05 June 2020

News Flash

कुतूहल – कवक

अपुष्प वनस्पतींचा दुसरा महत्त्वाचा गट म्हणजे बुरशी. बुरशीला कवक म्हणूनही संबोधिले जाते.

कवक एकपेशीय किंवा बहुपेशीय असतात.

अपुष्प वनस्पतींचा दुसरा महत्त्वाचा गट म्हणजे बुरशी. बुरशीला कवक म्हणूनही संबोधिले जाते.  या वनस्पतीमध्ये हरितद्रव्य नसते त्यामुळे या वनस्पती स्वत:चे अन्न स्वत: तयार करू शकत नाहीत. कवक एकपेशीय किंवा बहुपेशीय असतात. ‘यीस्ट’ हे एकपेशीय कवक आहे. कवक हे आजकालच्या आपल्या आहारात रोजच वापरले जाते असे म्हटल्यास आश्चर्य वाटेल, पण आपण खातो तो ब्रेड आणि पाव ‘यीस्ट’शिवाय तयारच होऊ शकत नाही. अशाच प्रकारचे ‘अळंबी’ हे बहुपेशीय कवक आहे. ही कवके पांढऱ्या आणि विविध रंगांत आढळतात. तसेच त्यांच्या आकारातही खूप वैविध्य आहे. बहुतांश रंगीत अळंबी विषारी असल्याने खाण्यासाठी उपयुक्त नसतात. असे असले तरी रंगीत अळंबी आकर्षक असतात. जीवनक्रमानुसार कवकाचे दोन मुख्य गट पडतात. मृत वस्तूंवर जगणारे मृतोपजीवी आणि आणि परोपजीवी. निसर्गत: सगळीकडे कवक आढळून येतात. शिळापाव, पोळी, नासकी फळे, दमट पादत्राणे, ओल्या िभती अशा दमट जागी कवके हमखास सापडतात. काही कवकांची रचना साधी असते तर काहींची रचना गुंतागुंतीची असते. गुतागुंतीच्या रचनेच्या कवकांची संख्या मोठी आहे. कवकांची रचना सामान्यत: तंतुमय असते. नंतर काहींमध्ये विविध आकार तयार होतात. सर्व कवके बीजाणू तयार करतात आणि याच बीजाणूंपासून नवीन कवकाची निर्मिती होते. कवकामध्ये भूचर हा कवकाचा एक गट आहे. भूचर कुजलेल्या किंवा मृत वनस्पती किंवा प्राण्यांवर जगतात. उदा. रायझोपस, सेप्रोलेग्निया. कवकाच्या दुसऱ्या गटात मोडणाऱ्या कवकांना बीजानुधानी असतात, म्हणजेच त्यांना त्यांची सूक्ष्म आकाराची बीजे सामावणाऱ्या पिशवीसारखा एक अवयव असतो. हा कवकामधील सर्वात मोठा गट आहे. त्यात उपयोगी आणि उपद्रवी कवकांचा सामावेश आहे.
फफ बॉल, मोरचेला आणि भूछत्र यांच प्रथिनयुक्त अन्न म्हणून उपयोग होतो. भूछत्र किंवा अळंबी एक स्वादिष्ट पदार्थ समजला जातो. भूछत्रांमध्ये आकारात आणि रंगात खूप विविधता आढळते.
रंगीत भूछत्र सामन्यत: विषारी असतात. खाण्यायोग्य भूछत्र- बटण मशरूम, ऑयस्टर मशरूम, उपद्रवी मका, ज्वारी, गहू, शेंगदाणे, ऊस यांचे नुकसान करतात. या कवकांमुळे रस्ट, टिक्का असे रोग पसरतात.
डॉ. सी. एस. लट्ट (मुंबई)  मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

नगराख्यान – मध्ययुगीन वाहतूक व्यवस्था
nav02आपल्या मुंबईतल्या बेस्टच्या लाल रंगाच्या दुमजली बसप्रमाणेच लंडनच्या ‘ट्रान्सपोर्ट फॉर लंडन’च्या लाल रंगाच्या बस हे लंडन संस्कृतीचे एक प्रतीक झालेय. या बसने आणि खासगी मोटारींनी लंडनच्या रस्त्यांचा ताबा घेण्यापूर्वी घोडागाडय़ांची वर्दळ येथे चालत असे. व्हिक्टोरिया, चेस अँड पोनी, फॅटन आणि हॅन्सम कॅब अशा प्रकारच्या घोडागाडय़ा या रस्त्यांवर धावत, पण या सर्वात दिमाखदार होती ‘हॅन्सम कॅब’! उंच चाकांवर बसवलेली काळीभोर तुकतुकीत गाडी. पुढे उंच आसनावर बसलेला रुबाबदार गाडीवान, त्याच्या एका हातातील चामडय़ाचे काळेभोर लगाम, तर दुसऱ्या हातातील लांब उभा चाबूक आणि दोन बाजूंना दोन तांबडय़ा काचांचे आणि चकचकीत, चमकदार पितळी दिवे! या दिमाखदार वाहनाला शोभेल अशी दिमाखदार सवारी घेऊन ही हॅन्सम कॅब ठरावीक लयीत आणि घोडय़ांच्या टापांच्या ठेक्यात निघाली, की लंडनचे सारे वैभव एकवटल्यासारखे वाटे! अर्थात हे झाले श्रीमंतांचे महागडे, राजेशाही पब्लिक कॅरियर! इटालियन लोक हॅन्सम कॅबची तुलना व्हेनिसच्या गोंडोलाशी करीत. या बग्गीला लंडनची गोंडोला म्हणत. सामान्य माणसासाठी दगडी रस्त्यांवरून घोडय़ांच्या नालांचा खणखणाट करीत धावणाऱ्या घोडय़ांच्या ऑम्निबस होत्या. गरिबांना परवडणारी, दीड शिलिंगात लंडनमध्ये कोठेही पोहोचविणारी ऑम्निबस खूपच लोकप्रिय झाली. हळूहळू खासगी ऑम्निबसचे पीकच निघाले. विनोदाने म्हटले जायचे की, पुढच्या पन्नास वर्षांत लंडनचे सर्व रस्ते घोडय़ांच्या लिदीखाली झाकले जातील!
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2016 1:39 am

Web Title: fungus
टॅग Navneet
Next Stories
1 बिग बेन
2 आदर्श, आधुनिक पार्लमेंट
3 मध्ययुगीन पार्लमेंट
Just Now!
X