अंडे हे पूर्ण अन्न आहे. त्यामध्ये मानवी शरीरास लागणारी वेगवेगळी प्रथिने आढळतात. अशा प्रकारचे प्रथिनांचे समतोल मिश्रण आपले शरीर तयार करू शकत नाही. ही प्रथिने शरीरबांधणीसाठी व पेशींच्या चयापचयाच्या क्रियेत महत्त्वाचे कार्य करतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. याव्यतिरिक्त प्रथिने शरीरातील हाडे, स्नायू, त्वचा व रक्त चांगले ठेवून शरीराची झीज भरून काढतात. शरीरात स्निग्ध व पिष्टमय पदार्थ साठवले जातात, परंतु प्रथिने साठवली जात नाहीत. त्यामुळे प्रथिनांचा राखीव साठा शरीरात उपलब्ध नसतो. अशा परिस्थितीत अंडय़ातील प्रथिनांचा स्रोत शरीराला सर्वोत्तम आहे. विशेषत: वजन कमी करताना अंडय़ातील प्रथिने शरीरावर विपरीत परिणाम होऊ देत नाहीत.
  अंडय़ातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे जीवनसत्त्व ब-२. हे पाण्यात विरघळणारे असून शरीरातील चयापचय प्रक्रियेत महत्त्वाचे कार्य करून शरीरवाढीसाठी व ऊर्जा पुरवण्यासाठी मदत करतात. विशेषत: लहान मुलांच्या शरीरवाढीसाठी व झीज भरून काढण्यासाठी ही जीवनसत्त्वे उपयोगी ठरतात.
अंडय़ामध्ये जीवनसत्त्व-ड मोठय़ा प्रमाणात असते. या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे शरीराची हाडे कमकुवत होतात आणि रोगप्रतिकार क्षमता कमी होते. त्यामुळे हृदयरोग व कॅन्सर यांचे प्रमाण वाढलेले दिसून आले आहे. एक अंडे प्रतिदिन शिफारशीपेक्षा २० टक्के जास्त जीवनसत्त्व-ड याचा पुरवठा शरीरास करते.
अंडय़ातील मध्यभागी असलेल्या पिवळ्या घटकात कोलीन हा पदार्थ असतो. हा पदार्थ मेंदूची वाढ व कार्य करण्यास मदत करतो. दररोज एक अंडे शरीराला लागणाऱ्या कोलीनची गरज भागवते. त्यामुळे लहान मुलांना दररोज अंडे खाऊ घालणे फायदेशीर ठरते. याव्यतिरिक्त पिवळ्या घटकात ल्युटीन आणि झी-झॅन्टीन हे घटक असतात. यामध्ये ऑक्सिडंट रोधक गुणधर्म आहेत. हे घटक डोळ्यांतील स्नायूंना मजबूत ठेवून मोतीबिंदू नियंत्रणात ठेवतात.
 अंडय़ामध्ये मोठय़ा प्रमाणात खनिज पदार्थ असतात. विशेषत: सेलेनियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे अंडय़ात ऑक्सिडंटरोधक गुणधर्म आहेत. वार्धक्यात स्नायूंचा कमजोरपणा रोखणे, आंधळेपणा रोखणे आदी काय्रे या खनिजजन्य पदार्थामुळे होतात.
– डॉ. माणिक धुमाळ (परभणी) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

जे देखे रवी.. – कालिदास आणि भवभूती
झाडाला जसा एकच शेंडा असतो तसाच इमारतीला एकच वरचा मजला असू शकतो. त्यात एखादा जाऊन बसला की मग तो तिथून निघणे कठीण. ब्रॅडमन हा क्रिकेटपटू याचे उत्तम उदाहरण. वॉरेल, सोबर्स किंवा कीथ मिलर त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त चतुरस्र खेळाडू होते, पण वरच्या मजल्याचे ‘बुकिंग’ आधीच झाले होते. आइन्स्टाइन सगळ्यांनाच माहीत असतो. ढोबळ आणि सूक्ष्म पदार्थविज्ञानात त्याला तितकीच गती होती, पण सूक्ष्माच्या अंतरंगातली धगधग ज्याने अचूक हेरली आणि ज्यामुळे तंत्रज्ञानाचा अफाट विस्तार झाला त्या श्रोडिंगरचे नावही बहुसंख्यांना माहीत नसते.
