डीऑक्सिरायबोज, एक फॉस्फेट आणि एक नत्रयुक्त घटक यांच्या मिळून बनणाऱ्या एका रेणूला न्युक्लिओटाइड म्हणतात. असा बनतो डीएनए साखळीचा एक मणी. डीएनए हा पेशीतील अतिशय महत्त्वाचा आणि अति कार्यरत असा बहुआयामी रेणू आहे. पेशीतील प्रथिनांच्या बांधणीत याचा मोठा सहभाग असतो. डीएनए म्हणजे जशी न्युक्लिओटाइडची साखळी तशी प्रथिने म्हणजे अमिनो आम्लांची साखळी. डीएनएतील न्युक्लिओटाइडच्या क्रमावर प्रथिनांचे स्वरूप अवलंबून असते. तीन न्युक्लिओटाइडचे मिळून एक कोडॉन बनते. असे एक कोडॉन सांकेतिक भाषेत एक विशिष्ट  अमिनो आम्ल दर्शविण्यासाठी जबाबदार असते. प्रथिनातील अमिनो आम्लांच्या क्रमावर प्रथिनांचे स्वरूप अवलंबून असते. म्हणजे जर डीएनएमधील न्युक्लिओटाइडचा क्रम बदलला तर त्यापासून बनणाऱ्या प्रथिनातील अमिनो आम्लाचा क्रम बदलेल व त्यापासून बनणाऱ्या प्रथिनांचे रासायनिक स्वरूप पण बदलेल. (जसे गरज आणि गजर, यात अक्षरे तीच आहेत पण क्रम बदलल्यामुळे अर्थ बदलला आहे.) कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन यांपासून हा अमिनो आम्लाचा रेणू बनतो. ही अमिनो आम्ले आपल्या पेशीत बनू शकतात तसेच आपण खाल्लेल्या प्रथिनयुक्त आहाराच्या पचनातून पण मिळतात. एकूण २२ प्रकारची अमिनो आम्ले असतात. यातील १० अमिनो आम्ले आपले शरीर बनवू शकत नाहीत, म्हणून त्यांना आपण आवश्यक अमिनो आम्ले म्हणतो. मांसाहारातून ही सर्व अमिनो आम्ले आपल्याला मिळू शकतात, मात्र शाकाहारातील गहू, तांदूळ इ. तृणधान्ये अथवा डाळी आणि कडधान्ये मात्र ही सर्व अमिनो आम्ले आपल्याला देऊ शकत नाहीत. पण त्यामुळेच आपण आपल्या आहारात वरणभात किंवा पोळी व आमटी असे तृणधान्ये आणि कडधान्य असा दोघांचा समावेश करणे गरजेचे आहे. कारण ज्या अमिनो आम्लांची कमतरता तृणधान्यात असते, ती अमिनो आम्ले कडधान्यात असतात. या अमिनो आम्लांच्या कमतरतेमुळे शारीरिक थकवा, मानसिक मरगळ, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे, त्वचा आणि केसांचा पोत बदलणे असे परिणाम दिसू लागतात. याकरिता आपला आहार सकस असण्याची गरज आहे.
डॉ. मृणाल पेडणेकर (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा :  कंटाळा हरला
मनापासून एक गोष्ट तुला सांगाविशी वाटत्येय.. खोल मनातलं गुपित आहे म्हण ना! म्हणजे असं काही खासगी सिक्रेट नाही. पण फारसं कधी शेअर न केलेली गोष्ट सांगतोय खास तुला..
अगदी लहानपणापासून मनावर संस्कार होतात आपल्यासारख्या मध्यमवर्गीय पांढरपेक्षा मुला-मुलींवर, ते असे की सदैव स्वत:ला कशात तरी गुंतून ठेवावं. अभ्यास- अध्ययन आणि पुढे उद्यमशीलता. रिकामं बसू नये. रिकामं घर हा सैतानाचा राखीव भूखंड असतो.
हे अगदी सुयोग्य संस्कार आहेत. मन अभ्यासात, वाचनात, कामात व्यग्र असलं की नकारात्मक विचारांना थारा मिळत नाही. नकारात्मक विचार म्हणजे बाष्कळ शंका-कुशंका. त्यातून निराशा; निराशेतून पुढे निष्क्रियता. निष्क्रियतेची सवय म्हणजे आळशीपणा. आळशीपणा म्हणजे ऐदीपणा. मनाच्या उत्तम व्यवस्थापनासाठी स्वत:ला अशा रीतीने बिझी ठेवणं फार महत्त्वाचं. असा संस्कार स्वानुभवातून सफळ होतो आणि पुढे त्यावर आधारलेला सल्लाही दिला-घेतला जातो. या विचार संस्काराला तडा गेला ध्यानधारणेचे धडे सुरू झाल्याबरोबर.
म्हणजे हे काय? नुसतं डोळे मिटून बसायचं, वाटल्यास ओंकार वगैरे मंत्र म्हणायचा, श्वासावर लक्ष ठेवायचं.. काहीही न करता निश्चल बसून राहायचं. मन कुठे शरीरामध्ये बसतंय, ते जातं भटकायला नि भरकटायला! हा कसला आध्यात्मिक अनुभव! त्यापेक्षा, दुसरं नाही तर तिसरंचौथं काही तरी करीत राहावं हे उत्तम! मन बिझी नसलं तर नकारात्मक विचार, निराश असं काही वाटत नसलं तरी प्रचंड बोअर होतं.. कंटाळा येतो. हा कंटाळा फार त्रासदायक वाटतो.
