कोणत्याही कारखान्याला ज्याप्रमाणे कच्च्या मालाची गरज असते, त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये अनेक रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी कच्च्या मालाची गरज असते. ही गरज आपल्या आहारातून पूर्ण केली जाते. आहारामध्ये समाविष्ट असलेले अन्नपदार्थ म्हणजे वेगवेगळे रासायनिक पदार्थच आहेत. आपण जे अन्न खातो ते अर्थातच वनस्पती किंवा प्राणी यांपासून मिळवलेलं असतं. प्रथिनं, कबरेदकं आणि स्निग्ध पदार्थ या घटकांनी हे अन् न बनलेलं असतं. अन्न खाल्ल्यावर पचनसंस्थेद्वारे त्याचं पचन घडवून आणलं जातं. मग हे पचलेले पदार्थ आपल्या रक्तात शोषले जाऊन ते शरीरातल्या सर्व पेशींपर्यंत पोहोचवले जातात. गंमत म्हणजे, आपलं शरीर ज्या पेशींनी बनलेलं आहे, त्या पेशींमध्येसुद्धा प्रथिनं, कबरेदकं आणि स्निग्ध पदार्थ असे नेमके हेच घटक असतात. मग प्रश्न असा पडतो की, अन् नातल्या या घटकांवर पचन प्रक्रिया होण्याची गरज का असते?
अन्नपदार्थात प्रथिनं, कबरेदकं आणि स्निग्ध पदार्थाचे जे रेणू असतात ते आकाराने मोठे असल्याने जसेच्या तसे रक्तामध्ये शोषले जाणं शक्य नसतं. म्हणूनच खाल्लेल्या अन्नाचं पचन घडवून आणणं आवश्यक ठरतं. पचनप्रक्रियेत अन्नपदार्थामधील मोठय़ा आणि जटिल रेणूंवर वेगवेगळ्या विकरांची क्रिया होऊन त्यांचं रूपांतर आकाराने लहान असलेल्या रेणूंमध्ये होतं. उदाहरणच द्यायचं तर अमिनो आम्लांचे रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या प्रथिनांचं जेव्हा पचन होतं तेव्हा ही अमिनो आम्लं एकमेकांपासून वेगळी होतात. हीच गोष्ट कबरेदकं आणि स्निग्ध पदार्थाच्या बाबतीतसुद्धा घडून येते.
पचन झालेल्या अन्नपदार्थाचे रेणू आतडय़ांमार्फत शोषले जाऊन रक्तामध्ये मिसळतात. रक्त पोस्टमनप्रमाणे काम करतं आणि हे रेणू शरीरातल्या पेशींपर्यंत पोहोचवले जातात. पेशी त्यांना हवे असतील ते आणि हवे त्या प्रमाणात रक्तातून हे पदार्थ शोषून घेतात. पेशीमध्ये शोषून घेतलेल्या लहान आकारांच्या रेणूंची पुन्हा जुळणी होऊन प्रथिनं, कबरेदकं, स्निग्ध पदार्थ तयार होतात.
पेशींची गरज भागल्यावर उरलेली कबरेदकं यकृतातल्या पेशींमध्ये ग्लायकोजेनच्या स्वरूपात साठवले जातात तर अतिरिक्त स्निग्ध पदार्थ चरबीच्या रूपात शरीरात जमा होतात.

