आपल्या सभोवतालचे जैविक व अजैविक घटक आणि त्यांच्यातील परस्परसंबंध म्हणजेच परिसंस्था होय. अनेक परिसंस्था आपल्याला आढळून येतात. उदाहरणार्थ :  वन परिसंस्था, पाणथळभूमी परिसंस्था, तृण परिसंस्था, समुद्र परिसंस्था, नदी परिसंस्था, पठार परिसंस्था इत्यादी. या सर्वाचे एक वेगळेच विश्व असते. विभिन्न गुणधर्म असतात. या प्रत्येक परिसंस्थेच्या गुणांशी जुळवून घेऊन आनंदाने सजीव येथे नांदत असतात.

अनेक प्रजातींच्या शारीरिक रचनेत परिसंस्थेनुसार बदल झालेले असतात. उदाहरणार्थ हिमबिबटय़ाच्या किंवा हिमालयीन अस्वलाच्या शरीरावरील केस हे अतिशय जाड असतात, जेणेकरून त्यांचे अतिथंडीपासून संरक्षण व्हावे. खारफुटी वनस्पतीची मुळे ही जमिनीत जाऊन पुन्हा वर आलेली असतात, जेणेकरून त्यांना श्वसन करता यावे. अशी अनेक उदाहरणे आपल्या सभोवताली आहेत. जशी परिसंस्था प्राणी वनस्पतींच्या जीवनात महत्त्वाचे स्थान बजावते तशीच ती मनुष्यप्राण्यासाठीसुद्धा अतिशय उपयुक्त आहे.

Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
curiosity about indians performance in paris olympic
अन्वयार्थ : असले ‘अव्वल स्थान’ काय कामाचे?
In redevelopment of flat holders Redevelopment Senior
पुनर्विकासातील ज्येष्ठ!
village maps
गाव नकाशे नसल्याने मच्छीमारांचे अस्तित्व धोक्यात, पंचवीस वर्षांपासून प्रतीक्षा

प्रत्येक परिसंस्था आपल्याला काही सुविधा/सेवा पुरवत असते. यालाच इंग्रजीत ‘इकोसिस्टिम सव्‍‌र्हिसेस’ असे संबोधले जाते. आपल्याला रोजचे लागणारे अन्न, वस्त्र, निवारा या व इतर मूलभूत गरजा परिसंस्थाच पुरवते. एखाद्या परिसंस्थेचा विनाश झाल्यावर जेव्हा त्यांचे वाईट परिणाम निदर्शनास येतात त्या वेळी आपल्याला तिचे महत्त्व जाणवते. आज विकासाच्या नावाखाली अनेक ठिकाणी झाडांची कत्तल होत आहे. याचे गंभीर परिणाम लवकरच आपल्याला भोगावे लागणार आहेत. परिणाम दिसायला आता सुरुवात झाली आहे असे म्हणणेसुद्धा वावगे ठरणार नाही. वर नमूद केल्याप्रमाणे आपल्याला जगण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी अनेक परिसंस्थांतून उपलब्ध होत असतात.

परिसंस्था ही वनस्पती, प्राणी, कीटक यांच्या संवर्धनात खूप मोठी भूमिका बजावते. जर परिसंस्था अबाधित राहिली तरच तेथील जीविधता टिकून राहील. त्यामुळे त्यांचे अस्तित्व टिकवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आपल्या घराजवळील एखादे झाड तोडताना कोणी आढळले तर त्यांच्याकडे लेखी परवानगी आहे की नाही हे तपासून पाहणे अतिशय आवश्यक आहे. आपली थोडीशी जागरूकता आपल्या पर्यावरणाची मोठी हानी रोखू शकते.

– सुरभी वालावलकर मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org