गेल्या काही लेखांत आपण पाहत आहोत त्याप्रमाणे, एककांच्या नव्याने होऊ घातलेल्या व्याख्या केवळ एका मोजमापावर अवलंबून आहेत, ते म्हणजे सिझियम-१३३च्या अणूमधून येणाऱ्या प्रकाशलहरींची वारंवारता. यातून एकदा सेकंदाचे एकक निश्चित झाले की, प्रकाशाचा वेग, प्लँकचा स्थिरांक, बोल्ट्झमनचा स्थिरांक, इलेक्ट्रॉनचा अणुभार, अ‍ॅवोगाड्रोचा स्थिरांक आणि प्रकाशदीप्ती गुणकारिता, अशा एकूण सहा नैसर्गिकस्थिरांकांच्या मदतीने उरलेली मीटर, किलोग्रॅम, केल्विन, अँपिअर, मोल आणि कँडेला ही सहा एकके सहज निश्चित करता येतात. वैश्विक स्थिरांक स्थलकालावर अवलंबून नसल्याने ते अधिकाधिक अचूकतेने मोजता येऊ शकतात. एकदा का त्यांच्या किमती माहीत झाल्या, की प्रत्येक एककासाठी नवे मोजमाप असण्याची जरूर नाही.

एककांच्या व्याख्यांमधील हा बदल खरेच मूलभूत आहे. केवळ एककनिश्चिती सुलभ करणे एवढय़ापुरतेच याचे महत्त्व मर्यादित नाही, तर वैश्विक स्थिरांकांची मदत घेऊन सारी एकके एकमेकांशी साधणारा हा बदल आहे. लांबी, वेळ, वस्तुमान, तापमान, विद्युतप्रवाह, कणसंख्या आणि प्रकाशदीप्ती ही वरवर पाहता विभिन्न असणारी परिमाणे निसर्गनियमांनी एकमेकांशी जोडलेली आहेत याची प्रचीती यातून येते. अर्थात ही सारी इमारत, ‘वैश्विक स्थिरांक स्थल-कालावर अवलंबून नाहीत’ या पायावर आधारलेली आहे. हा पाया आजवरच्या असंख्य निरीक्षणांनी भक्कम बनवलेला आहे. जर भविष्यात एखादा स्थिरांक बदलताना आढळून आलाच, तर विज्ञानात घडलेली ती मोठी क्रांती असेल.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
summer
सुसह्य उन्हाळा!
Benefits of Drinking Okra Water
एक महिना ‘हे’ पाणी प्यायल्याने झपाट्याने वजन होईल कमी; कोलेस्ट्रॉलही राहील नियंत्रणात, एकदा फायदे वाचाच!
How Suryanamaskar and pranayama can help you fight spring allergies
तुम्हालाही वारंवार शिंका येतात का? रोज करा ‘हे’ दोन प्रभावी प्राणायाम अन् व्हा अ‍ॅलर्जी फ्री

एककांविषयी व वैश्विक स्थिरांकांविषयी जरा विचार केला तर लक्षात येईल की, एक मीटर, एक सेकंद, एक किलोग्रॅम वगरेंची व्याख्या जेव्हा प्रथम केली गेली तेव्हा त्यांना जोडणारे काही दुवे असतील याची कल्पनाही आपल्याला नव्हती. यामुळेच या स्थिरांकांच्या किमती जरा अडनिडय़ा आहेत. योग्यरीत्या एककांच्या व्याख्या करून आपण या साऱ्याच स्थिरांकांच्या किमती ‘एक’ करू शकतो. अशा एकक पद्धतीला नैसर्गिकएकक पद्धती म्हणतात आणि मूलकणशास्त्रासारख्या भौतिकशास्त्राच्या काही शाखांमध्ये ही पद्धत बऱ्याचदा वापरली जाते.