प्रबोधन पर्व: ध्येयासोबत चारित्र्यही हवेच
‘‘काही लोक असे म्हणतील की, आपल्या हिंदू राष्ट्राचा विचार आपण मांडला तर सर्व लोक तो विचार मानणार नाहीत. परंतु हे सत्य काही लोक आज मान्य करोत वा न करोत त्यामुळे काही बिघडत नाही. आपला दृष्टिकोन स्पष्ट असेल आणि त्याबाबतीत आपल्या मनात पूर्ण विश्वास असेल तर मग आग्रहपूर्वक प्रतिपादन केल्यानंतर जी बाब सत्य आहे ती बाब लोक मान्य करावयास लागतील.. एखादा जर असे म्हणेल की, हा विश्वास मानावयास मी तयार नाही तर तो त्याचा दुबळेपणा आहे. आपापल्या क्षेत्रात विशेषकरून आपला सुस्पष्ट असा भाव अधिकाधिक प्रमाणात आपण लोकांना समजावून सांगितला तर नवीन नवीन मंडळी आपल्याजवळ येतील आणि आपले काय म्हणणे आहे तेही चांगल्या प्रकारे समजावून घेतील. यात कठीण असे काहीच नाही. पण आपणच दुबळे बनून आपल्या ध्येयाच्या संबंधात लाचारीने बोलावयास लागलो तर मग साराच ग्रंथ आटोपेल आणि मग ध्येयाला पोषक ठरण्याऐवजी ही एक संकट उत्पन्न करणारी बाब ठरेल.’’
गोळवलकर गुरुजी ध्यास आणि चारित्र्याविषयी (श्री गुरुजी समग्र दर्शन, खंड-दोन) म्हणतात – ‘‘ध्येयाबरोबरच आपण चारित्र्याचाही आदर्श ठेवला पाहिजे. आपण, सर्वाना समान असे एक राष्ट्रीय आणि सार्वजनिक चारित्र्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला असून त्यात काही अंशी आपल्याला यशही मिळालेले आहे. डॉ. मुंजे स्मारक समितीकडून निधिसंकलनासाठी जनतेला आवाहन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.. त्यात दक्षिणेतून राजाजींचे नाव होते. त्यांना भेटून त्यांची परवानगी घ्यावी म्हणून मी आपल्या मद्रास शाखेच्या संघचालकांना पत्र पाठवून सूचित केले.. राजाजी म्हणाले, ‘‘माझा त्यांच्यावर भरवसा आहे. ज्या कार्यासाठी ते पैसा गोळा करतील त्यावरच तो खर्च करतील.’’ त्यांनी विनंतिपत्रकावर सही केली. लोक आपल्यावर कसा विश्वास टाकतात त्याचे हे एक उदाहरण आहे. म्हणून आपल्याला जी निरनिराळ्या प्रकारची कामे करावयाची आहेत त्यात आपला व्यवहार अतिशय शुद्ध असला पाहिजे.’’

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
Clean Intestine In 20 Minutes In Morning With These Simple Five Asanas How Much Luke Warm Water To Drink First After Waking Up
Video: सकाळी उठताच १५ मिनिटांत पोट स्वच्छ होण्यासाठी करा ‘या’ पाच कृती; कोमट पाणी पिण्याचं प्रमाणही पाहा
March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….

मनमोराचा पिसारा: डॉकिन्स : सहृदयी ‘डोळस’!
रिचर्ड डॉकिन्स हे विज्ञानवादी साहित्यामधील अग्रगण्य नाव आहे. मानवी उत्क्रांती, मानवी जीवनामधील गुणात्मक बदलामागील विज्ञान विचार याविषयी डॉकिन्स हिरिरीने मांडतात. प्रा. रिचर्ड डॉकिन्सबद्दल उत्सुकता वाटत होती, कारण त्यांच्या लिखाणातून सूक्ष्मपणे विनोद जाणवायचा. लेखक ‘दिसतो कसा आननी?’ प्रमाणे वैज्ञानिक दिसतो कसा, वावरतो कसा? याविषयी जिज्ञासा होती.
‘एनिमीज् ऑफ रीझन’ या डॉकिन्स यांनी प्रस्तुत केलेल्या दोन भागांतील माहिती चित्रपटामधून त्यांचा परिचय झाला.
विज्ञान म्हणजे तर्कशुद्धविचार आणि अंधश्रद्धा म्हणजे पुरावाविरहित, सत्याच्या कसोटय़ांवर न उतरणारे थोतांड कसे असते यावरील डॉक्युमेंट्री पाहणं अत्यंत रम्य अनुभव आहे.
