आधुनिक मधमाश्यापालन तंत्राच्या विकासाचा पायाभरणीचा काळ इ. स. १६०० ते १८५१ हा म्हणता येईल. या काळात हे तंत्र कसं विकसित झालं, हे समजण्यासाठी मोहोळाच्या रचनेची आणि त्यातील घटकांच्या कार्यप्रणालीची त्रोटक माहिती घ्यायला हवी.
मोहोळात असते एक राणीमाशी म्हणजे कुटुंबाची आई. तिच्या आठ ते दहा हजार वांझ मुली किंवा मादी माश्या म्हणजे कामकरी माश्या आणि फुलांच्या ऐन हंगामातच जन्मणारे तिचे हजारभर मुलगे म्हणजे नर. त्यांचा जन्म फक्त राणीशी संयोग होण्यासाठीच्या मर्यादित काळापुरताच असतो. कामकरी माश्या मोहोळाची कामं आणि राणीमाशीची देखभाल आपल्या वयानुसार करतात.
मोहोळातील राणी कोवळ्या वयाच्या अळीचंच प्रौढ रूपांतर असतं. ती मोहोळाची आई असून मोहोळातील एकमेव सक्षम मादी असते. इंग्लंडच्या चार्ल्स बटलर याने १६०९ मध्ये नर मधमाश्यांचा शोध लावला. रिचर्ड रेम्नंट याने कामकरी माश्या स्रीिलगी घटक असून त्या प्रजननक्षम नसल्याचं १६३७ मध्ये जाहीर केलं. राणी मधमाशीचा नराशी संयोग कसा होतो, याची प्राथमिक स्वरूपाची माहिती स्लोव्हेनियाच्या एंटन जान्स्काने १७५१मध्ये वर्णन करून सांगितली.
  मधमाश्यांच्या मेण उत्पादनाबद्दलची माहिती अठराव्या शतकात समजली. हॉर्नबोस्टेल याने जर्मनीतून मेणाच्या खऱ्या स्रोताचा शोध १७१४ मध्ये लावला. तोवर अशी गरसमजूत होती की मेण फुलांमधून संकलित केलं जातं. मात्र ते कामकरी माश्यांच्या मेणग्रंथींतून स्रवतं, हे आता माहीत झालंय. १७१७ पर्यंत मकरंद आकाशातून पडतो, अशी समजूत होती. फ्रान्सच्या व्हेलंट याने मकरंद फुलातूनच स्रवतो आणि तो मधमाश्या गोळा करतात असं सांगितलं.
मधमाश्यांचं दुसरं नसíगक एकमेव अन्न म्हणजे परागकण. त्याचा शोध आर्यलडमधील आर्थर डॉब्ज यांनी १७५०मध्ये लावला. त्या शोधाचा महत्त्वाचा भाग म्हणजे मधमाश्या एकावेळी एकाच जातीच्या वनस्पतीच्या फुलांमधील परागकण संकलित करतात. त्यामुळे परागीभवन निश्चित होऊन बीज किंवा फलधारणाही निश्चितपणे होते. आनुवंशिकतेच्या निसर्गनियमाचाच हा महत्त्वाचा शोध होय. पुढे १७९३ मध्ये स्प्रेंगेल याने फुलांमधील परागीभवनासाठी मधमाश्या कशी महत्त्वाची भूमिका वठवितात अशी माहिती दिली.
    – डॉ. क. कृ. क्षीरसागर (पुणे) मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

आजचे महाराष्ट्रसारस्वत        २४ एप्रिल
१८९६ > पेशाने वकील असूनही मराठीतील पहिले ‘शेतकरी कादंबरीकार’ ठरलेले रघुनाथ वामन दिघे यांचा जन्म. ‘पाणकळा’, ‘पड रे पाण्या’, ‘आई आहे शेतात’, ‘कार्तिकी’ या त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या. ग्रामीण जीवनाचे जवळून निरीक्षण, हा त्यांच्या लेखनाचा प्राण होता. १९८० साली त्यांचे निधन झाले.
१९२४ > ‘आदर्श मराठी शब्दकोश’कर्ते प्रल्हाद नरहर जोशी यांचा जन्म. १८ पुराणे, १० उपपुराणे मराठीत आणण्यासह तब्बल अडीचशे पुस्तकांचे काम त्यांनी ४० वर्षांच्या कारकिर्दीत केले. २००४ मध्ये ते निवर्तले.
