अँग्लो इंडियन समाजातील अनेक व्यक्तींनी साहित्य, कला, क्रीडा, संरक्षण वगैरे क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाने विशिष्ट उंची गाठली. त्यापैकी एक आहेत रॉजर बिन्नी हे प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू. रॉजर मायकेल हंफ्रे बिन्नी यांचा जन्म १९५५ सालातला, बंगलोरचा. त्यांचे शिक्षण बंगलोरच्या फ्रँक अँथनी पब्लिक स्कूलमध्ये झाले. शाळेत असताना रॉजर भालाफेक, फुटबॉल, हॉकी वगरेंचे एक अव्वल खेळाडू म्हणून ओळखले जात. पुढे क्रिकेटचे आकर्षण वाढून, वयाच्या विसाव्या वर्षी केरळविरुद्ध प्रथम श्रेणी सामना खेळून त्यांनी क्रिकेटमध्ये प्रवेश केला.

Devendra Fadnavis, Ajit Pawar & Eknath Shinde Astrology
शिंदे, पवार, फडणवीसांना ‘या’ अंकाचा धागा ठेवतो जोडून; २०२४ मध्ये मात्र येईल ‘हा’ अडथळा, ज्योतिषी काय सांगतात?
The Vietnam War Guided Missiles chip cold wars
संविधानभान: सकारात्मक भेदभाव म्हणजे काय?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
election material making work increase due to parties splits
पक्षफुटींमुळे प्रचार साहित्याला ‘अच्छे दिन’; झेंडे, टोप्या, फेटे निर्मितीस सुरुवात, चिन्हे जास्त असल्याने कामात वाढ

पुढच्याच वर्षी रणजी ट्रॉफीत कर्नाटक संघातून खेळताना त्यांनी महाराष्ट्र विरुद्ध सलामीची फलंदाजी करीत ७१ धावा काढल्या आणि गोलंदाजी करीत ४ विकेट घेतल्या. १९७७-७८ च्या पुढच्या मोसमात रणजी ट्रॉफीत रॉजरने लक्षणीय ५६३ धावा काढल्यावर क्रिकेट समीक्षकांचे ते आवडते खेळाडू झाले. १९७९ साली बंगलोरमध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात रॉजरचा आंतरदेशीय प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये प्रवेश झाला. भारतीय क्रिकेट संघातून खेळणारे रॉजर बिन्नी हे पहिले अँग्लो इंडियन. कर्नाटक संघातून ७१ प्रथम श्रेणी सामने खेळणाऱ्या रॉजरनी १२ शतके आणि २१ अर्धशतके ठोकून एकंदर ४३९४ धावा चोपल्या तसेच ११२ विकेट घेतल्या. त्यांनी खेळलेल्या २७ कसोटी सामन्यांत ३२.६३ च्या सरासरीने ४७ विकेट्स घेतल्या आणि ८३० धावा काढल्या. ७२ एकदिवसीय आंतरदेशीय सामन्यांमधून खेळताना रॉजरनी ७७ विकेट्स घेतल्या आणि ६२९ धावा काढल्या. एक उत्तम क्षेत्ररक्षक म्हणूनही त्यांची प्रसिद्धी आहे.

१९८३ च्या विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघात कप्तान कपिलदेव; शिवाय मदनलाल, मोिहदर अमरनाथ असे चतुरस्र खेळाडू होते. या संपूर्ण मालिकेत रॉजरने सर्वाधिक १८ विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात रॉजरनी २९ धावांच्या मोबदल्यात चार विकेट घेतल्या. प्रथम श्रेणी सामन्यांतून निवृत्ती घेतल्यानंतर १९ वर्षांखालील संघाचे ते प्रशिक्षक होते. क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) पाच सदस्यीय निवड समितीवर बिन्नींची २०१२ साली नियुक्ती झाली.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com