पूर्वी दंतमंजन म्हणून पावडर स्वरूपात वनौषधींचा वापर होत असे. आता नीम, मिसवाक, लवंग, बाभूळ, पुदिना, पिंपळी यांसारख्या वनौषधींचा समावेश असलेल्या अनेक हर्बल टूथपेस्ट बाजारात उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त कापूर, तोमर बीज या पदार्थाचा समावेशही काही टूथपेस्टमध्ये केलेला असतो. या वनौषधींमध्ये कोणती रसायने असतात, जी दातांचे संरक्षण करतात?  
दातदुखीसाठी लवंग तेलाचा वापर आजही केला जातो. लवंगेमध्ये अ‍ॅसिटाइल युजेनॉल, मिथाइल सॅलिसिलेट, गॅलेटोनिक अ‍ॅसिड ही रसायने असतात. मिथाइल सॅलिसिलेट संवेदनाहारक म्हणून कार्य करते. पुदिन्याचा उपयोग श्वासाची दरुगधी दूर करण्यास होतो. पुदिन्याच्या अनेक जाती आढळतात, त्यातील पेपरिमटच्या तेलाचा उपयोग स्वादाकरिता अधिक केला जातो. जपानी िमटच्या तेलाचाही वापर केला जातो. या तेलात मेंथॉल, मिथाइल अ‍ॅसिटेट, मेंथोन आणि हायड्रोकार्बन असतात. तोमर बीज सूक्ष्म जीवाणूरोधक म्हणून टूथपेस्टमध्ये वापरतात. तोमर बीजामध्ये फ्युरोक्विनोलाइंस, निटिडीन, काब्रेझोल्स असे अनेक प्रकारचे अल्कलॉइड्स असतात.
बाभूळ झाडाच्या सालीचा वापर टूथपेस्टमध्ये करतात. बाभूळ झाडाच्या सालीत टॅनिन आणि गॅलिक अ‍ॅसिड असते, त्यामुळे साल तुरट-कडवट लागते. बाभूळ दात आणि हिरडय़ा मजबूत करते.
मिसवाक, मराठीत पिलू आणि ज्याला टूथब्रश ट्री असे म्हणतात, मिसवाकच्या काडय़ा कडुिलबाच्या काडय़ांसारख्या टूथब्रश म्हणून वापरत असत. मिसवाकमध्ये जीवाणूरोधक गुणधर्म आहे. मिसवाकमुळे दातांवरील किटण (प्लाक) कमी होते, हिरडय़ा आकसून येतात. मिसवाकमध्ये काबरेहायड्रेट, ट्रायमिथाइल अमाइन, क्लोराइड्स, व्हिटॅमिन सी, ग्लाकोसाइड्स, फ्लोराइड, सिलिका आणि काही प्रमाणात टॅनिन फ्लेवॉनॉइड्स, स्टेरॉल्स ही रसायने असतात. सिलिका अपघर्षकाचे कार्य करते.
कापूर हा किटोन या कार्बनी संयुगाच्या वर्गातील रासायनिक पदार्थ आहे. पिपळी आणि कापूर जंतुनाशक आहे तसेच श्वासाची दरुगधी आणि दातदुखी दूर करण्यासाठी कापराचा उपयोग होतो. पिपळीमध्ये पिपरीन हे अल्कलॉइड असते. कोरांटीमध्ये (वज्रदंती) अल्कलॉइड आणि पोटॅशियम असते. कोरांटीमुळे हिरडय़ांमधून रक्त येणे थांबते. या वनौषधींव्यतिरिक्त दालचिनी, जांभूळ साल, ज्येष्ठमध, आवळा यांचाही समावेश हर्बल टूथपेस्टमध्ये केला जातो.
अनघा वक्टे (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – कालीदासने शिकवलेले मानसशास्त्र
खुली पलकमें झूठा गुस्सा बंद पलकमे प्यार
आँखोंमें इकरार झलकी, होठोंपे इन्कार
जीना भी मुष्किल, मरना भी मुष्किल..
