित्यिकांचा प्रथमतम धर्म हाच आहे की, जीवन जगतानाचा केंद्रबिंदू संपूर्ण मानव असेल, अक्षत मानवप्राणी असेल असा प्रयत्न करणं, दिशाहीन मानवाला स्वत:मध्ये परत आणणं, हे त्याच्या सृजनाचं लक्ष्य असायला हवं. आज आमचं लक्ष्य ते नाही, हे दुर्दैवाने म्हणावं लागेल. ते आम्हाला निर्माण करावं लागेल.. मी स्वत: सत्याचा शोध ही एक चिरंतन प्रक्रिया आहे असं मानतो. त्यामुळे माझा दृष्टिकोन हा अनेकान्तवादी आहे. निश्चयात्मकतावादी नाही.. लेखकाचा धर्म आहे की, त्याने या युगाच्या सामूहिक विद्रोहामुळे त्रासून, आपल्या कल्पनाविश्वात रममाण होऊन जाता उपयोगाचे नाही. त्याला या हिंस्रतेशी सामना द्यावाच लागेल. माझ्या तीन कादंबऱ्या ‘इयारूइंगम्’, ‘प्रतिपद’ आणि ‘मृत्युंजय’ याचे उत्तम उदाहरण आहे.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com