घुबड, िपगळा, कॅस्ट्रल, हॉक आणि इतर काही पक्षी शिकारी पक्षी म्हणून ओळखले जातात. ते आपल्या पाळीव पक्ष्यांना त्रास देणारे पक्षी म्हणूनही ओळखले जातात. पण ज्या उंदीर, घुशींमुळे आपल्याकडे मोठय़ा प्रमाणात शेतीची नासाडी होते, माणसाला आजार होतात त्यांना मर्यादित ठेवण्याचे महत्त्वाचे काम हे शिकारी पक्षी करीत असतात. गहू, तांदूळ यांसारख्या पिकांमध्ये तर उंदरांमुळे १० ते ५० टक्के उत्पादन क्षमता कमी झाल्याचे दिसून येते. कत्तलखान्याच्या बाहेर पडलेले अथवा टाकलेले पदार्थ, कोंबडीवर्गीय प्राणी, उंदीर, बेडूक आणि इतर लहान उपद्रवी पक्षी यांना हे शिकारी पक्षी खाऊन फस्त करतात. त्यामुळे निसर्गातील कचरा कमी होतो तसेच पिकांना यापासून निर्माण होणारा धोका कमी होण्यास मदत होते.
उंदीर वर्षभर प्रजनन करतात आणि एकाच वेळी ५ ते १० पिल्लांना जन्म देतात. मात्र ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये ही संख्या १४ ते १८ पर्यंत जाते. उंदीर जेवढे प्रजोत्पादक तेवढेच विनाशकही असतात. पूर्ण वाढ झालेली उंदराची एक जोडी एका वर्षांत ८८० उंदरांना जन्म देते, असे गणित आहे. साहजिकच अशी गणिते पूर्णपणे सद्धांतिक असतात. पण यावरून असे लक्षात येते की, पक्षी जेव्हा उंदराची एक जोडी खातो त्या वेळी ८८० नवीन उंदरांचा जन्म होण्यावर एकप्रकारे अंकुशच ठेवला जातो. घुबड व अनेक निशाचर पक्षी मोठय़ा प्रमाणात उंदरांवर उपजीविका करतात. त्यामुळे गरुड, घुबड, िपगळा असे सर्वच शिकारी पक्षी शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी मित्र ठरतात. एका जातीचा घुबड एका रात्रीत एक किंवा त्यापेक्षा जास्त कुरतडणारे प्राणी खातो. घुबडाची एक जोडी व त्यांची पिल्ले मिळून जवळजवळ एक हजार कुरतडणाऱ्या प्राण्यांना खात असतात. त्यामुळे ते शेतकऱ्यांचे खरे आíथक मदतनीस आहेत.
-डॉ. महेश गायकवाड, पुणे
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

आजचे महाराष्ट्रसारस्वत        २६ नोव्हेंबर
१९४८> साहित्यिक, ललित लेखनकार यशवंत त्र्यंबक पाठक यांचा जन्म. नाचू कीर्तनाचे रंगी, ब्रह्मगिरीची सावली, मातीचं देणं  हे ललित लेखसंग्रह. ‘नक्षत्रांची नाती’ ही व्यक्तिचित्रे, ‘स्पंदने श्रीसमर्थाची, तुकारामांचे अभंग, निरंजनाचे माहेर’ ही समीक्षात्मक पुस्तके.
१९८५> ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ या गाजलेल्या कवितेचे कवी यशवंत तथा यशवंत दिनकर पेंढारकर यांचे निधन. ‘स्वातंत्र्य लक्ष्मीस मुजरा’ या काव्यगायनाने कवी म्हणून लोकमान्यता. ‘यशवंती’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्यानंतर यशोधन, यशोनिधी, यशोगिरी’ इ. काव्यसंग्रह तर बंदिशाळा, जयमंगल, काव्यकिरीट इ. खंडकाव्ये  प्रसिद्ध.
१९९१> अनुवादक व बालसाहित्यिक विश्वनाथ कृष्ण क्षेत्रीय यांचे निधन. राजा हर्ष, वेदांतील गोष्टी, रामायणसार इ. पुस्तके  प्रसिद्ध.