‘प्रोफेसर’ या जुन्या हिंदी सिनेमातल्या या गाण्यात नायकाच्या गोंधळलेल्या मनाचं बहारदार चित्र उमटलं आहे. ‘आय लव यू’ या तीन शब्दांमधून  तिनं प्रेमाचा स्वीकार केल्याचं मुखरित करावं, अशी त्याची मनोमन इच्छा आहे. पण त्या मुग्ध प्रेयसीनं कोणतंच धड उत्तर देऊ नये, उघडय़ा डोळ्यात लटका राग आणि बंद डोळ्यात प्यार, तिच्या नजरेत होकार आणि ओठांवर नकार अशा बॉडी लँग्वेजमुळे नायक गोंधळून जातो.
अशा तऱ्हेनं प्रिय व्यक्तीची बॉडी लँग्वेज न कळणं हे काही आजचं नाही. या ना त्या प्रकारानं तिनं स्वीकार आणि होकार कळवावा या ईर्षेनं पेटलेला नायक मोठय़ा आशेनं तिच्याकडे पाहतो आणि ती त्याच्या बॉडी लँग्वेजचा नेमका उलटा आणि भलताच अर्थ काढते, इतकेच नव्हे तर त्याला शब्दांनी उत्तरही न देता सरळ पुढे निघून जाते. मित्रा, ही गोष्ट कॉलेजच्या कँटीनमधली नाही, चक्क दीपशिखा कालिदासांच्या ‘रघुवंशम्’ नाटकातल्या इंदुमतीच्या स्वयंवरातली आहे. कालिदासांची प्रतिभा इंदुमतीच्या स्वयंवरातल्या या विलक्षण बॉडी लँग्वेजद्वारा घडणाऱ्या नि:शब्द संवादाची गोष्ट व प्रभावी नि नेमक्या शब्दात सांगते.
कल्पना कर, इंदुमती या विधात्याच्या सवरेत्कृष्ट कलकृतींचा (विधातु: विधानातिशय) स्वयंवरमंडप.
देशी-प्रदेशी नृप इथे सिंहासनावर आतुरतेने वाट पाहात आहेत. अशा अत्युच्च उत्सुक प्रसंगी इंदुमती वरमाला घेऊन प्रवेशते आणि साऱ्या राजांच्या मनात एकच इच्छा प्रबळ होते. तिने मला वरावे.. ते नकळत तिचं लक्ष वेधून घेण्यासाठी प्रणयचेष्टा करू लागतात. या प्रणयचेष्टा म्हणजे प्रणयाराधनेचे अग्रदूत.
इंदुमती या नृपतीकडे हलका कटाक्ष टाकून हळूहळू पुढे सरकते. त्या दीपशिखेच्या प्रकाशानं त्यांचे चेहरे मोठय़ा आशेने उजळतात आणि ती पुढे गेली की काळवंडतात. (म्हणून इंदुमती दीपशिखा आणि कालिदासही दीपशिखा कालिदास!)
एक राजा आपल्या हातातले लीलाकमळ गरगर फिरवून सूचित करीत होता की या कमळाला जसा मी फिरवतो तसा मी तुझ्या हातातले खेळणे होईन. इंदुमती त्याची बॉडी लँग्वेज वाचून म्हणते, हा राजा भलताच चंचल.. सुनंदे (तिची सखी) हो पुढे. राजा काळवंडला!!
दुसऱ्या राजाने खांद्यावरून सरकलेल्या बाहुभूषणाला योग्य जागी ठेवण्यासाठी आपले मुख तिरपे करून उत्तरीयाने खांदा झाकला. तो जणू काही सुचवीत होता, अशा रीतीने मी तुला हलकेच आलिंगन देईन! इंदुमती म्हणते, उत्तरीयांनी खांदा झाकणे म्हणजे जणू काही आपले वैगुण्य लपविणे!! मला तर तुझ्याकडे पाहायचेदेखील नाही.
त्या पुढचा राजा न ढळलेला मुकुट सावरून सुचवतोय की मी तुला मस्तकावर धारण करीन.. हं.. हा तर स्वत:च डोक्याला हात लावून अपशकुन करतोय.. सुनंदे, हो पुढे!
तर नंतरचा राजा आपल्या  सुहृदाशी गुजगोष्टी करतोय, ‘असा प्रेमालाप करीन हो तुझ्याशी’ असं सुचविणाऱ्या राजाची बॉडी लँग्वेज, इंदुमतीला मात्र गप्पिष्ट, कृती न करणाऱ्या अशा व्यक्तीची वाटते आहे.. ..सुनंदे, हो पुढे!
