१९४४ साली जॉन फॉन नॉयमन व ऑस्कर मार्गेन्स्टर्न यांनी प्रसिद्ध केलेल्या ‘थिअरी ऑफ गेम्स अँड इकनॉमिक बिहेव्हिअर’ या पुस्तकातून खेळशास्त्राचा किंवा द्यूत सिद्धांताचा (गेम थिअरी) औपचारिक पाया रचला गेला. तथापि अनौपचारिक रूपात इतिहास आणि तत्त्वज्ञान यांच्या प्रांतात द्यूत सिद्धांतसदृश तर्कवाद पूर्वीपासून अस्तित्वात होता.

प्लेटोच्या लेखनात डेलियम लढाईबद्दलचे एक भाष्य आहे. लढाईसाठी उभ्या असलेल्या एखाद्या योद्धय़ाच्या असे मनात येऊ शकते की जर ही लढाई आपण जिंकणार असू तर त्यात माझे एकटय़ाचे योगदान नगण्यच असणार. मी असलो किंवा नसलो तरी फारसा फरक पडत नाही, पण मी इथे असल्याने माझा मृत्यू होण्याची वा मला इजा होण्याची शक्यता निश्चित आहे. आणि जर ही लढाई आपण हरणार असू तर माझे इथे न थांबणेच अधिक उचित होईल. आणि असाच विचार जर सर्व योद्धय़ांनी केला तर लढाई होणारच नाही. हा तर्कवाद गणिती द्यूतासदृशच आहे. कारडॅनो यांनी सोळाव्या शतकात तर जेन्स व पास्कल यांनी सतराव्या शतकात केलेले जुगारातील गणितावरचे लिखाण, विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अर्नेस्ट झर्मेलो यांचे बुद्धिबळ व संच सिद्धांत यांच्या संबंधाबद्दलचे लेखन या द्यूत सिद्धांताकडे जाणाऱ्या पाऊलखुणा म्हणता येतील.

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
NCERT tweaks Class 12th History book: Harappans indigenous, doubts over Aryan migration
एनसीईआरटी अभ्यासक्रमात बदल; ‘आता आर्य भारतातलेच’, काय सांगते नवे संशोधन?
peter higgs death marathi news, peter higgs god particle marathi news
‘देव कणा’चा सिद्धान्त मांडणारा शास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड… पीटर हिग्ज यांच्या ‘हिग्ज बोसॉन’ संशोधनाचे मोल काय?
ravi shastri
संवादातील स्पष्टता महत्त्वाची- शास्त्री

१९५० मध्ये जॉन नॅश यांनी आपली ‘नॅश समतोल’(इक्विलिब्रिअम) ही द्यूत सिद्धांतातली महत्त्वपूर्ण संकल्पना मांडली. द्यूत सिद्धांताचा अर्थशास्त्रात उपयोग केल्याबद्दल  १९९४ चे नोबेल पारितोषिक त्यांना विभागून मिळाले. आजवर ११ शास्त्रज्ञांना द्यूत सिद्धांताच्या वापराबद्दल नोबेल पुरस्कार मिळाला आहे.

१९७० पासून द्यूत सिद्धांताचा उत्क्रांतिवादातही वापर होऊ लागला. जॉन मायनार्ड स्मिथ यांनी ‘उत्क्रांतिवादी द्यूत सिद्धांत’ ही नवी शाखा विकसित केली. या द्यूतांमध्ये अधिक शिकार मिळावी म्हणून परस्परांशी झुंजणारे प्राणी, काळाच्या ओघात आपला वंश टिकावा म्हणून प्रयत्नशील असणारे पशुपक्षी, कीटक, वनस्पती हे खेळाडूंची भूमिका करतात. मिश्रजातीच्या प्राण्यांच्या समूहात कुठच्या जातीचे प्राणी किती प्रमाणात असतील, उत्परिवर्तनाने एखाद्या सजीवात घडलेला बदल काळाच्या ओघात टिकून राहील का, यासारखे प्रश्न सोडवण्यासाठी द्यूत सिद्धांत उपयुक्त ठरतो. अर्थशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र, कृत्रिम बुद्धिमत्ता, अशा बहुविध क्षेत्रांत द्यूत सिद्धांताचा वापर केला जातो. नवल नाही की द्यूत सिद्धांताचा विस्तार अनेक दिशांनी होत आहे जसे की मेटागेम थिअरी आणि हायपरगेम थिअरी.

कोटय़वधी वर्षे निसर्गाने मांडलेला विराट वैश्विक खेळ आणि त्याचा वेध घेण्यासाठी गणितज्ञांनी बनवलेले हे खेळाचे प्रारूप, यांच्यातील नाते समजून घेणे हा एक आनंददायी अनुभव आहे.

– प्रा. माणिक टेंबे

मराठी विज्ञान परिषद,

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

ईमेल : office@mavipamumbai.org