कपडे काही काळ वापरल्यावर ते मळतात हा सार्वत्रिक अनुभव आहे. आपल्या शरीरावर बाहेरच्या बाजूला जे कपडे असतात, त्यावर सभोवतालच्या हवेतील धूलिकण कपडय़ावर चिकटून बसतात. इथे प्रत्यक्ष रासायनिक क्रिया होत नसली तरी हे कण पृष्ठाकर्षणामुळे चिकटलेले असतात. यापकी काही कण नुसते कपडा झटकल्यावर निघून जातात. पण सूक्ष्म कणाबाबत असे होत नाही. त्यांना घालविण्याकरिता अधिक प्रयत्न करावे लागतात. जास्तीची ऊर्जा वापरावी लागते. ते करताना द्रवरूप माध्यमाची जरुरी असते. बहुतांश वेळी पाणी हेच माध्यम वापरले जाते आणि त्याबरोबर निर्मलकाचा (डिर्टजट) वापर केला जातो. तेव्हा कपडय़ाला चिकटलेले सूक्ष्म कण वेगळे केले जाऊ शकतात आणि तेव्हाच कपडे स्वच्छ होतात. याचप्रमाणे जे कपडे पाणीविरहित स्वच्छता (ड्रायक्लिनिंग) पद्धतीने धुतले जातात. त्या वेळी वेगळ्या द्रावकाचा वापर करतात, तिथे अर्थातच पाणी वापरले जात नाही. खासकरून रेशमी कापडासाठी आणि लोकरीच्या कापडासाठी पाणीविरहित स्वच्छता पद्धतीचा अधिक वापर होतो.
धूलिकणाव्यतिरिक्त इतरही अनेक मार्गानी कपडा अस्वच्छ होतो किंवा त्यावर डागही पडतात. अशा वेळी घन आणि द्रव पदार्थ एकत्रितरीत्या कपडय़ावर सांडतो किंवा चिकटतो. खाण्याचे तेल, मसालायुक्त तेल, दूध, दही, अंडी, घाम, चिखल, गढूळ पाणी, फळाचा रस, शिजवलेल्या भाज्या, आमटी आणि इतर अन्नपदार्थ अशी बरीच मोठी यादी देता येईल. या प्रत्येक पदार्थाची रासायनिक जडणघडण वेगवेगळी असते म्हणून या प्रत्येक पदार्थाकरिता त्यानुसार वेगवेगळी निर्मलके वापरावी लागतात. एकाच निर्मलकाने सर्व काम भागत नाही. एकच निर्मलक वापरल्यास काही डाग नाहीसे होतील, काही फिके पडतील तर काही अजिबात हटणार नाहीत. हळदीचा डाग पांढऱ्या कपडय़ावर पडला तर तो काढणे तुलनेने सोपे आहे. त्याहीपेक्षा हा कपडा सुती किंवा सुती अधिक पॉलिस्टर मिश्र असेल तर जास्त सोपे होते. पण जर का हा कपडा रेशमी, लोकरी, रेशमी अधिक सुती मिश्र, लोकरी अधिक सुती मिश्र असा असेल तर तो डाग काढणे अवघड होऊन बसते. त्या त्या तंतूंच्या रासायनिक रचनेमुळे डाग काढण्याच्या प्रक्रियेला अटकाव होतो. सुती कपडय़ात सफेदपेक्षा रंगीत कपडय़ावरील डाग काढणे जिकिरीचे असते. यासाठी कपडे व्यवस्थित वापरणे, शक्यतोवर कसलाही डाग पडू न देणे हेच श्रेयस्कर!
विजय रोद्द  (मुंबई)  मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – निजामशाहीची वाटचाल
असफजाह प्रथम कमरुद्दीन याने हैदराबाद येथे स्थापन केलेले राज्य इ.स. १७२४ ते १९४८ असे २२४ वष्रे टिकले. सन १७४८ ते १७६२ हा काळ वगळता असफजाह कमरुद्दीनच्या घराण्यातील सात वंशजांनी या राज्यावर शासन केले. असफजाह प्रथमने ब्रिटिश आणि फ्रेंच या दोघांशी चांगले संबंध ठेवले. त्याची मराठय़ांशी मात्र अधूनमधून युद्धे होत राहिली. त्याच्या मृत्यूनंतर सत्ता मिळविण्यासाठी झालेल्या साटमारीत ब्रिटिश आणि फ्रेंचांनी वेगवेगळ्या वंशजांना पुढे करून परिस्थिती काही काळ अस्थिर ठेवली. नासिरजंग, मुजफ्फरजंग, सलाबतजंग यांची कारकीर्द सन १७४८ ते १७६२ अशी झाली. या काळात कृष्णा नदीच्या मुखापासून ते कन्याकुमारीपर्यंतचा मुलुख फ्रेंचांच्या ताब्यात होता.
सलाबतजंगाने पेशव्यांना चौथाई देणे बंद करून आगळीक सुरू केल्यामुळे १७६० मध्ये सदाशिवराव भाऊने त्याच्यावर स्वारी करून उदगीर येथे त्याला पराभूत केले. झालेल्या तहान्वये कृष्णा आणि तुंगभद्रा या दोन नद्यांमधील प्रदेश मराठय़ांनी ताब्यात घेतला. सन १७६२ ते १८०३ अशी कारकीर्द झालेला अलीखान असफजाह द्वितीय याने १७६३ मध्ये राज्याची राजधानी औरंगाबादहून हैदराबाद येथे हलविली. १७६१ च्या पानिपतच्या युद्धातील पराभवानंतर मराठय़ांचा दरारा कमी होऊन नागपूरकर भोसले, मिरजचे सरदार पटवर्धन, भवानरावासारखे अनेक सरदार निजामाला मिळाले. निजाम असफजाह द्वितीयने जय्यत तयारी करून मराठय़ांच्या प्रदेशात लुटालूट जाळपोळ सुरू केली. हे पाहून माधवराव पेशवे यांनी महादजी िशदेंच्या मदतीने हैदराबाद शहराची लूट सुरू केली. अखेरीस १७६३ साली राक्षस भुवन येथे पेशवे आणि निजामाच्या सन्यांमध्ये झालेल्या लढाईत निजामाचा पूर्ण पराभव होऊन त्याचा ८२ लक्षांचा मुलुख पेशव्यांनी घेतला. तरीही निजाम वठणीवर न आल्याने पुढे १७९५ साली नाना फडणवीसाने एक लक्ष फौज निजामावर पाठवून खर्डा येथे झालेल्या लढाईत निजामाने परत आपटी खाल्ली आणि मराठय़ांना तीन कोटी रुपये आणि काही मुलूख दिला.
सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com

how to make kala masala at home recipe
Recipe : आजीबाईंनी दिलेल्या प्रमाणाने घरच्याघरी बनवा ‘गोडा मसाला! लिहून घ्या हे प्रमाण
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
quarantine ship in mauritus
मॉरिशसमध्ये अख्खे जहाजच केले क्वारंटाईन; ३,००० हून अधिक लोक अडकले समुद्रात; नेमके प्रकरण काय?
What is tax harvesting and what to be careful about
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग काय असतं? ते करताना काय काळजी घ्यावी?