शक्ती म्हणजे कार्य करण्याचा दर. विद्युतशक्ती म्हणजे एकक कालावधीत घडून आलेले विद्युतकार्य. याचाच अर्थ असा की विद्युतऊर्जा (ह) वापराचा दर म्हणजे विद्युतशक्ती (ढ) होय.

विद्युतशक्तीचे एकक वॅट किंवा  ज्यूल/सेकंद आहे. वॅट म्हणजे दर सेकंदाला किती ज्यूल कार्यशक्ती खर्च होते हे दाखवणारा आकडा. विद्युतधारेमुळे एका सेकंदात एक ज्यूल इतके कार्य होत असेल तर वापरली गेलेली विद्युतशक्ती म्हणजे एक वॅट.

peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
Obesity kid
सिडेंटरी लाईफस्टाईल, आऊटिंग, टेस्ट बड्स, स्क्रीन टाईममुळे मुलांचा स्थुलपणा वाढतो? पण म्हणजे काय?
Loksatta kutuhal Artificial Neural Networks Perceptrons Machine learning
कुतूहल: कृत्रिम चेतापेशींचे जाळे
100 gram raw garlic revealing impressive impact on our lives how garlic boost your immune system said expert
१०० ग्रॅम लसणात आहेत ‘हे’ पोषक घटक; उच्च रक्तदाबामध्ये ठरेल वरदान, वाचा तज्ज्ञांची मते…

१००० वॅट = १ किलोवॅट.

१ वॅट दराने १ तास वीज वापरली तर खर्च होणारया विद्युतशक्तीला १ वॅट-तास असे म्हणतात. औद्योगिक क्षेत्रात किलोवॅट-तास (‘हँ) हे विद्युतशक्तीचे एकक वापरतात. सामान्यपणे त्याला ‘एक युनिट’ म्हणतात.

विद्युतदिव्यावर त्या दिव्याचे वॅटेज लिहिलेले असते. त्यावरून तो दिवा किती वेळात किती विद्युतशक्ती खर्च करतो ते समजते.

१० वॅटचा दिवा ८ तास पेटत ठेवला तर, १० वॅट ७ ८ तास = ८० वॅट-तास विद्युतशक्ती खर्च होईल. तितकीच विद्युतशक्ती ४० वॅटचा दिवा २ तास पेटत ठेवला तर खर्च होईल

४० वॅट  ७ २ तास = ८० वॅट-तास

याचा अर्थ असा की, ४० वॅटचा दिवा १० वॅटच्या दिव्यापेक्षा चौपट वेगाने वीज खर्च करतो.

५०० वॅट शक्तीची विद्युतइस्त्री दररोज १ तास याप्रमाणे महिनाभर वापरली तर, ३० दिवसात खर्च होणारी विद्युतशक्ती

= ५०० वॅट ७ १ तास ७ ३० दिवस

= १५००० वॅट-तास = १५ किलोवॅट-तास

= १५ युनिट.

१००० वॅट शक्तीचा जलतापक दररोज १० मिनिटे याप्रमाणे ३० दिवस वापरल्यास खर्च होणारी विद्युतशक्ती

= १००० वॅट ७ १० मिनिटे ७ ३० दिवस

= १००० वॅट ७ ३०० मिनीटे

= १००० वॅट ७ ५ तास

= ५००० वॅट-तास = ५ किलोवॅट-तास = ५ युनिट

घरोघरी दिवे, पंखे तसेच वीजेवर चालणारी निरनिराळी विद्युत उपकरणे वापरली जातात. या सर्वाची मिळून किती युनिट वीज खर्च झाली त्याची नोंद मीटरवर होते व त्याप्रमाणात वीजबिलाची आकारणी होते. म्हणून वीजेचा वापर कमीतकमी कसा होईल याकडे लक्ष दिले पाहिजे.

– डॉ. सुनंदा जनार्दन करंदीकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

 office@mavipamumbai.org

 

कुँवर नारायण – साहित्य सन्मान

कुँवरजींचे सारं आयुष्यच कवितामय झाले आहे, याचा प्रत्यय त्यांच्या अनेक कवितांतून येतो. ते म्हणतात –

‘‘चाहे कविता बराबरही

जुडे रहना है किसी तरह

सबसे -’’

कवितेची ही असोशी व्यक्त करताना ते म्हणतात-

‘‘मैं जिंदगीसे भागना नही

उससे जुडना चाहता हूँ..

उसे झकझोरना चाहता हूँ

उसके काल्पनिक अक्षपर

ठीक उस जगह जहाँपर

सबसे अधिक बेध्य हो कविता द्वारा -’’

अज्ञेयजींच्या १९५९ मधील ‘तिसरा सप्तक’मध्ये कुँवरजींच्या कवितांचा समावेश केल्याने त्यांना बऱ्यापैकी प्रसिद्धी मिळाली, पण १९६५ मध्ये ‘आत्मजयी’ हे दीर्घकाव्य सिद्ध झाले आणि त्यांची कवी म्हणून ओळख प्रस्थापित झाली. मृत्यूसंबंधी शाश्वत प्रश्न कठोपनिषदच्या माध्यमातून आत्मजयी या दीर्घकाव्यातून त्यांनी वाचकांसमोर ठेवले – मी तुला मृत्यूच्या स्वाधीन करतो, ही वडिलांची आज्ञा शिरोधार्य मानून नचिकेत यमराजाच्या दाराशी जाऊन पोहोचतो. तीन-चार दिवस उपाशीपोटी तो यमाची वाट पाहत उभा असतो. त्याची ही साधना पाहून यमराज त्याला तीन वर मागण्यास सांगतो. तेव्हा नचिकेत यमाकडे पहिला वर मागतो- वडिलांचा संताप, क्रोध नाहीसा कर..

नचिकेतच्या या मागणीचा आधार घेत २००८ मध्ये कुँवरजींनी ‘वाजश्रवाके बहाने’  हे दीर्घकाव्य लिहिले. मृत्यूसारख्या विषयावर भाष्य करीत आजच्या सैरभैर मानसिकतेला दिलासा देत त्यांनी जाता जाता दोन पिढय़ांतील समन्वय समजूतदारपणे कसा होऊ शकतो, हेही सूचित केले आहे. एका अमूर्त विषयाला सूक्ष्म संवेदनशील शब्दांत, नव्या उत्साहात त्यांनी काव्यबद्ध केले आहे.

त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत.

हिंदुस्थानी पुरस्कार- ‘आत्मजयी’साठी, प्रेमचंद पुरस्कार- ‘आकारों के आसपास’ कथासंग्रहासाठी, कुमारन आसन पुरस्कार- ‘अपने सामने’ काव्यसंग्रहासाठी, तुलसी पुरस्कार, व्यास सन्मान- ‘कोई दुसरा नहीं’ काव्यसंग्रहासाठी, साहित्य अकादमी  कबीर सन्मान, राजर्षी पुरुषोत्तम टण्डन मुक्त                 विश्वविद्यालयातर्फे डी.लिट. आणि  पद्मभूषण.

– मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com