चित्रपटांत अनेकदा जुना वाडा दाखवला जातो, तिथे भतांचा वावर आहे असं दाखवायचं असतं. सावल्यांचा खेळ, विचित्र आवाज यांच्या जोडीला हमखास असणारा भाग म्हणजे नळातून पाण्याऐवजी वाहणारे रक्त – भीती पसरविण्याचा हमखास उपाय! भूतबीत काही नव्हतंच, याचा उलगडा होत असताना वाडय़ात राहणाराच एखादा कबुली देतो, पाणी शुद्ध करण्यासाठी त्याने पाण्याच्या टाकीत पोटॅशिअम परमँगनेट टाकलेलं असतं. खरं तर पोटॅशिअम परमँगनेट पाण्यात ठरावीक प्रमाणात टाकायचं असतं आणि नंतर पाणी फिल्टरने गाळून वापरायचं असतं.

पोटॅशियम परमँगनेट हे पोटॅशिअमचे अकार्बनी संयुग. हे संयुग पाण्यात विद्राव्य असून, पाण्यात विरघळल्यावर गडद गुलाबी रंग देते. जंतुनाशक म्हणून पाणीशुद्धीकरणासाठी पोटॅशिअम परमँगनेटचा वापर आजही केला जातो. औद्योगिक क्षेत्रात भूजलाचा वापर करताना, पाण्यातील लोह आणि पाण्याला येणारा हायड्रोजन सल्फाइडचा सडक्या अंडय़ासारखा वास घालविण्याकरिता पोटॅशियम परमँगनेटचा वापर केला जातो.

aai kuthe kay karte fame akshaya gurav reveals her bad patch
“अचानक मालिकेतून काढलं अन्…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ कठीण प्रसंग; म्हणाली, “मी खचले…”
SaReGaMaPa Little Champs Winner singer Kartiki Gaikwad home photos
लवकरच आई होणाऱ्या कार्तिकी गायकवाडचं घर आहे खूपच सुंदर, पाहा फोटो
Pirticha Vanva Uri Petla fame actor hemant pharande married with monika hemant
‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ मालिकेतील अभिनेता अडकला लग्नबंधनात, कोण आहे बायको? जाणून घ्या…
Moong Benefits
Health Tips: मोड आलेले मूग शरीरासाठी फायदेशीर; आहारात समावेश केल्यास होतील अनेक फायदे

जोहान रुडॉल्फ ग्लॉबर या शास्त्रज्ञाने सन १९५९ मध्ये पायरोलझीट (मँगेनीज डायऑक्साइड) खनिज आणि पोटॅशिअम काबरेनेट यांच्या मिश्रणापासून मिळवलेले रसायन पाण्यात विरघळवले असता हिरव्या रंगाचे पोटॅशिअम मँगनेट तयार होई. जे हळूहळू जांभळ्या रंगाचे आणि अखेर लाल रंगाचे होई. पोटॅशिअम परमँगनेट तयार करण्यासंबंधीचे वर्णन असलेला ग्लॉबरने सादर केलेला हा पहिला अहवाल होता. त्यानंतर २०० वर्षांनी, हेन्री बॉलमन काँडी हा लंडनचा रसायनतज्ज्ञ जंतुनाशकाच्या शोधात होता. त्याने पायरोलझीट आणि सोडियम हायड्रॉक्साइड एकत्र करून पाण्यात विरघळवले. तयार झालेले द्रावण जंतुनाशक होते. याचे पेटंट घेऊन हेन्री बॉलमन काँडी याने, ‘काँडीचे द्रव’ म्हणून ते विकायला सुरुवात केली. प्रभावी असला तरी हा द्रव स्थिर नव्हता. काँडीने सोडियम हायड्रॉक्साइडच्या ऐवजी पोटॅशिअम हायड्रॉक्साइड वापरून ही समस्या सोडवली. पोटॅशिअम हायड्रॉक्साइड वापरल्याने त्याला आणखी एक फायदा झाला. या द्रावणाचे तितकेच प्रभावी स्फटिक तयार झाले. हे स्फटिक होते पोटॅशिअम परमँगनेटचे. हे स्फटिक ‘काँडीचे स्फटिक’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

पोटॅशिअम परमँगनेट जंतुनाशक असल्याने बऱ्याच त्वचारोगांत याचा वापर केला जातो. यात पायाच्या त्वचेला होणारा बुरशी संसर्ग, त्वचेवर येणारे पुरळ, त्वचेवरील जखमा आणि व्रण इत्यादी त्वचारोगांचा समावेश होतो. हऌड (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) या जागतिक आरोग्य संस्थेच्या आवश्यक औषधांच्या यादीत पोटॅशिअम परमँगनेटचा समावेश आहे.

अनघा वक्टे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org