20 November 2017

News Flash

विद्युत चुंबकत्व

जर तारेतून वाहणारी विद्युतधारा वाढवली तर चुंबकसूचीचे विचलन अधिक प्रमाणात होते.

लोकसत्ता टीम | Updated: September 13, 2017 2:24 AM

वद्युतधारा जेव्हा एखाद्या वाहक तारेतून वाहते तेव्हा तिच्या सभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते व त्याच्याजवळ असलेल्या चुंबकसूचीचे विचलन होते. हा शोध इ. स. १८१९ मध्ये डेन्मार्क देशातील एक भौतिकशास्त्रज्ञ हॅन्स ओरस्टेड यांनी लावला.

जर तारेतून वाहणारी विद्युतधारा वाढवली तर चुंबकसूचीचे विचलन अधिक प्रमाणात होते. जर चुंबकसूची तारेपासून दूर नेली तर चुंबकसूचीचे विचलन कमी होत जाते. म्हणजेच दिलेल्या बिंदूजवळ निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र हे वाहकातून वाहणाऱ्या विद्युतधारेच्या समप्रमाणात असते. वाहकातून वाहणाऱ्या विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र हे तारेपासूनचे अंतर वाढत गेल्यास कमी होत जाते. वर्तुळाकार तारेतून वाहणाऱ्या विद्युतधारेमुळे कोणत्याही बिंदूत तयार होणारे चुंबकीय क्षेत्र हे तारेतून वाहणाऱ्या विद्युतधारेशी समानुपाती असते. वलयाचे जर ‘न’ वेढे असतील तर निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र एका वेढय़ापासून तयार होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राच्या ‘न’ पट असते.

प्रत्येक चुंबकाच्या सभोवती विशिष्ट चुंबकक्षेत्र असते व ते चुंबकाच्या शक्तीनुसार कमीजास्त असते. रक पद्धतीत चुंबकीय क्षेत्राची तीव्रता वेबर/ मीटर2 Wb/(m2) या एककात मोजतात. यालाच टेसला (tesla) असेही म्हणतात.

नरम लोखंडाच्या सळईभोवती गुंडाळलेल्या विद्युतरोधक वेष्टित तारेतून विद्युतप्रवाह जात असल्यास; सळईमध्ये तात्पुरते चुंबकत्व येते. प्रवाह बंद केल्यास चुंबकत्व नाहीसे होते. विद्युतचुंबकाची शक्ती सळईभोवतीच्या वेढय़ांची संख्या वाढवून आणि तारेतून जाणाऱ्या प्रवाहाची शक्ती वाढवून म्हणजे जोरदार विद्युतप्रवाह वापरून अधिक करता येते. अशा तऱ्हेने तात्पुरता प्रभावी विद्युत चुंबक बनविता येतो.

कारखान्यात लोखंडाचे अवजड पदार्थ उचलण्यासाठी क्रेनमध्ये तात्पुरत्या विद्युत चुंबकाचा उपयोग करतात. तसेच याचा वापर बोटीत अथवा आगगाडीत फार अवजड लोखंडी सामान उचलून ठेवण्यासाठी होतो. विद्युतप्रवाहाची शक्ती व दाब मोजण्याची उपकरणे विद्युतप्रवाहाच्या चुंबकीय परिणामावर आधारलेली असतात. विद्युतप्रवाहदर्शक, विद्युतप्रवाहमापक व विद्युतदाबमापक ही उपकरणे बनवताना त्यात टांगलेली चुंबकसूची असते किंवा टांगलेले वेटोळे असते. विजेच्या घंटेतही विद्युत चुंबकच वापरतात.

डॉ. सुनंदा जनार्दन करंदीकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

गिरीश कर्नाड- विचार

१९९८चा  ज्ञानपीठ  पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात  गिरीश कर्नाड म्हणतात, ‘मी आधुनिक कन्नड साहित्यातील ज्ञानपीठ विजेत्यांबद्दल जेव्हा विचार करतो, तेव्हा मी जे काही मिळवलं ते मी माझ्या पूर्वीच्या साहित्यिकांकडून वारसाहक्काने मिळवलेलं आहे.

पहिल्यांदा एखाद्या नाटककाराला या पुरस्कारासाठी निवडल्याने मी रोमांचित झालो आहे. आज २७ मार्च आहे आणि आजच्या सगळय़ा चांगल्या गोष्टी माझ्या नावावर लिहिलेल्या आहेत असं मला वाटतं. कारण आज विश्व नाटय़ दिवस आहे.

एकदा मराठीचे महान कथाकार जी. ए. कुलकर्णीनी मला विचारलं, ‘गिरीश, तू नाटक कसं लिहू शकतोस? कारण ही तर एक परावलंबी कला आहे.’ मी उत्तर दिलं होतं, ‘जर आपण गडबडगोंधळात, अव्यवस्थेमध्ये आणि कोलाहलात एखादा प्रश्न समजून घेऊ शकत नसाल तर तुम्ही नाटक लिहूच शकत नाही’.. माझं उत्तर ऐकून कुलकर्णी म्हणाले, ‘तर मी माझ्या एकटेपणासाठी तयार राहतो..’

भारतीय ज्ञानपीठ हा साहित्यिक पुरस्कार आहे, हे आपण सगळे जाणताच. नाटकातून आपण एक प्रकारचा विशिष्ट सुगंध अनुभवू शकता आणि म्हणून माझ्या मते यात आनंदवर्धनाचं योगदान मोठं आहे. अनुवादाद्वारे आणि ते प्रकाशित करून ज्यांनी माझी नाटके दुसऱ्या भाषेत पोहोचवली त्या अनुवादकांची आणि प्रकाशकांची मला या क्षणी आठवण येते. याच प्रकारे विभिन्न दिग्दर्शक, अभिनेते आणि तंत्रज्ञ यांनी माझी नाटके पोहोचविण्याचा प्रयत्न केला त्यांचे आभार मानण्याची संधी घेण्याची हीच योग्य वेळ आहे, असे मला वाटते. या सगळय़ा गोष्टींमुळेच मी इथपर्यंत येऊन पोहोचलो आहे.

आपले माननीय पंतप्रधान हे केवळ कवीच नाहीत तर पाकिस्तानबरोबरच्या शांतिपूर्ण करारासाठी ते प्रयत्नशीलही आहेत. त्यांच्या हातून हा पुरस्कार प्राप्त होताना गौरवांकित झाल्यासारखं वाटतंय. जीवनातील या अमूल्य क्षणासाठी मी भारतीय ज्ञानपीठाचे आभार कोणत्या शब्दांत मानू हेच मला कळत नाही. छ’

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

First Published on September 13, 2017 2:24 am

Web Title: electro magnet electric current