१९३०> रेखाचित्रकार आणि उपयोजित कलावंत बाळ ठाकूर (भालचंद्र शिवराम ठाकूर) यांचा जन्म. ‘मौज’मधील चित्रे आजही त्यांची असतात. ‘रवीन्द्रनाथ- तीन व्याख्याने’, ‘तीन पैशांचा तमाशा’, ‘साधा माणूस’ आदी त्यांची मुखपृष्ठे चित्रांमधील, तर ‘धर्म आणि लोकसाहित्य’सारखे मुखपृष्ठ अक्षररचनेतील त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात.  
२००६ > भारतीय आदिवासी जीवनावर सांगोपांग संशोधन करणारे डॉ. गोविंद गारे यांचे निधन. ‘ट्रायबल्स इन इंडिया’ हा त्यांचा ग्रंथ इंग्रजीत आहे. त्याखेरीज मराठीतही २५ ग्रंथ त्यांनी लिहिले होते. वारली व महाराष्ट्रातील अन्य जमातींचा विशेष अभ्यास त्यांनी केला.
संजय वझरेकर

How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क

वॉर अँड पीस                                       तोंड येणे : मुखपाक – भाग ३
तोंड येणे हा विकार नव्यानेच उद्भवला असल्यास प्रवाळ, कामदुधा, चंदनादिवटी प्र. ३ गोळ्या दोन वेळा घ्याव्यात. रात्रौ आठवणीने त्रिफळा चूर्ण घ्यावे. इरिमेदादि तेल, जीभेस, दात, हिरडय़ा, गाल यांना आतून सर्वत्र पुन:पुन्हा लावावे. त्या तेलाचे अभावी घरी केलेले तूप, लोणी लावावे. तूप व कोमट पाणी किंवा इरिमेदादितेल व कोमट पाणी यांच्या गुळण्या कराव्यात. घरात चंदन खोड असल्यास, उगाळून त्याचे गंध चमचा दोन चमचे घ्यावे. धने ठेचून, काही काळ भिजत ठेवून त्याचे पाणी प्यावे.
रुग्ण कृश असल्यास, शरीरात स्निग्धतेचा अभाव असल्यास; शतावरी घृत दोन चमचे सकाळ सायंकाळ घ्यावे. तोंड येण्याबरोबरच महिलांना अंगावरून खूप लाल विटाळ जाण्याची खोड असल्यास शतावरी मुळ्या; २० ग्रॅम चार कप पाण्यात उकळून, आटवून एक कप काढा उरवावा; किमान सात दिवस घ्यावा. ज्यांना नाईलाजाने बाहेरचे जेवण जेवावे लागते; घरचे अन्न मिळत नाही; कारणपरत्वे चहा प्यावा लागतो; त्यांनी शक्य तेव्हा मुखपाक मिश्रण – शंखजिरे व गेरू चूर्णाचे मिश्रण तोंडात आतमध्ये वारंवार लावावे. ज्यांचे घरी ओला नारळ खवून त्याचे दूध तयार करण्याची सोय आहे; त्यांनी किमान एक दिवस असे नारळाचे दूध व नारळ पाणी भरपूर घ्यावे. आर्थिक परिस्थिती चांगली असल्यास मौक्तिकभस्म अर्धा ग्रॅम एक वा दोन वेळा घ्यावे.