२००१> एकांकिका, नाटककार रमेश पवार यांचे निधन.
२००४>  ‘शिवनेर’ या वृत्तपत्राचे संस्थापक- संपादक विश्वनाथ बावळे यांचे निधन.
२००५> गांधी हत्येतील एक आरोपी आणि ‘गांधी हत्या व मी’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक गोपाळ विनायक गोडसे यांचे निधन.
– संजय वझरेकर

flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
Health Special, Pregnancy , dohale,
Health Special: गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?
Tipeshwar Sanctuary
VIDEO : टिपेश्वर अभयारण्यात वाघच नाही, तर रानकुत्र्यांसह ‘या’ वन्यप्राण्यांना पर्यटकांची पसंती
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…

वॉर अँड पीस                 हृद्रोग्यांकरिता विशेष पथ्यापथ्य (भाग-११)
हृद्रोगी पेशंटकरिता मागील लेखात पथ्यपाण्याची सामान्य दिशा सांगितली. त्या लेखातील पथ्यापथ्य आज वृद्धत्वाकडे झुकलेल्या हार्ट पेशंटकरिता पुरेसे आहे. पण अलीकडे तिशी-चाळिशीच्या वयातच तरुण मंडळींना हृद्रोगाची बाधा, थोडय़ाशाही श्रमाने फा-फू होणे, धाप लागणे, हार्टवर प्रेशर येणे अशी लक्षणे त्रस्त करतात. कारण तरुण पिढीचे जीवन दिवसेंदिवस अतिशय धावपळीचे होत चालले आहे. खाण्यापिण्याच्या वेळा, पदार्थाची आवडनिवड यात पूर्वीपेक्षा प्रचंड बदल होत आहे. या पिढीकरिता हृद्रोग समस्येकरिता  काही वेगळा विचार आपण करीत आहोत. टोमॅटो खूपच स्वस्त असतात. टोमॅटोच्या रसात लायकोपिन नावाचा घटक असतो. हा घटक शरीरातील  कोलेस्टेरोल कमी करायला मदत करतो. तसेच रक्तवाहिन्या कडक होण्यालाही अटकाव करतो. या रसाचे सेवन हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये प्लेटलेट्स साठून रक्ताची गुठळी निर्माण होण्यास विरोध करते. रक्तवाहिन्यांमध्ये प्लेटलेट्स साठणे हे हृदयरोगाचे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे टोमॅटोचा रस हृदयासाठी फायदेशीर ठरतो. जे लोक आहारात नियमितपणे टोमॅटो खातात त्यांना हृदयविकार होण्याचा धोका म्हणूनच कमी असतो. टोमॅटोचा रस ताजा काढलेला असावा. टोमॅटो सॉस, टोमॅटो केचअप असे बाजारू पदार्थ कदापि वापरू नयेत. कागदी लिंबू, संत्रे, मोसंबी, आवळा, कोकम अशा ताज्या फळांमध्ये सर्वाना हवेहवेसे वाटणारे पुरेसे ‘सी’ व्हिटामिन असते. ही फळे ताजी खावीत. नाइलाज असला तरच त्याचे रस घ्यावेत. ते हृदयाला उत्तम बल देतात. रसामध्ये साखर वा मीठ अजिबात वापरू नये.  रताळे, बटाटा सोडून सर्व फळभाज्या, पालेभाज्या या  बॅड कोलेस्टेरोल याची पातळी  कमी करण्यात मोठे योगदान देतात. १०८ किलो वजन असणाऱ्या महिलेचे वजन, महिनाभर दुध्या भोपळा, पडवळ, दोडका, टिंडा, पखल, घोसाळी अशा भाज्या उकडून खाल्ल्यामुळे २१ किलोने कमी  झाल्याचा अनुभव मार्गदर्शक ठरावा. रोज एक शहाळ्याचे पाणी प्या. हृद्रोग हटवा. शुभं भवतु।
