पचन प्रक्रियेत विकरं खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. अन्नाचा घास आपण तोंडात घेतो अगदी तेव्हापासून या विकरांचं काम सुरू होतं. अन्न जेव्हा चावलं जातं तेव्हा तोंडातली लाळ या अन्नपदार्थामध्ये मिसळते. लाळेमध्ये टायलिन किंवा अमायलेज नावाचं विकर असतं. हे विकर अन्नातल्या काही कबरेदकांचं रूपांतर शर्करेत घडवून आणतं. त्यामुळेच पोळी, भाकरी किंवा ब्रेड काहीही न लावता नुसतं चावत, चघळत राहिलं तर त्याची चव गोडसर लागते. यानंतर अन्न जेव्हा जठरात पोहोचतं तेव्हा त्यात जठरातून स्रवणारा जाठररस मिसळतो. या जाठररसामध्ये असणाऱ्या पेप्सिन नावाच्या विकराच्या मदतीने प्रथिनांचं पचन घडवून आणलं जातं.
पेप्सिनखेरीज जाठररसात आणखी एक महत्वाचं रसायन असतं, ते म्हणजे हायड्रोक्लोरिक आम्ल! १.५ ते २.० इतका सामू असलेलं हे तीव्र हायड्रोक्लोरिक आम्ल पेप्सिनच्या क्रियेसाठी लागणारी आम्लता उपलब्ध करून देतं. इतकंच नाही तर अन्नाद्वारे शरीरात शिरू पाहणारे बरेचसे रोगजंतू या तीव्र आम्लामुळे नष्ट होतात. आपण जे तंतुमय अन्न खातो ते मऊ करून पचनाला सोपं करण्याचं काम हे आम्ल करतं. कधी कधी या आम्लाचं प्रमाण वाढतं आणि आपल्याला त्याचा त्रास व्हायला लागतो. यालाच आपण ‘आम्लपित्त’ किंवा ‘अ‍ॅसिडीटी’ म्हणतो.
लहान आतडय़ांमध्ये यकृतातला पित्तरस, स्वादुिपडातला स्वादुरस आणि लहान आतडय़ात स्रवणारी वेगवेगळी विकरं यांच्या एकत्रित परिणामाने अन्नातल्या वेगवेगळ्या घटकांचं पचन घडून येतं. पेप्सिनच्या क्रियेसाठी जशी आम्लता आवश्यक असते तशीच लहान आतडय़ात स्रवणारी आणि स्वादुरसातली सगळी विकरं अल्कली माध्यमातच अभिक्रिया घडवून आणू शकतात. यकृतातून स्रवणारा पित्तरस अन्नाला अल्कलियुक्त बनवतो आणि मोठय़ा मेदकणांचे लहान कणांमध्ये रूपांतर करतो. त्यामुळे विकरांची क्रिया जलद होते.        
आपल्या पचनेद्रियांच्या आतील भागावर एक श्लेष्मल आवरण असतं. हे आवरण जर नसतं तर शरीरात स्रवणाऱ्या तीव्र आम्लाचा आणि इतर विकरांचा परिणाम जसा खाल्लेल्या अन्नावर होऊन त्याचं पचन होतं त्याप्रमाणेच पचनेंद्रियांचही पचन झालं असतं!

प्रबोधन पर्व: हुकूमशाहीच्या आरोपांची चिंता नको..
‘‘आपण सर्वजण संघटना करावयास निघालो आहोत, फूट पाडायला नाही, याचा विचार आपण केला पाहिजे. आम्ही कधी फूट पडू देणार नाही. संघटनेचेच कार्य सतत सुरू राहील असा आपल्यातील प्रत्येकाने विचार करून आपल्या भोवताली जे आपले बांधव आहेत त्यांच्यातही हाच विचार रूजवावा. छोटय़ा छोटय़ा गोष्टीवरून कार्यकर्त्यांमध्ये आपापसात मतभेद होतात आणि त्यामुळे ते नाराजही असतात.. असे प्रसंग वारंवार येणार नाहीत या दृष्टीने आम्हाला विचार केला पाहिजे. लहान लहान बाबी आपल्या मनाला इतक्या का लागाव्यात हेच माझ्या लक्षात येत नाही. वास्तविक असे होऊ  देऊ  नये. आपसात थोडेदेखील मनोमालिन्य येऊ  देता कामा नये. प्रत्येक बाबतीत संघाचाच विचार असला पाहिजे. एखाद्या बाबतीत जर आपल्या सहकाऱ्यांनी घेतलेला निर्णय आपल्यापुढे आला तर ‘हा निर्णय कसा काय घेतला गेला, असा निर्णय घेतला जाणार नाही असे आम्हाला वाटत होते’ – असा विचार कदापि मनात येऊ  देऊ  नये.’’