मानसशास्त्र शिकावं ते त्या कालिदासाच्या प्रतिभाविलसितांवरून, संस्कृत नाटकांतल्या रम्य प्रसंगांतून.
डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com
साभार संदर्भ- स्तबक,
लेखक- मो. दि. पराडकर,
संवादक- डॉ. आसावरी बापट.  

easy trip planners limited, company share, stock market, share market, portfolio, share market portfolio, stock market portfolio, easemytrip, trip planning company, holiday planning company, holiday packages, trip planning service, airline ticket service, finance article,
माझा पोर्टफोलियो : प्रवास सोपा नाही म्हणून!
Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना
market is loaded with cakes candies chocolates for Easter festival
ईस्टर सणासाठी बाजारात केक, कॅन्डी, चॉकलेटची रेलचेल
Using skin lightening cream can cause kidney cancer
सावधान! त्वचा उजळणारे क्रिम वापरताय तर हे नक्की वाचा…

प्रबोधन पर्व – समाजाला पैलू पाडण्याचा आगरकरी प्रशस्त मार्ग
‘‘कोणत्याहि देशांत जों जों अधिकाधिक सुधारणा होत जाते तों तों त्यांतील लोकांच्या अंगीं अधिकाधिक सूक्ष्मवेदित्व किंवा शीघ्रग्राहित्व येत जातें व त्यामुळें त्यांचा एकमेकांपासून एकमेकांस जितका कमी त्रास होईल तितका होऊं देण्यासाठीं व प्रत्येकास अधिकाधिक स्वातंत्र्याचा उपभोग मिळण्यासाठीं, प्रतिदिवशीं नवीन नवीन गोष्टींत सरकारचें साहाय्य घेऊन, कायद्यांची संख्या वाढविण्याचा आणि त्याप्रमाणें न्याय देण्यासाठीं न्यायाधिशांचें काम अधिकाधिक कठिण करण्याचा क्रम एकसारखा चालू आहे. अशा प्रकारच्या बाह्य बंधनांनीं मनुष्यांच्या अंतकरणांतील दुष्प्रवृत्तींचा मोड हळूहळू होत जाऊन, त्यांचें बहुतेक वर्तन सहजगत्या नीतिसंमत किंवा न्यायानुसारी होऊं लागल्याशिवाय या क्रमास खळ पडणार नाहीं, असें वाटतें.’’
बोलके सुधारक, कत्रे सुधारक आणि सुधारणा िनदक असे भेद करून ‘सुधारककार’ आगरकर सुधारणेचा योग्य मार्ग सांगतात – ‘‘समाज हा स्वाभाविकपणें ज्यास अनेक पलू आहेत अशा खडय़ासारखा आहे. असला खडा खाणींतून नुकताच काढला असल्यास, विशिष्ट आकार, सफाई किंवा तेज यांपकीं कोणतेच गुण त्यांत नसतात, पण कल्पक सुवर्णकारांकडून जसजसें त्यावर घर्षण होत जातें तसतसें त्यास मोहक स्वरूप येत जातें. देशांतील विचारी लोक हे कल्पक सुवर्णकार होत व समाज हा त्यांच्या हातीं दिलेला पलूदार खडा होय. या खडय़ावर सरकारी साहाय्य, स्वतचा प्रयत्न वगरे हत्यारांनीं काम करून ते त्यास मोहकपणा आणितात. ज्या कामास ज्या वेळीं जें हत्यार पाहिजे असेल तें घेतलें पाहिजे.. ’’
‘‘.. सगळे पलू साफ झाल्याखेरीज समाजखडा कोहिनुराप्रमाणें कधींच चमकूं लागणार नाहीं, हें ज्यानें त्यानें ध्यानांत वागवून, आपापल्या पलूवर होईल तितकी मेहनत करीत असावें, आणि मत्सर व क्षुद्र बुद्धि यांचा त्याग करून, दुसऱ्यास होईल तितका हातभार लावावा, हाच सुधारणेचा अत्यंत प्रशस्त मार्ग होय.’’