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी..      दिल्ली
गेल्या वर्षीच्या अखेरीस दिल्लीत तो भीषण प्रकार घडला. त्यात बळी गेलेली ती दुर्दैवी तर होतीच; परंतु अज्ञानीही होती. तिला हे माहीत नव्हतं की, दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारमधून येणाऱ्या असंस्कृत लोंढय़ांमुळे दिल्ली पार नासून गेली आहे, असे विधान केले होते. तिला हे माहीत नव्हते की, दिल्ली हे एक ना एक तऱ्हेच्या गुन्हेगारांचे माहेरघर आहे. यातले काही गुन्हेगार लोकसभेत आणि राज्यसभेत बसतात. ज्या बिहारमध्ये अपहरण, दरोडे, मारामाऱ्या, खून, बलात्कार होत असत,त्या प्रांताचा त्या काळचा, अनेक घोटाळे नावावर असलेला मुख्यमंत्री पुढे दिल्लीत मंत्री झाला. हाच लोकसभेत विदूषकासारखी भाषणे देतो तेव्हा खुद्द सोनिया गांधींना हसू आवरत नाही. त्या मुलीला हे माहीत नव्हतं की, जिच्या नवऱ्यावर आणि मुलावर निरपराध प्राण्यांची बेकायदा शिकार केल्याबद्दल खटले चालू आहेत ती बाईच भारतीय सेन्सॉर बोर्डाची अध्यक्ष आहे. ती मुलगी मला वाटते, एक सिनेमा बघितल्यावर त्या बसमध्ये चढली होती. जे हिंदी सिनेमे तिची कळत नकळत करमणूक करीत होते आणि तिच्यावर संस्कार करीत होते, त्यातल्या आयटम गर्ल्समुळे भारतातल्या सगळ्याच पुरुषांवर एक विपरीत परिणाम झाला आहे. या आयटम साँग्सवाल्या स्वत: संरक्षणासाठी पेहलवान बाळगतात, पण इतर स्त्रियांना वाऱ्यावर सोडतात, हे तिला कोठे माहीत होते? या सिनेमांमधल्या तथाकथित नायकांवर फुटपाथवरच्या लोकांना चिरडण्यासाठी किंवा अवैध शिकार करण्यासाठी किंवा अर्वाच्य बोलण्याबद्दल किंवा देशद्रोहासारख्या गुन्ह्य़ाबद्दल मामले चालू असले तरी हेच पुरुष तमाम जनतेचे हीरो आहेत. त्यामुळे जनतेचे मन घाणीने लडबडले आहे, हे तिला माहीत होते? दिल्लीचा पोलीस आयुक्तही शरमिंदा होता; परंतु दिल्लीच्या परिवहन खात्याने आणि पोलिसांनी त्या बसला भ्रष्टाचार करून परवाने दिले होते. त्याचे चालक नालायक होते. ते ज्या वस्तीतून आले होते त्या वस्तीतल्या गुंडांच्या आणि समाजकंटकांच्या आधाराने आपले समाज आणि राजकारण चालते, हे तिला माहीत होते? सद्यस्थितीला मी एकटा जबाबदार नाही. तेव्हा स्त्रियांनी सावधपणे वागले पाहिजे, असे तो म्हणताच एकच हलकल्लोळ झाला आणि आम्ही कसे वागायचे, कसे कपडे घालायचे, कुठे फिरायचे हे तुम्ही कोण ठरविणार, अशी ओरड झाली. त्यातच तो त्या तरुणीबरोबरचा मुलगा तिच्याशी लग्न करणार नव्हता, अशी बातमी छापून आली. त्याचा अन्वयार्थ काय लावायचा? ती गेली तिच्यावर महेश भट नावाच्या दिग्दर्शकाने गल्लाभरू हिंदी चित्रपट काढावा, हेच आता योग्य होईल. त्यात एक-दोन आयटम साँग्स पाहिजेतच आणि वरचे चार हीरो तुरुंगात नसतील तर त्यात कामे करू शकतील.