गोळवलकर गुरुजी रा. स्व. संघाविषयी (श्री गुरुजी समग्र दर्शन, खंड-दोन) म्हणतात – ‘‘विद्यार्थी, राजकारण, कामगार आदी निरनिराळ्या कार्यक्षेत्रांत आपले कार्यकर्ते काम करीत आहेत. या कार्याची रचना, घटना, नियम, व्यवहार वगैरे भिन्न भिन्न प्रकारचे आहेत. तरीही आपला स्वयंसेवक तेथे आपल्या संघटनेची जी धारणा आहे त्या धारणेसह जातो आणि ती धारणा तेथे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो.. असे करताना जर लोक असे म्हणतील की, ही मंडळी या ठिकाणीसुद्धा आपल्या संघाची हुकूमशाहीच चालविण्याचा प्रयत्न करीत आहेत.. जे लोक असे म्हणतात त्यांना हुकूमशाही ही काय चीज असते हे माहीत नाही. आपल्या कार्यात हुकूमशाहीचा लवलेशही नाही. येथे तर जास्तीत जास्त प्रमाणात सर्वाच्या सामूहिक इच्छेनेच कार्य होते, यालाच हुकूमशाही समजून लोक वाटेल त्या प्रकारचे आरोप करीत असतील तर ते त्यांना करू द्या. त्याची चिंता न करता राष्ट्रसंघटनेचे सूत्र आपल्या निरनिराळ्या कार्यक्षेत्रात प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी सर्वानी प्रयत्नशील असले पाहिजे.’’

All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Mahanirmiti Koradi Bharti 2024
Nagpur Jobs : महानिर्मिती कोराडी येथे १९६ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, आजच अर्ज करा
Why HbA1c test important for diabetes diagnosis Who should do it and how consistently
विश्लेषण : HbA1c चाचणी मधुमेह निदानासाठी महत्त्वाची का आहे? ती कुणी आणि किती सातत्याने करावी?

मनमोराचा पिसारा:  ध्यानधारणेतील छुपे धोके
ध्यानधारणा, समाधीअवस्था, योगासनं अशा तथाकथित आध्यात्मिक क्रिया-प्रक्रिया परदेशात, विशेषत: पश्चिम युरोप आणि उत्तर अमेरिकेतल्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरील प्रदेशांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. सॅनफ्रान्सिस्को, लॉस एंजेलिससारख्या शहरात तर इंडियन करी रेस्तराँपेक्षा कितीतरी अधिक ठिकाणी ‘योग टीचिंग सेंटर’ आहेत.
या पाश्र्वभूमीवर ‘डेल पे’ या पौर्वात्य शिक्षकाचे ‘हिडन डेंजर्स ऑफ मेडिटेशन अ‍ॅण्ड योग’ या आकर्षक नावाचे पुस्तक अधिक अर्थपूर्ण वाटते.  हे पुस्तक ध्यानधारणा पद्धतीच्या साधक, अभ्यासक आणि समीक्षक सर्वाना भरपूर माहिती, समज आणि उपयुक्त सूचना प्रस्तुत पुस्तकात मिळते.
