ब्रिटिशांच्या कवायती, तंत्रशुद्ध, चोख लष्करी प्रकाशन असलेल्या सेनेला टक्कर देताना आपले सेनादल कुचकामी असल्याचे बहुतेक संस्थानिकांच्या लक्षात आले. त्यामुळे युरोपमधील सनिक, लष्करी अधिकारी, स्वच्छंदी धाडसी प्रवासी यांना भारतीय संस्थानांमध्ये आपले कर्तृत्व दाखवण्यासाठी मोठा वाव होता. या संधीचा फायदा उठवीत अनेक युरोपियन तरुण भारतातल्या विविध संस्थानांमध्ये लष्करी आणि प्रशासकीय सेवेत अतुलनीय कामगिरी करून विपुल अर्थार्जन करण्यात यशस्वी झाले. त्यापकी एक डी बिऑन ऊर्फ बेनॉ लेबार्न हा फ्रेंच तरुण होय.

हा फर विक्रेत्याचा मुलगा. प्रथम फ्रेंच सन्यात आणि पुढे रशियन सन्यात त्यांनी नोकरी केली. रशियन सन्यात असताना तुर्कानी त्यांना पकडून बंदिवासात ठेवले परंतु तिथून ते शिताफीने निसटून इजिप्त, सीरिया, टर्की, ग्रीसमध्ये भ्रमंती करीत करीत हिंदुस्थानात १७७८ मध्ये मद्रास बंदरात ते उतरले. मद्रास म्हणजे सध्याच्या चेन्नईत त्या काळात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे प्रमुख प्रशासकीय केंद्र म्हणजे प्रेसिडेन्सी कार्यालय होते. मद्रासमध्ये प्रथम डी बिऑनने तलवारबाजी शिकवण्याचे काम सुरू केले आणि मद्रासच्या तत्कालीन गव्हर्नरचा मुलगा थॉमस रॅमबोल्ड हे शिकायला त्यांच्याकडे येत असे. त्याच्या ओळखीने ईस्ट इंडिया कंपनीच्या बटालियनमध्ये २ वर्षे बिऑननी नोकरी करून ते कलकत्त्याला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्जला भेटले. हेस्टिंग्जने बिऑनना नोकरीचे काही ठोस आश्वासन न देता स्वतच्या शिफारसींचे पत्र अवधचा नवाब असफउद्दौला याच्या नावे लिहून ते बिऑनकडे दिले. बिऑन आतापर्यंत आपले मूळ नाव बेनॉ लेबार्न हेच लावत होते. आता त्यांनी ते बदलून अधिक प्रतिष्ठेचे डी बिऑन हे नाव घेतले. बिऑननी भागीदारीत व्यापार सुरू केला. नीळ, रेशीम, मोती, मसाल्यांचे पदार्थ यांच्या व्यापारात बिऑननी मोठी संपत्ती कमावली. तिथे लखनौतच त्याने नूर बेगम या दिल्लीच्या पíशयन तरुणीशी लग्न केले. त्यांना दोन मुलेही झाली.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com