काही वेळा मधुमेही रुग्णांना वारंवार तोंड येण्याची खोड असते; त्याकरिता रक्तशर्करा तपासून ती वाढली असल्यास मधुमेहाची, तुलनेने सुरक्षित औषधे, तज्ज्ञांचे सल्ल्याने घ्यावी. तोंडातील फोड हे पच्चमानाशयातील उष्णतेमुळे असल्यास प्रवाळ, कामदुधा व मौक्तिक भस्म यांचे प्रमाण दुप्पट करावे. पक्वाशयात रोगाचे कारण असल्यास; संडासला खडा होत असल्यास; शतावरी तेलाची पिचकारी एक वेळ घ्यावी. मलावरोध, खडा होणे, जुनाट तक्रार असल्यास बाळहिरडा, बाहवा मगज, गुलाबकळी, ज्येष्ठमध, सोनामुखी यांचा काढा तज्ज्ञांचे सल्ल्याने घ्यावा.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी..      महाभारत.. संपादकांची प्रतिभा
मागच्या प्रकरणातल्या भन्नाट बायका जरी महाभारतातल्या असल्या तरी त्याच महाभारतात ज्यांना आपण गुणवान, रूपवान आणि शीलवान स्त्रिया म्हणतो त्याही तेवढय़ाच प्रमाणात सापडतात. दहा हजार श्लोकांचे मूळ महाभारत पुढे एक लाख श्लोकांपर्यंत पोहोचले ते सौती या माणसामुळे. पूर्वीचे मूळ लेखक व्यास दैवी असतीलही; परंतु सौती सूतपुत्र होता आणि बहुजन समाजाची सुख-दु:खे आणि त्याच्यातल्या प्रचलित कथा महाभारतात बेमालूमपणे त्याने गुंफल्या, असे आपल्याला इतिहास सांगतो. दूरदर्शनवर अनेक वर्षांपूर्वी रामायण ही मालिका सादर होऊन लोकप्रिय झाली आणि मग महाभारताने तर घरे व्यापून टाकली. तेव्हा रामायण मालिकेचा निर्माता म्हणाला होता, ‘हे काही बरे झाले नाही. घरात महाभारताचे पारायण करण्याची प्रथा भारतात नाही. रामायण वाचतात महाभारत नाही.’ मूळ रामायणात सुष्ट आणि दुष्ट अशा दोनच प्रवृत्तींना ठळकपणे मांडले आहे, असा दावा आहे. रामायण सभ्य आहे महाभारत नाही असेच त्या निर्मात्याला म्हणावयाचे होते. महाभारतात मानवी जीवनाचे लुगडे आणि अंगवस्त्र काठ पदरासह संपूर्णपणे उलगडून दाखविण्यात आले आहे. खुद्द गीतेत जुगार हाही अवतार आहे, असे कृष्ण सांगतो, म्हणूनच तो चव्हाटय़ावरही खेळला जाऊ शकतो, असा अन्वयार्थ निघतो.
रात्रंदिनी आम्हाला युद्धाचाच प्रसंग असतो, असे जेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, तेव्हा ते अंतर्गत युद्धाबद्दल बोलतात; परंतु याअंतर्गत युद्धाची परिणती व्यवहारातल्या घटनांमध्ये घडते हे सत्य महाभारतात आपल्याला अनेक अंगाने समजावून सांगते आणि तेही गोष्टी रूपाने. महाभारत सगळेच्या सगळे वाचणे कोणाला शक्य आहे? परंतु निदान महाभारताबद्दल तरी आपण वाचलेच पाहिजे आणि जर वाचले तर व्यवहारात दिसणाऱ्या सगळ्या प्रकारच्या व्यथा आणि व्यक्ती आपल्याला महाभारतात सापडतील, अशी खात्री वाटते. व्यास जेव्हा महाभारत लिहिण्यास बसणार असे कळले तेव्हा जगातल्या सगळ्या विलक्षण कथांच्या लेखकांनी आपल्याकडे कमीपणा घेत व्यासांकडे आम्हालाही तुमच्या महाभारतात घ्या, असा लकडा लावत त्यांची भेट घेतली, असे दृश्य ज्ञानेश्वरांनी एका ओवीत उभे केले आहे. तेच शेवटी सौतीच्या मार्फत घडले. या सगळ्या कथांना एकत्र बांधण्याचे काम ज्या संपादकांनी केले त्यांना ज्ञानेश्वर कमरपट्टय़ाची उपमा देतात. त्या कमरपट्टय़ाला असलेल्या झिरमिऱ्यांचा उल्लेख मोठय़ा कौतुकाने करतात त्याचे कारण असे की, संपादकांनाही प्रतिभा असते. ते स्वत: स्वतंत्र लेखक असू शकतात; परंतु त्याहूनही महत्त्वाचे त्यांना गुणग्राही उदारपणाचा स्पर्श असतो म्हणूनच असले अद्वितीय वाङ्मय घडू शकते.
रविन मायदेव थत्ते