त्याचं ‘ध्यानधारणेमधील छुपे धोके’ असं काहीसं नकारात्मक मराठी भाषांतर होत असलं तरी हा टीकात्मक ग्रंथ नसून ध्यानधारणा प्रक्रियेची सांगोपांग चर्चा डेल पे यांनी इथे केलेली आहे. ही प्रक्रिया नीट न समजल्याने अनेक धोके संभवतात. अशा वेळी ध्यानधारणा पद्धतीवर टीका न करता, हे ज्ञान टाकाऊ न मानता, साधकांनी काय चुका केल्या? प्रक्रियेतल्या कोणत्या पायरीवर साधक अडकले? यावर टिप्पणी केली आहे. काही ठिकाणी ‘मेडिटेशन’कडे साहस म्हणून न पाहता, मनोभूमीत मार्गदर्शकाच्या सोबतीने केलेले भ्रमण आहे, आत्मशोध आहे असा युक्तिवाद त्यांनी केला आहे. मेडिटेशन करताना येणाऱ्या अडचणी म्हणजे मन सैरभैर होणे, प्रवृत्तीकडे न वळता आत्ममग्न होऊन वास्तवापासून पराङ्मुख होणे, चिडचिडणे, प्रापंचिकांकडे तुच्छतेने पाहणे, शरीरातील तप्त ऊर्जेचा विनियोग कल्याणकारी न होता त्याचे रूपांतर शारीरिक व्याधीमध्ये होणे अशा छुप्या धोक्यांची त्यांनी यादी दिली आहे. त्याचप्रमाणे, साधकांनी ध्यानधारणा प्रक्रियेची पूर्ण माहिती न घेता, अर्धवट सोडून देणे, आत्ममग्न म्हणजे अंतज्र्ञानाचा शोध हे कळून न घेता, जगाशी विन्मुख होण्याची वांझोटी प्रक्रिया असा ध्यानधारणेवर आरोप करणे, असे धोकेही संभवतात.
ध्यानधारणा ही प्रक्रिया ‘इंडियन करी’सारखी असते. त्यात ‘इन ग्रेडिअंट’ असतात, तर काही केवळ ‘मसाले’ असतात. मसाल्यांच्या वापराने इंडियन करी वेगवेगळ्या स्वाद, गंध, रूप आणि चव स्वरूपात उपलब्ध असते. त्याचप्रमाणे ध्यानधारणेमधील मुख्य घटक कोणता आणि गरजेनुसार त्यामधले काही घटक प्रमाणात बदलता येतात.
डेल पे यांनी ध्यानधारणेचे आठ प्रकार सुरुवातीला दिले असून अर्थात कोणासाठी कोणती पद्धत अधिक उपयुक्त ठरेल याच्या सूचना डेल यांनी दिलेल्या आहेत. ते ध्यानधारणेचे प्रकार असे..
(१) अमूर्त ध्यानधारणा : मंत्रोच्चारविरहित प्रक्रिया, शारीरिक जाणिवांपलीकडे जाऊन मानसिक अवकाशाची स्पंदने आणि प्रसरण सरावाच्या मदतीने ही मनोवस्था हुरूप वाढवते आणि तणाव कमी होतो.
(२) मूर्त ध्यानधारणा : मंत्राच्या साहाय्याने ध्यानधारणा करणे. या प्रक्रियेमध्ये एखाद्या विशिष्ट विचारांवर लक्ष एकाग्र करता येते. व्यवहारातील समस्या, जटिल प्रश्न, ठाम निर्णय अशा उपयुक्त उद्दिष्टांसाठी ही प्रक्रिया उत्तम. अभियंते, स्थापत्यतज्ज्ञ, धोरण आखणारे यांना या प्रक्रियेचा उपयोग होतो.
(३) अंतर्मुख ध्यानधारणा : सभोवतालच्या वातावरणातले प्रश्न कसे निर्माण झाले, स्वत:मधल्या कडू आठवणी, यावर लक्ष केंद्रित करून त्याचे मूळ शोधणे. या प्रक्रियेमधून नवे उपाय आणि विचारांच्या दिशा शोधता येतात. इतिहासातील चुका कशा घडल्या, त्यातून काय शिकता येईल हे समजते.
(४) व्याधीमुक्ती ध्यानधारणा : शरीरातले छुपे दोष, मन शारीरिक संबंधांमधून उद्भवणाऱ्या व्याधी कशा उत्पन्न होतात, शरीरात अंगभूत ऊर्जा केंद्रे कोणती? ती कशी कार्यान्वित करावी. लोकप्रिय पद्घती.
(५) विशेष ध्यानधारणा : कुंडलिनी जागृती, चक्रध्यान यांच्या मदतीने उन्मनावस्था आणि विशेष आध्यात्मिक जाणिवा यासाठी जपून-अतिजपून करावे. त्याचप्रमाणे ध्यानधारणा शिक्षकांकरिता कोणत्या प्रक्रिया वापराव्या, सांघिक पातळीवरील धारणा पद्धतीतील ऊर्जा आणि विश्वशांतीसाठी ध्यानउपासना. अशा ध्यानधारणा पद्धतीवर ‘डेल पे’ यांनी भर दिलाय.
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com