रुपाली शाईवाले

२००८ साली विविध देशांतील सर्वसामान्य लोकांची जीवनशैली आणि तिचा पर्यावरणावर होणारा परिणाम याचा अभ्यास करण्यासाठी नॅशनल जिओग्राफिक सोसायटीने एक सर्वेक्षण केले होते. यासाठी त्यांनी भारत, ब्राझील यांसारख्या विकसनशील देशांबरोबर ब्रिटन, अमेरिका अशा अतिप्रगत आणि विकसित असलेल्या एकूण १४ देशांमधील नागरिकांकडून एक प्रश्नावली भरून घेतली. वेगवेगळ्या देशांचे नागरिक उपभोक्त्यांच्या/ग्राहकांच्या रूपात असताना पर्यावरणाबद्दल कितपत जागरूक असतात, याचा आढावा या अभ्यासातून घेण्यात आला. प्रत्येक देशाला मिळालेल्या गुणांना त्यांनी ‘ग्रीनडेक्स’ असे नाव दिले. या सर्वेक्षणाचा निकाल साधारण अपेक्षित असाच होता. भारत आणि ब्राझील यांसारख्या विकसनशील देशांतील ग्राहकांना १०० पैकी ६० गुण मिळाले, तर अमेरिकेतील ग्राहकांना सर्वात कमी- म्हणजे ४४.९ गुण मिळाले. यातून- विकसनशील देशांमधील ग्राहक पर्यावरणाविषयी अधिक जागरूक आहेत आणि पर्यावरणाविषयी स्वत:ला जबाबदार मानतात; तसेच पर्यावरणाविषयी बोलण्यास/ऐकण्यास ते अधिक उत्सुक असतात, पर्यावरणावरील परिणाम टाळण्यासाठी काही तरी करावे अशी त्यांची इच्छा असते, असा निष्कर्ष काढण्यात आला.

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
Apple CERT-In Security Alert Marathi News
लाखो iOS – Android युजर्सचा डेटा चोरी होण्याचा धोका! फोनमध्ये ‘हे’ बदल करून घ्यायचा CERT-In चा इशारा
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

भारतात दरवर्षीप्रमाणे आज, २८ सप्टेंबर रोजी ‘हरित ग्राहक दिन’ पाळला जाणार आहे. यानिमित्ताने, आपल्यातील ‘हरित ग्राहक’ कोणाला म्हणावे, या प्रश्नाची उकल करण्याचा प्रयत्न करू.. आपण बाजारात जाऊन ज्या वस्तू विकत घेतो, त्या वस्तूंच्या निर्मितीसाठी किती प्रमाणात पाणी, ऊर्जा व इतर नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करावा लागला असेल आणि त्याचा पर्यावरणावर काय परिणाम झाला असेल? उत्पादन प्रक्रियेत किती व कशा प्रकारचा कचरा निर्माण होत असेल? या वस्तू पुन:पुन्हा वापरात येतील का? या वस्तूंचं ‘रिसायकलिंग’ होऊ शकेल का? अशा प्रकारचे प्रश्न जर आपल्या मनात येत असतील, तर ते आपण ‘हरित ग्राहक’ असल्याचे लक्षण आहे हे नक्की समजावे. याव्यतिरिक्त दळणवळणासाठी आपण निवडत असलेले परिवहनाचे पर्याय, रोजच्या अन्नाचा स्रोत, पारंपरिक वस्तूंऐवजी पर्यावरणास उपकारक वस्तूंचा वापर, पर्यावरणाच्या संवर्धनाविषयीचा दृष्टिकोन हे गुणही ‘हरित ग्राहक’ म्हणून पात्र ठरण्यास महत्त्वाचे आहेत.

सरकारी व संस्थात्मक पातळीवर ‘हरित ग्राहक दिना’निमित्त निरनिराळे कार्यक्रम केले जातातच; पण वैयक्तिक पातळीवरही छोटे-छोटे उपाय शोधून आपल्या परीने आपापल्या परिसरात जनजागृती मोहिमा राबवता येतील!

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ office@mavipamumbai.org