डॉ. यश वेलणकर

‘इमोशनल इंटेलिजन्स’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक डॉ. डॅनिएल गोलमन यांनी ‘डीस्ट्रक्टिव्ह इमोशन्स अ‍ॅण्ड हाऊ वुई कॅन ओव्हरकम देम’ या शीर्षकाचे एक पुस्तक लिहिले आहे. त्यात ध्यानाचे चार प्रकार व त्यांचे मेंदूत दिसणारे परिणाम याविषयी चर्चा केली आहे. ही चर्चा ‘माइंड अ‍ॅण्ड लाइफ रिसर्च इन्स्टिटय़ूट’ने भारतातील धरमशाला येथे पार पडलेल्या परिषदेतील आहे. त्यात सहभागी शास्त्रज्ञ आणि त्यांचे संशोधन वैशिष्टय़पूर्ण आहे. त्यातील डॉ. रिचर्ड डेव्हिडसन यांनी ध्यानाचे मेंदूवर होणाऱ्या परिणामांवर, डॉ. पॉल एकमन यांनी चेहऱ्यावर दिसणाऱ्या भावनांवर, डॉ. ओवेन फ्लॅनागण यांनी विचारांचा भावनांवर होणाऱ्या परिणामावर आणि डॉ. मार्क ग्रीनबर्ग यांनी उत्क्रांती मानसशास्त्र या विषयात संशोधन केले आहे. डॉ. गोलमन आणि दलाई लामा हेही या चर्चेत सहभागी झाले होते.

Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
Israel use of AI in war revealed in reports by Israeli and Palestinian journalists
इस्रायलकडून युद्धात ‘एआय’चा वापर? इस्रायली आणि पॅलेस्टिनी पत्रकारांच्या अहवालात खुलासा
How to choose a perfectly ripe pomegranate with expert tips
रसाळ, लाल दाणे असलेले डाळिंब कसे ओळखावे? उत्तम प्रकारे पिकलेले डाळिंब कसे निवडावे? तज्ज्ञांनी सांगितल्या खास टिप्स
Moscow concert hall attack suspects confess
मॉस्को हल्ल्याप्रकरणी चौघांचा कबुलीजबाब

पॉल एकमन यांनी या चर्चेत सांगितले की, माणूस कोणत्याही संस्कृतीमध्ये वाढलेला असो, कोणत्याही वंशाचा असो; चेहऱ्यावरील भावना ओळखण्याची पद्धत सर्वदूर सारखीच आहे. आज माणसाचे अनेक वंश आणि विविध संस्कृती असल्या, तरी सर्वाची उत्क्रांती सारखीच झालेली आहे. राग आणि उदासी या भावना उत्क्रांतीमधूनच विकसित झालेल्या आहेत.

डॉ. डेव्हिडसन यांनी मेंदूत भावना कशा प्रकट होतात व त्यावर साक्षीध्यानाचा कोणता परिणाम होतो, हे सांगितले. राग, भीती, उदासी या विघातक भावनांची तीव्रता भावनिक मेंदूतील ‘अमीग्डला’च्या उत्तेजनावर अवलंबून असते. मनात या भावना असतात तेव्हा मेंदूतील ‘प्री-फ्रण्टल कॉर्टेक्स’ हा भागही उत्तेजित झालेला असतो. ‘प्री-फ्रण्टल कॉर्टेक्स’चे उत्तेजन हे ‘अमीग्डला’ला- म्हणजेच विघातक भावनांना नियंत्रणात ठेवण्यासाठी असते. कारण ‘पोस्ट-ट्रॉमॅटिक डिसऑर्डर’ किंवा व्यक्तिमत्त्वविषयक आजार असल्याने ज्यांना राग, चिंता नियंत्रित करता येत नाही, अशांच्या मेंदूत ‘प्री-फ्रण्टल कॉर्टेक्स’चे उत्तेजन दिसून येत नाही. पण ‘अमीग्डला’ उत्तेजित झालेला असतो. साक्षीध्यानाच्या वेळी नेमकी याच्या उलट स्थिती मेंदूत असते. या वेळी ‘प्री-फ्रण्टल कॉर्टेक्स’चे उत्तेजन दिसते, पण ‘अमीग्डला’ शांत असतो. साक्षीध्यानामुळे विघातक भावना कमी होतात. एकाग्रता ध्यान, कल्पना दर्शन व करुणा या अन्य तीन ध्यान प्रकारांचेही मेंदूत वेगळे परिणाम दिसतात.

 yashwel@gmail.com