१९९८ चा ज्ञानपीठ पुरस्कार कन्नड भाषेतील प्रख्यात नाटककार श्री. गिरीश रघुनाथ कर्नाड यांना भारतीय साहित्यातील (१९७८ ते ९७) योगदानासाठी प्रदान करण्यात आला. पहिल्यांदाच एखाद्या नाटककाराला या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कन्नड आणि इंग्रजी या दोन्ही भाषांत समर्थपणे लेखन करणारे गिरीश कर्नाड हे  प्रख्यात नाटककार, लेखक, अभिनेता आणि चित्रपट दिग्दर्शक आहेत. बहुमुखी प्रतिभा लाभलेले, आकर्षक आणि संवेदनशील असे हे व्यक्तिमत्त्व आहे. अपार पुस्तकप्रेम, अफाट वाचन, चिंतन,  प्रयोगशीलता ही कर्नाडांची खास वैशिष्टय़े.

Keshav Venkatesh Chafekar Sports Hall,
पुणे : मुकुंदनगर येथील केशव व्यंकटेश चाफेकर क्रीडागृहात आग
chhattisgarh s Elephant Family, Settles in Maharashtra, female elephant, give birth to calf, gadchiroli district , gadchiroli elephant born, elephant news, gadchiroli news, marathi news, animal news,
VIDEO: छत्तीसगडच्या मादीने महाराष्ट्रात दिला पिल्लाला जन्म, ‘प्ररप्रांतीय’ हत्तींचा कुटुंबकबिला विस्तारला…
Satara lok sabha seat, ncp sharad pawar group, ncp ajit pawar group, shivendra singh raje, bjp, satara politics,
सातारा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला नाही -शिवेंद्रसिंहराजे
Meteorological department predicted heat wave in Raigad Thane Palghar along with Mumbai Pune
मुंबईसह रायगड, ठाणे, पालघरमध्ये उकाडा वाढणार; यवतमाळ, अकोला, चंद्रपुरात तीन दिवस उष्णतेची लाट

१९ मे १९३८ रोजी महाराष्ट्रातील माथेरान येथे गिरीश कर्नाड यांचा जन्म झाला. कर्नाड यांचे मूळगाव कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील ‘कार्नाड’ हे आहे. वडील श्री. रघुनाथ कर्नाड हे नावाजलेले डॉक्टर. आई कृष्णाबाई ऊर्फ कुट्टाक्का- बालविधवा असलेल्या, त्यांनी डॉ. कर्नाडांशी विवाह केल्यानंतर सामाजिक टीका झाली. या परिस्थितीतील तोंड देतच गिरीश यांचे बालपण शिरसी, धारवाड येथे गेले. शालेय शिक्षण पुण्याच्या मॉडर्न हायस्कूलमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण धारवाडच्या कर्नाटक कॉलेजात झाले. गणित आणि संख्याशास्त्र हे विषय घेऊन बी.ए.ची परीक्षा विद्यापीठात प्रथम क्रमांकाने ते उत्तीर्ण झाले. गणित हा त्यांचा आवडता विषय. गणितातील  एकाग्रता, शिस्त यांचा विलक्षण प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर आहे. पुढे प्रतिष्ठित ऱ्होडस शिष्यवृत्ती मिळवून ऑक्स्फर्ड विद्यापीठात तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या विषयांत १९६३ मध्ये त्यांनी एम.ए. केले. त्यानंतर तिथेच ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी प्रेसमध्ये काही काळ काम केल्यावर त्यांच्या मद्रास येथील कचेरीत ते  काम करू लागले.

लहानपणी आपण कवी व्हावे असे त्यांना वाटे. पण ‘ययाति’ नाटकाच्या एकटाकी लेखनामुळे मी खरोखरच कवी नसून नाटककार आहे हे त्यांना जाणवले. १९६१ मध्ये प्रकाशित झालेले ‘ययाति’ हे त्यांचे पहिले नाटक, त्यानंतर ‘तुघलक’, ‘हयवदन’, ‘अंजुमल्लिगे’, ‘नागमंडल’, ‘तालेरुंड’ इ. १३ नाटकांचे लेखन त्यांनी केले असून, एक लेखसंग्रह आणि ‘आडाडत आयुष्य’ ही त्यांची आत्मकथाही २०११ मध्ये प्रकाशित झाली आहे. याचा मराठी अनुवाद ‘खेळता खेळता आयुष्य’ उमा कुलकर्णी यांनी केला आहे. कर्नाडांनी महेश एलकुंचवार यांच्या काही मराठी नाटकांचे कन्नडमध्ये अनुवाद केले आहेत.