केवळ पुरावाविरहित दाव्यांवर विश्वास आणि त्याच्या पुष्टीकरता केवळ व्यक्तिगत अनुभवांवर आधारलेले किस्से म्हणजे अंधश्रद्धा. तर विज्ञान म्हणजे डोळस अवलोकन, सूक्ष्म निरीक्षण, प्रयोगनिष्ठ पुरावे आणि तर्काधिष्ठित विश्लेषण.
विज्ञानामधील वैज्ञानिकाची भूमिका स्वअनुभवापेक्षा सार्वत्रिक प्रयोगसिद्ध निष्कर्ष आणि आपली विधानं किंवा अनुमानं पुन्हा तपासून सत्याचा कसून शोध घेण्याची तयारी आणि मनाची लवचीकता, असं डॉकिन्स sam06म्हणतात.
आपली पुरावारहित समजूत अशी आहे की, अशी अंधश्रद्धा आपल्यासारख्या अशिक्षित अडाणी समाजात अधिक आहे. डॉकिन्स यांनी इंग्लंड (पाश्चिमात्य) देशातल्या अंधश्रद्धा कोणत्या थराला पोहोचल्या आहेत इथून सुरुवात करतात. त्यामध्ये टॅरो कार्ड वाचणारे आणि होराशास्त्री (पत्रिका, राशी इ.) यांच्याशी ते संवाद साधतात.
राशीनुसार मांडलेल्या भविष्यासंबंधी ते मजेशीर प्रयोगही करतात. एका विशिष्ट राशीमधील व्यक्तीचं स्वभाववर्णन आणि पुढील काही दिवसांतील होरा याचं माहितीपत्रक ते होरातज्ज्ञ (तथाकथित) यांना वाचायला देतात, तेव्हा त्या स्वभावाशी आपली जुळवणूक होते असं ते म्हणतात. ते स्वभाववर्णन केवळ आपलेच आहे, असं वस्तुत: त्या एका राशीतल्या व्यक्तीनेच म्हणायला हवं होतं, पण तसं झालं नाही! त्यामधून, असल्या बोलघेवडय़ा राशीतज्ज्ञाचं अज्ञान उघड झालं.
डॉकिन्स तोच धागा पकडून मृत व्यक्तींच्या आत्म्याशी संवाद करणारे ‘मीडियम’ यांना भेटतात. त्यामधून, त्या मीडियम मंडळींचा चलाखपणा आणि माणसांचा स्वभाव ओळखून त्यांना गुंतवून ठेवण्याचे त्यांचे कसब सिद्ध होते. डॉकिन्स अर्थातच अशा अंधश्रद्धांचं मूळ मानवी स्वभावामध्ये कसं आणि कुठे दडलंय याचं विश्लेषण करतात. मानसशास्त्रातच या सर्व गोष्टींचा उलगडा करण्याचे सामथ्र्य आहे!
परंतु, हे सर्व करीत असताना डॉकिन्समध्ये कोणताही तुच्छतावाद दिसत नाही. अंधश्रद्धाळू व्यक्ती मूर्ख नसून भाबडी असतात, दु:खी, कष्टी आणि जगरहाटीनं गांजलेली असतात. याचं भान ते ठेवतात. असा सहृदयी अ‍ॅप्रोच असला तरी ते आपला ठामपणा सोडत नाहीत. त्यांना मानवी विश्वातल्या अंधश्रद्धांची चिंता असल्याची जाणीव होते.
यूटय़ूबवर रिचर्ड डॉकिन्स; एनिमीज् ऑफ रीझन शोधून पाहा.. डोण्ट मिस!!
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com
*डॉकिन्स यांचे रेखाचित्र : डेल्फ-अ‍ॅम्बी, डीव्हियन्टआर्ट