१८४२ मध्ये गॅडोलीनाइट या खनिजावरील अभ्यासात कार्ल गुस्ताव मोझँडरला यट्रिया हा एक घटक वेगळा आहे असे जाणवले. अधिक अभ्यासात यट्रियात आणखीन दोन घटक – अर्बया व टर्बया सापडले. नावातील व गुणधर्माच्या जवळिकीमुळे व्हायचा तो गोंधळ झालाच. टर्बयिाला अर्बयिा व अर्बयिाला टर्बयिा मानले गेले. १८७७ मध्ये हा गोंधळ दूर झाला. पुढे स्वतंत्रपणे काम करत असताना चार्ल्स जेम्स व जियोर्जअिस अरबेन यांनी शुद्ध अर्बअिम ऑक्साइड मिळविले व १९३४ साली क्लेम व बॉम्मर यांनी अर्बअिम क्लोराइड व पोटॅशिअम यांच्यातील अभिक्रियेतून अर्बअिम धातू मिळविला. साधारणपणे अर्बअिम धातू स्वरूपात सापडत नाही. अर्बअिम रासायनिकदृष्टय़ा खूप क्रियाशील असल्यामुळे संयुग रूपात व त्यातही अर्बयिा म्हणून ऑक्साइड रूपात आढळतो. सांप्रतकाळी झिनोटाइम व युक्झेनाइट या खनिजातून मऊसर, चकचकीत चंदेरी अर्बअिमचे उत्पादन केले जाते.

आपल्या देशात केरळच्या समुद्रकिनारी आढळणाऱ्या मोनाझाइटपासूनदेखील अर्बअिम प्राप्त होते.  लॅन्थनाइड कुटुंबातील अनेक सदस्यांप्रमाणेच अर्बअिम तुरळक (YAG) प्रमाणात सापडते. धातू म्हणून फार ज्ञात नसलेला अर्बअिम उपयुक्त मात्र बराच आहे. व्हॅनेडिअमसारख्या टणक धातूत थोडा अर्बअिम मिसळला तर मिळणारा मिश्र धातूचा कठीणपणा अर्बअिमपेक्षा कमी असतो त्यामुळे तो अधिक उपयुक्त ठरतो. अनेक क्षेत्रांत महत्त्वाची भूमिका असणाऱ्या लेझर तंत्रज्ञानात अर्बअिम उपयुक्त आहे. विषेशत त्वचेवरील तीळ, चामखीळ, पुरळ, व्रण इत्यादी घालविण्यास होणाऱ्या शस्त्रक्रियेत जे याग (अ‍ॅ) म्हणजेच यट्रिअम अ‍ॅल्युमिनिअम गारनेट लेझर्स वापरले जातात, त्यातही अर्बअिमला स्थान असते. अर्बअिमची संयुगे विशेषत अरबिया (अर्बिअम ऑक्साइड) छान गुलाबी रंगाचे असल्यामुळे सिरॅमिकच्या तथा काचेच्या वस्तूंना गुलाबी छटा देण्यासाठी वापरले जाते. गॉगल्सच्या काचांना गुलाबी छटा देण्यासाठीही अर्बअिमचा वापर होतो. अर्बअिमची जैवरासायनिक (Biochemical) भूमिका विशेष महत्त्वाची नसली तरी अर्बअिमचे क्षार मात्र चयापचय (Metabolism) प्रक्रियेत उपयोगी ठरू शकतात. मुळातच नगण्य प्रमाणात आढळणारे हे मूलद्रव्य पर्यावरणाच्या दृष्टीने साहजिकच खूपसे त्रासदायक नाहीं, पण अर्बअिमची भुकटी मात्र स्फोटक ठरू शकते.

डॉ. रवींद्र देशमुख

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org