22 October 2019

News Flash

प्रशियाची राजधानी बर्लिन

१७०१ साली बर्लिन आणि आसपासच्या, उत्तरेतील काही प्रदेशावर प्रशियाचे राज्य स्थापन होऊन फ्रेडरिक प्रथम हा प्रशियाचा पहिला राजा झाला.

१७०१ साली बर्लिन आणि आसपासच्या, उत्तरेतील काही प्रदेशावर प्रशियाचे राज्य स्थापन होऊन फ्रेडरिक प्रथम हा प्रशियाचा पहिला राजा झाला. त्याने बíलनसह इतर पाच मोठय़ा गावांचे एकीकरण करून त्याचे विशाल बर्लिनमध्ये रूपांतर केले.
एकीकरणानंतर बर्लिनची लोकसंख्या ५५ हजार झाली. शहरातील व्यापारात वाढ होऊन जर्मनीतील इतर राज्यांमधील लोकांचे बर्लिनमध्ये स्थलांतर वाढले, १८३७ साली लोकसंख्या ८० हजार झाली. संरक्षणासाठी राजवटीने शहराभोवती पंधरा किलोमीटर लांबीची तटबंदी ‘कटम्स वॉल’ बांधली. साधारणत १७३० ते १८०० या सत्तर वर्षांच्या काळात बíलनमध्ये अनेक भव्य वास्तू उभ्या राहिल्या, नाटय़गृहे बांधली जाऊन, जर्मन आणि फ्रेंच नाटकांचे प्रयोग होऊ लागले. याच काळात प्रसिद्ध ‘ब्रांडेनबर्ग गेट’ बांधले गेले. १८०० साली बर्लिनची लोकसंख्या एक लाख सत्तर हजार झाली.
प्रशियन राजे फ्रेडरिक प्रथम आणि फ्रेडरिक द ग्रेट उर्फ फ्रेडरिक द्वितीय यांनी राज्याचे लष्करी सामथ्र्य वाढविण्याच्या अनेक योजना आखल्या. फ्रान्स आणि स्वित्र्झलड मधील धार्मिक छळग्रस्त प्रोटेस्टंट पंथीय लोकांना प्रशियात आश्रय देणे आणि प्रशियन सन्यात भरती करणे हा त्या योजनेचा भाग होता.
१८०६ साली फ्रेंच सम्राट नेपोलियन आणि त्याच्या फौजांनी बíलनवर आक्रमण करून प्रसिद्ध ब्रांडेनबर्ग गेटमधून बíलन शहरात प्रवेश केला. फ्रेंच सन्य १८०८ पर्यंत बर्लिनमध्ये तळ देऊन बसले होते.
१८१० साली बर्लिन युनिव्हर्सटिीची स्थापना झाली. प्रशियन राज्यकाळात राज्यकर्त्यांनी उद्योजक, व्यापारी आणि व्यावसायिकांना प्रोत्साहन दिले आणि त्यामुळे वस्त्रोद्योग, रसायन उद्योग, शेतीची यंत्रे यांच्या उत्पादनात वाढ झाली. त्यातच १८५० नंतर जर्मन रेल्वेसेवेत वाढ होऊन कच्चा माल आणि पक्क्या मालाची वाहतूक वाढली, बाजारपेठा वाढल्या.

– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

 
डॉ. श्यामला चितळे
डॉ. श्यामला चितळे या अश्मयुग वनस्पतिशास्त्र या विषयातील तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. नागपूरच्या विज्ञान संस्थेत त्यांनी या विषयाचे एक उत्कृष्ट संशोधन केंद्र स्थापन केले. अश्मयुगीन वनस्पतीच्या अवशेषाचे अनेक नमुने तेथल्या संग्रहालयात साठवले. क्रेटेशियम काळातील म्हणजेच १३५ दशलक्षपूर्वीच्या काळातील वनस्पतींच्या तज्ज्ञ म्हणून डॉ. चितळे ओळखल्या जातात. मुंबईच्या विज्ञान संस्थेत काम करतानाही त्यांनी अश्मयुगातील वेगवेगळ्या काळांतील वने दर्शवणाऱ्या रेखाचित्रांचा संग्रह तयार करून या विषयाची माहिती सर्वसामान्य माणसालाही सहज समजेल अशा पद्धतीने मांडली. वनस्पतींचा मूळ रंग टिकवून त्याचे नमुने जतन करण्याची पद्धत त्यांनी विकसित केली.
१९७८ मध्ये निवृत्त झाल्यावर त्या अमेरिकेत गेल्या. १९८० मध्ये क्लेव्हलँड (ओहायो) येथील नसíगक साधनसंपत्ती विभागात त्यांनी संशोधन सुरू केले. डेव्होनियन काळातील (४१७ ते ३५४ दशलक्ष वर्षांपूर्वीचा काळ) वनस्पतींचे अवशेष शोधून काढून त्यांचा संग्रह करणे सुरू केले.
डॉ. चितळे यांना लखनौच्या ‘सावित्री बिरबल सहानी फाऊंडेशनने’ अश्मयुग वनस्पतिशास्त्रातील संशोधनाबद्दल पदक दिले तर पुण्याच्या आधारकर संशोधन संस्थेने त्यांच्या आयुष्यभराच्या कार्याबद्दल गौरव केला. क्लेव्हलँडमध्ये शेलमधील (एक प्रकारच्या ठिसूळ कोळसा) वनस्पतींवर संशोधन केलेल्या संशोधनाबद्दल आणि वनस्पती अवशेषांच्या नमुन्यांचे संग्रहालय स्थापन केल्याबद्दल त्यांना ओहायो संस्थानाने काíडनल अ‍ॅवॉर्ड देऊन २०११ मध्ये सन्मान केला.
ठिसूळ कोळशांतील वनस्पती अवशेषांचे नमुने जतन करण्याची नवीन पद्धत त्यांनी शोधून प्रमाणित केल्याने असे अवशेष संग्रहालयात सुरक्षितपणे साठवण्यास मदत झाली.
क्रेडेशियम काळातील वनस्पती अवशेषांना इन्डोव्हायटिस चितळीई ‘चितळेकारपॉन’, ‘चितळेपुष्प’ अशी नावे दिली गेली आहेत. तर डेव्होनियम काळातील एका मॉसच्या नमुन्याचे डॉ. चितळे यांनी क्लेव्हलँडोडेंड्रोन ओहायोएस्निस असे नामकरण केले. सुमारे ६७ वर्षांच्या भारत आणि अमेरिका येथील अथक संशोधन कार्यात मग्न राहणाऱ्या डॉ. चितळे सन २०११ मध्ये निवृत्त झाल्या. तरीही २०१२ मध्येही त्या नियमितपणे त्यांनी उभारलेल्या संग्रहालयात जात असत. सन २०१३ च्या मार्चमध्ये वयाच्या ९४ व्या वर्षी त्याचे अमेरिकेत मुलाच्या घरी निधन झाले.
त्या मराठी विज्ञान परिषदेच्या सक्रिय सदस्य होत्या. परिषदेतर्फे त्यांनी अनेक भाषणे दिली होती.
– प्रा. शरद चाफेकर

मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

First Published on March 18, 2016 3:54 am

Web Title: information about berlin city