खलनायकांबद्दलही असे होते. दुसरे महायुद्ध हिटलर हरला ते चर्चिलमुळे. पण चर्चिलची आठवण पुसत चालली आहे. हिटलर मात्र सर्वाना माहीत आहे. नेल्सनने नेपोलियनला हरविले पण उरला फक्त नेपोलियन. एकाच काळात जर दोन तुल्यबळ व्यक्ती निर्माण झाल्या तरीही एकाचीच कणभर का होईना समाजमनात सरशी होते. कालिदास आणि भवभूति एकाच काळातले असे समजते जाते. दोघेही मातब्बर. भवभूतीने उत्तम नाटके लिहिली. त्याचे संस्कृत कालिदासाच्या मानाने उजवे होते, असे एक मत आहे.
त्याची आणि कालिदासाची एक गोष्ट सांगतात. दंतकथाच. भवभूतीने राम आणि सीतेबद्दल एक रचना केली होती त्यात राम म्हणतो ‘गाढ अलिंगन देऊन, हात गुंतवून गालाला गाल लावून अगदी जवळ असल्यामुळे हळुवार स्वरात आपण गुजगोष्टी करीत असताना रात्र संपली’ मूळ रचना संस्कृतमध्ये आहे. संस्कृतात अनुस्वार इकडचा तिकडे झाला तरी अर्थ बदलू शकतो. भवभूतीने ही रचना कालिदासाला दाखवली. कालिदाससाहेब त्या वेळी सारीपाट खेळत होते ते म्हणाले, ‘दाखवू नकोस वाचून दाखव’ ती ऐकल्यावर कालिदास म्हणाले, एक अनुस्वार काढ. तो काढल्यावर ‘रात्र संपली पण गुजगोष्टी काही संपल्या नाहीत,’ असा अर्थ तयार झाला. भवभूती म्हणाला, ‘होय तुमची रचना जास्त सुंदर आहे.’
असे भवभूतीने म्हणणे अशक्यप्राय आहे. कारण त्याला टीका सहन होत नसे. कोणीतरी टीका केली म्हणून त्याने एक नाटक अर्धवट सोडून दिल्याचा इतिहास आहे. तेव्हा ही कथा कालिदासाचे माहात्म्य सिद्ध करण्यासाठी रचली गेल्याची शक्यता आहे. कालिदास सत्ताधीशांना धार्जिणा होता म्हणून वरच्या मजल्यावरच राहिला. उलट भवभूतीSome where, some one,
In some future Eleganst Season,
May Read What I Have Written and empathise,
With My Reason  असे मानणाऱ्यांच्या पंथातला.
अशी असते वरच्या मजल्याची गोष्ट.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

Health Special, Pregnancy , dohale,
Health Special: गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?
Skin care tips jaggery face pack helpful to glowing your skin
चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या? गुळाचा करा खास वापर; त्वचा दिसेल तरुण- चमकदार
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
What Are The Seven Types Of Rest how to incorporate these types of rest In Your Life Follow This Tips ltdc
आराम म्हणजे फक्त झोप घेणे का? विश्रांतीचे नेमके किती आहेत प्रकार? डॉक्टरांकडून जाणून घ्या…

वॉर अँड पीस- स्लिपडिस्क : वाढता वातविकार
आयुर्वेद शास्त्रात वात-पित्त-कफ या तीन दोषांच्या आधारावर अनेकानेक रोगांचे ढोबळ मानाने वर्गीकरण केलेले आहे. कफाचे वीस, पित्ताचे चाळीस, वाताचे ऐंशी अशी रोगांची संख्या मानली जाते. कफं पंगू, पित्तं पंगू पंगवो मलधातव:। वायूना यत्र नीयन्ते, तत्र गच्छंति मेघवत्।। अशा या मोठय़ा संख्येच्या वात विकारात स्नायू व सांध्यांच्या विकाराची संख्या खूपच आहे. अर्धागवात, आमवात, सांधेदुखी, सांध्याची सूज, सांधे जखडणे, मान, कंबर, पाठ दुखणे, अवबाहुक, ग्रृध्रसी, पोटऱ्या दुखणे अशा वातविकारांप्रमाणेच स्लिपडिस्क विकाराने हैराण झालेले वाढत्या संख्येने रुग्ण, वेगवेगळ्या चिकित्सकांकडे जात असतात. एक्सरे, एमआरआय तपासण्या केल्या जातात. शस्त्रकर्माचा सल्ला दिला-घेतला जातो. खूप श्रीमंत गल्लावाले रुग्ण सर्जनच्या सल्ल्यानुसार संबंधित डिस्क- मणक्याचा भाग काढून घेऊन तात्पुरता आराम मिळवतात. काही काळाने पुन्हा त्रास चालूच राहतो.