– मंगला गोखले – mangalagokhale22@gmail.com

कुतूहल

दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वी  DIN 476  ही कागदाच्या आकाराची मालिका जगातील बऱ्या च देशांत वापरली जाऊ लागली. भारतात ही मालिका १९५७ वापरायला सुरवात झाली. १९७५ मधे हीच पद्धती ‘ISO’ म्हणून ओळखली जाऊ लागली. सन १९७७ मध्ये संयुक्त राष्ट्रांनीदेखील या कागद आकारप्रणालीचा स्वीकार केला.

कागदाच्या आकाराची  B  मालिका  ही  A मालिकेइतकी  प्रचलित नाही; पण B  मालिकेतही लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर १.४१४२ :१ असे असते. भौमितिकदृष्टय़ा B  मालिकेतील आकार, A मालिकेच्या दोन आकारांच्या मधला आकार म्हणता येईल.  उदा. B1 आकाराच्या कागदाची लांबी ही AO व A1 या आकारांच्या लांबींचा भौमितीय मध्य (Geometric mean) असतो. या मालिकेतील आकार कार्यालयीन कामासाठी उपयोगी नाहीत पण विशेष कारणासाठी, उदा. पोस्टर्स, पाकिटे, पासपोर्ट इ. साठी उपयोगात येतात.

A मालिका, B  मालिका  या  कागदाच्या आकाराशिवाय आणखी वेगळ्या आकारमानांच्या कागदाची आवश्यकता भासू लागली, आणि आस्तित्वात आली C मालिका!  या मालिकेतील आकारमानाचे कागद मुख्यत: पाकिटांसाठी वापरले जातात. याला ISO269l’ असे ओळखले जाते.C मालिकेतही लांबी रुंदीचे गुणोत्तर १.४१४२ : १ हेच असते. C मालिकेतील आकार A व B मालिकेतीलआकारांच्या मधलाआकारअसतो. उदा. C4 ची लांबी ही A4 व B4 यांच्या लांबींचा भौमितीय मध्य(Geometric mean) आहे. म्हणजे  C4 आकाराचा कागद A4 आकारापेक्षा थोडा मोठा असेल व B4 आकाराच्या  कागदापेक्षा थोडा लहान असेल.  याचा व्यावहारिक उपयोग म्हणजे A4 आकाराच्या कागदावर लिहिलेले पत्र C4 आकाराच्या पाकिटांत जाऊ शकेल आणि C4 आकाराच्या कागदावर लिहिलेले पत्र B4 आकाराच्या पाकिटांत!

वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या आकाराचे कागद उपयोगात आणले जातात. उदा. वर्तमानपत्र! वर्तमानपत्रांचे आकारसुध्दा वेगवेगळ्या देशात वेगवेगळे आहेत. छायाचित्र छपाईसाठीही  वेगवेगळ्या आकाराचे कागद वापरले जातात.

आंतरराष्ट्रीय स्तरावर कागदाच्या आकारा संबंधात मानके मान्य झाली असली;  तरी प्रत्येक देशाने आपापल्या गरजेनुसार, सोयीनुसार स्वत:ची स्वतंत्रमानके निर्माण केली व त्याला स्वतंत्र नावेही दिली. उदा. जर्मनीमध्ये  १९२२ साली DIN 476  ही आकारप्रणाली प्रसिध्द झाली. स्वीडनने A, B, C मालिकांबरोबर D, E, F, G    हे नवीन आकार उपयोगात आणले. जपानने B  मालिकेतीलआकारात सोयीप्रमाणे बदल केला. अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिटय़ूटने अभियांत्रिकी रेखाचित्रांसाठी वेगळी आकारप्रणाली, E  मालिका तयार केली.

-गार्गी लागू ,  मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org