E = mc2 हे व यासारखी इतर सूत्रे वापरून वस्तुमान, तापमान यांसारख्या गोष्टी ऊर्जेच्या एककांमध्ये व्यक्त करता येऊ शकतात. एरवीही आपण सहजपणे ‘प्रकाशवर्ष’ म्हणताना ‘वर्ष’ या कालाच्या परिमाणाला नकळतपणे अंतराचे परिमाण बनवतो ते प्रकाशाचा वेग वापरूनच. वैश्विक स्थिरांक अशा प्रकारे एककांचे एकत्रीकरण घडवून आणतात. अगदी रोजच्या व्यवहारातल्या लांबी, रुंदी, वेळ, वजन यांसारख्या गोष्टींची अचूक मोजमापे ही सापेक्षतावाद, क्वांटम सिद्धांत, उष्मप्रवैगिकी यांसारख्या शाखांतील प्रगतीवर आधारलेली आहेत. यावरूनच, विज्ञान आपल्या जीवनात केवढे भिनले आहे याचा अंदाज येऊ शकतो.

डॉ. अमोल दिघे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

शंख घोष (बंगाली, २०१६)

२०१६चा ज्ञानपीठ पुरस्कार प्रसिद्ध बंगाली कवी, समीक्षक शंख घोष यांना प्रदान करण्यात आला. वयाच्या ८५व्या वर्षी ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे शंख घोष हे सहावे बंगाली साहित्यिक. यापूर्वी ताराशंकर बंडोपाध्याय (१९६६), विष्णू डे (१९७१), आशापूर्णादेवी (१९७६), सुभाष मुखोपाध्याय (१९९१), महाश्वेतादेवी (१९९७) हे बंगाली साहित्यिक ‘ज्ञानपीठ’ने सन्मानित झाले होते.

शंख घोष यांचा जन्म त्रिपुरा राज्यातील चांदपूर गावात (आता बांगलादेशात) ६ फेब्रुवारी १९३२ रोजी झाला. त्यांचे वडील मणींद्रकुमार घोष हे प्रसिद्ध व्याकरण आणि भाषाविद् होते. शंख घोष हे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणात हुशार विद्यार्थी होते. बंगाली विषय घेऊन बीएच्या परीक्षेत त्यांना बंकिमचंद्र पदक मिळाले. तसेच एम.ए.च्या परीक्षेत ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. १९५५ ते १९६५ मध्ये त्यांनी विविध महाविद्यालयांत अध्यापन केले. १९६५ मध्ये त्यांनी विविध महाविद्यालयांत अध्यापन केले. १९६५ मध्ये ते कोलकात्याच्या जाधवपूर विद्यापीठात निवृत्त होईपर्यंत (१९९२) कार्यरत होते. रवींद्रनाथ टागोरांच्या साहित्याचे अग्रगण्य तज्ज्ञ म्हणून ते समजले जातात.

कविता, समीक्षा, निबंध, किस्सेवजा संस्मरणे आणि बालसाहित्यही त्यांचे प्रसिद्ध झाले आहे. हिंदी, मराठी, मल्याळम, पंजाबी, आसामी, इंग्रजी व काही परदेशी भाषांत घोष यांच्या काही कवितांचे अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत.  दिंगुली रातगुली (१९५६) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. आदिमलता गुल्ममय, मुखोबारो, सामाजिक नॉय, बाबारेर प्रार्थना, निहिता पतलछाया या त्यांच्या साहित्यकृती विशेष गाजल्या. प्रहार जोडा त्रिताल, गंधर्व कविता गुच्छ, चांदेर भितरे एतो अंधकार, जल ए पाषाण हाए आछे (२००४) हे काव्यसंग्रहही प्रसिद्ध आहेत. समाजमूल्य ऱ्हासाच्या जाणिवेतून आलेल्या नैराश्यातून, वेदनेतून ते आपल्या कवितेत उपरोध, क्रोध भावना व्यक्त करतात.  बंगाली साहित्याला नवीन शक्ती देण्याचे काम त्यांच्या साहित्यकृतींनी केले आहे.रवींद्रनाथ ठाकूरकालीन आणि त्यानंतरच्या संपूर्ण साहित्याची त्यांनी केलेली समीक्षा सवरेत्कृष्ट मानली जाते. त्यांची समीक्षा नि:शब्देर तर्जनी, शब्द आर सत्य, कलानार हिस्टिरिया कविर अभिप्राय आदी   सात संग्रहांतून  पुस्तकरूपाने प्रकाशित झाली आहे.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com