तुम्ही-आम्ही जी दिवस-रात्रची हालचाल, धावपळ, भागदौड करतो त्यात आपल्या पाठीच्या मणक्यांच्या लवचिकपणाचे रहस्य दडले आहे. मानेपासून ते कंबरेच्या शेवटच्या टोकापर्यंत अनेक छोटी हाडे, त्यांतील वंगण, त्यामधून मज्जारज्जूचे संरक्षण अशी निसर्गाची देणगी मानवाला लाभलेली आहे. पाठीच्या मणक्यांच्या विविध चकत्यातील अंतर कमी-जास्त झाले की स्लिपडिस्कने ग्रासले असे समजावे. फाजील शारीरिक श्रम, घाईगर्दीने वजन उचलणे, वाहनातून खराब रस्त्यांवरचा प्रवास, अतिश्रम, आंबटखारट पदार्थाचे अतिरेकी सेवन, मधुमेह, बीपीची चुकीची औषधे अशा कारणांनी मणक्यांच्या चकत्या झिजतात. मुंग्या, तीव्र वेदना यांनी रुग्ण हैराण होतो. कठीण, उबदार, अंथरुणावर झोपणे, मीठ, अतिथंड पदार्थ टाळणे, यासोबत लाक्षादि, संधिवातारी, गोक्षुरादि, सिंहनाद आभदि, गणेश, त्रिफळा गुग्गुळ अशा औषधांनी स्लिपडिस्कवर विजय मिळवता येतो.जोडीला लेपगोळीचा गरमलेप, नारायण तेलाचे अभ्यंग आवश्यक आहे
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत – २० ऑगस्ट
१८४० > विनायक जनार्दन कीर्तने यांचा जन्म. ‘थोरले माधवराव पेशवे’ हे त्यांचे नाटक मराठीतले पहिले इतिहासाधारित नाटक आणि मराठीतील पहिली शोकांतिका मानले जाते. ‘जयपाल’ हे नाटक व ‘चाळीस वर्षांमागचे पुणे’ ही मालिका ‘ज्ञानप्रकाश’साठी त्यांनी लिहिली होती.
१८६० > चरित्रकार, भाषांतरकार, वक्ते, समाजसुधारक आणि ब्राह्मणेतर चळवळीचे आधारस्तंभ कृष्णराव अर्जुन केळुसकर यांचा जन्म. ‘राष्ट्रकथामाले’करिता त्यांनी फ्रान्सचा जुना इतिहास मराठीत आणला. सेनेका आणि एपिक्टेटस या (स्टॉइक विचारधारेच्या) बोधवचनांचे व उपनिषदांतील ज्ञानवचनांचे भाषांतर केले. ‘श्रीमद् भगवद्गीता- सान्वय पदबोधन’ (सार्थ आणि सटीक) असा १११७ पानी ग्रंथ लिहिला. छ.शिवाजी महाराजांसह विविध चरित्रेही लिहिली.
१९१९ > ‘शोभा’ या गाजलेल्या कादंबरीचे लेखक विष्णू श्रीधर जोशी यांचा जन्म. त्यांनी कथाही लिहिल्या, परंतु ‘क्रांतिकल्लोळ’, ‘झुंज सावरकरांची’ आदी चरित्रपुस्तकांसाठी ते अधिक परिचित होते.
१९२२ > सुमारे २५ पुस्तके लिहिणारे कथा-कादंबरीकार प्रभाकर गोविंद अत्रे यांचा जन्म. ‘माझे जीवनगाणे’, ‘रंगात रंगले मी’ या त्यांच्या कादंबऱ्यांना नाटय़सृष्टीची पाश्र्वभूमी आहे.
– संजय वझरेकर