मग हळूच मनात विचार आला की, कंटाळा आणि बोअर होणं ही गोष्ट फक्त ध्यानधारण करताना अनुभवाला येते असं नाही. अ‍ॅक्च्युअली, रोजच्या रुटीनमुळे बोअर होतं, तेच तेच काम करून बोअर होतं, मूर्ख टीव्ही सीरियल बघून बोअर होतं, प्रवास करताना बोअर होतं, रोज तेच तेच जेवावं लागलं तरी बोअर होतं. हो, दैनंदिन व्यवहारातला बोअरडम तर मोठीच आफत.
अशा बोअरडमपासून पळण्यासाठी मग मी आणखी काही तरी करू पाहतो, त्यामुळे थोडा कंटाळा कमी होतो, पण या इतर सबस्टिटय़ूट गोष्टीदेखील बोअर वाटू लागतात आणि तो महाकंटाळा (महाकवरेज, महाइलेक्शनच्या तालावर) तर फारच बोअर होतो..
मी चक्कभानावर आलो. असं वाटलं की, कंटाळा ही एक मोठी समस्याच आहे. आपली आर्थिक स्थिती बेताची, हालाखीची असली तर कष्ट करण्याचा थकवा नि कंटाळा येतो. आर्थिक परिस्थिती बरी असली तर रिकामा वेळ शिल्लक राहतो म्हणून कंटाळा येतो.. खरं सांगतो, हे भान आलं आणि अचानक मला ध्यानधारणा ‘करताना’ येण्याचा अर्थ कळला. नुस्तं स्थिर बसूनही जीवनातल्या शांततेचा अनुभव घेता येतो. बाष्कळ, निर्थक सवयी म्हणजे गॉसिप, व्यसनं, थिल्लर चाळे या गोष्टींकडे ओढ वाटते. कारण मनात कंटाळा सहन करण्याची ताकद संपते.
ध्यानधारणा म्हणजे मनात उसळणाऱ्या कंटाळ्याकडे साक्षीत्वानं पाहणं, मनातल्या कंटाळ्यापासून पलायन न करणं. हळूहळू मनाला परिपक्वपणा येतो. मनातल्या कंटाळ्याची लाट आपोआप निवळते, विरत जाते..
आणि एक खास सिक्रेट : प्रत्येक बोअरडममागे शांत, सुस्थिर आणि आनंदी मनाचा झरा वाहत असतो.
आता मला बोअर होत नाही, मन रमतंय काहीच न करण्यात..
तुझा,
 मी
डॉ.राजेंद्र बर्वे  –     drrajendrabarve@gmail.com

Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
Loksatta kutuhal Artificial Neural Networks Perceptrons Machine learning
कुतूहल: कृत्रिम चेतापेशींचे जाळे
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…
In redevelopment of flat holders Redevelopment Senior
पुनर्विकासातील ज्येष्ठ!

प्रबोधन पर्व :  चळवळ करण्यासाठी ‘पोलिटिकल क्लब’ असावा..
‘‘देशांतील तत्त्ववेत्ते समाजशासनासंबंधानें अगर देशहित कशांत आहे यासंबंधानें जे विचार उत्पन्न करितात त्या विचारांचा परिणाम लोकांवर एक तर केवळ लोकमत तयार होऊन होतो, अगर ते विचार कायद्याच्या स्वरूपानें अस्तित्वांत येतात. बौद्धिकदृष्टय़ा श्रेष्ठ वर्गाचें वर्चस्व राज्यसूत्रावर असलें म्हणजे या लोकांच्या विचारांस सामाजिक व राजकीय महत्त्व येतें. या विचारांचें राजकीय महत्त्व वाढविण्यासाठीं त्या विचारांचें प्राबल्य करविलें पाहिजे, म्हणजे त्या विचारासंबंधानें अनुकूलता लोकांत उत्पन्न केली पाहिजे. ही अनुकूलता इतकी उत्पन्न करावयाचीं कीं, कायदे करणाऱ्या वर्गास ते लोक त्या विचारानुसार कायदे स्वयंप्रेरणेनें व लोकांत प्रबल झालेल्या मतास विरोध करण्यामुळें जी अप्रियता उत्पन्न होते, ती टाळण्याच्या भीतीनें तरी पास करून टाकतील. देशावर उन्नत विचारांचा परिणाम घडविण्यास कायदें हे एक साधन होय. कायदे घडवून आणणें हें साध्य साधण्यासाठीं ‘चळवळ’ हें साधन होय. व चळवळ करण्यासाठी ‘पोलिटिकल क्लब’ हें साधन होय.’’ ‘पोलिटिकल क्लब कसा असावा?’ या लेखात श्री. व्यं. केतकर लोकांस राजकीय विचारांची तालीम कशी द्यावी याविषयी लिहितात –
        ‘‘मनुष्याच्या ज्या इच्छा असतात त्या त्यास घडवून आणावयाच्या असतात, व त्या घडवून आणण्यासाठीं संघ निर्माण होतात. जनसमूहांपैकीं ज्या कोणत्या वर्गास आपलें हित साधावयाचें असतें तो वर्ग आपल्या हिताच्या रक्षणार्थ धडपडलेच. तसेंच देशहित कशानें साधणार आहे, याचा निश्चय झाला म्हणजे त्यासंबंधाच्या सिद्धान्ताचा प्रसार करावयाचा असतो.. कांहीं क्लब पक्षमूलक असावयाचें, आणि ते तसे असलेच पाहिजे. तथापि असल्या क्लबांनीं आपल्या केवळ पक्षविशिष्ट कल्पनाच लोकांत पसरावयाच्या, अगर तेवढय़ांचेंच चर्वितचर्वण करावयाचें असें करूं नये.. संघांनीं आपलें काम करतांना एक कर्तव्य विसरतां कामा नये; तें हें कीं, आपल्या देशांत जो एकलकोंडा स्वभाव आहे तो घालवून देऊन लोकांस संघेच्छु बनविलें पाहिजे.’’