‘माझ्या झाडाला कीड लागली आहे’ हे वाक्य आपण सर्रास ऐकतो. ही कीड बहुधा कीटकाची असते. त्यामुळे कीटक हे फक्त उपद्रवीच असतात असा समज होतो. पण काही कीटक हे शेतीसाठी उपयुक्तच नव्हे तर आवश्यकही असतात. आपण जी धान्ये, फळे, भाज्या आपल्या आहारात वापरतो, ती तयार होण्यासाठी त्या त्या वनस्पतीची फलधारणा होणे आवश्यक असते. फळधारणेसाठी परागीभवन ही एक अत्यंत आवश्यक क्रिया आहे. परागीभवन म्हणजे परागकणांचे फळधारणेसाठी होणारे स्थलांतर. फळ हे मुख्यत: लंगिक उत्पादन आहे. त्यासाठी एका फुलाचे पराग म्हणजे नर, परागवाहकाच्या मदतीने दुसऱ्या झाडावरच्या फुलाच्या बीजांड म्हणजे मादीपर्यंत पोहोचून त्यांचा संयोग व्हावा लागतो. फूल आणि परागवाहक यातील परागीभवनाचा पहिला संदर्भ अठराव्या शतकात ख्रिश्चन कोनरॅड िस्प्रगल या शास्त्रज्ञाने दाखवून दिला.
वनस्पती जगतातील फक्त १० टक्केवनस्पतींत फलधारणा ही स्वत:च्याच परागांनी होते उदा. पीच. आणखी १० टक्के वनस्पतींत परागीभवन हे कुठल्याही प्राण्याच्या मदतीशिवाय होतं. यात मुख्य सहभाग असतो तो वाऱ्याचा. उदा. वेगवेगळी गवते (त्यात धान्येही आलीच), सूचिपर्णी वनस्पती व काही पानगळ होणाऱ्या वनस्पती. दुसरा प्रकार पाणवनस्पतींचा. यांचे परागकण पाण्यात पडून प्रवाहाबरोबर वाहात जातात व दुसऱ्या फुलांचे परागसिंचन करतात. या दोन्ही प्रकारांत बरेचसे परागकण फुकट जातात. त्यामुळे या वनस्पतींत मोठय़ा प्रमाणावर परागनिर्मिती होते.
उरलेल्या ८० टक्के वनस्पतींत परागीभवनाची क्रिया ही प्राण्यांमार्फत होते. शास्त्रज्ञांनी या क्रियेत सहभागी असलेल्या दोन लाखांपेक्षा जास्त प्राण्यांची मोजदाद केली आहे. त्यात कीटकांची संख्या सर्वात जास्त आहे. सुंदर रंगीत फुलं, सुगंध वा ज्यात मकरंद असतो अशा वनस्पती परागीभवनासाठी वेगवेगळ्या मधमाश्या, इतर माश्या, भुंगे, ढालपंखी, फुलपाखरे, पतंग इत्यादी कीटक यांना आकर्षति करतात. वटवाघळे व पतंगांमार्फत परागीभवन होणाऱ्या वनस्पतींची फुलं प्रामुख्यानं पांढरी, रात्री फुलणारी व विशिष्ट गंधाची असतात. पक्ष्यांकडून परागीभवन होणाऱ्या वनस्पतींची फुलं लाल पाकळ्यांची आणि क्वचितच गंधांची असतात. कारण काही मोजक्याच पक्ष्यांना अन्नाच्या शोधासाठी गंधाचे ज्ञान असते.
डॉ. विद्याधर ओगले मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org    

आजचे महाराष्ट्रसारस्वत   : १७ एप्रिल    
१८९१ > कोशकार यशवंत रामकृष्ण दाते यांचा जन्म. केतकरांच्या ज्ञानकोशाचे काम सांभाळून ‘विद्यासेवक’ मासिकाचे संपादन त्यांनी केले. पुढे चिं. ग. वैद्य यांच्या सहकार्याने ‘महाराष्ट्र शब्दकोश’, ‘सुलभ विश्वकोश’, ‘महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश’, आणि ‘शास्त्रीय परिभाषा कोश’ त्यांनी परिश्रमपूर्वक तयार केले होते.
१९०३ > निसर्गकविता आणि शृंगारिक प्रेमकविताही लिहिणारे कवी, नाटककार, शंकर बळवंत चव्हाण यांचा जन्म. किशोरी, भावलहरी, मधुमालती हे काव्यसंग्रह त्यांच्या हयातीत प्रकाशित झाले. ‘कुणाचं कोण?’, ‘इष्काची नशा’ आदी दहा सामाजिक- ऐतिहासिक नाटके त्यांच्या नावावर आहेत.
१९०४ > कवी, कीर्तनगर वासुदेव शिवराम कोल्हटकर यांचा जन्म. कीर्तनाच्या निमित्ताने कोल्हटकरबुवांनी भरपूर काव्यलेखन केले. अंदाजे ३५ हजार पदे त्यांनी लिहिली.‘सुलभ कीर्तन संग्रह’, ‘कीर्तनमंदाकिनी’, ‘अभंग भागवत’ ‘योगवासिष्ठामृत’ हे या पदांचे ग्रंथ असून ‘अभंग भारत’ लिहिणारे कोल्हटकर ‘राष्ट्रीय कीर्तनकार’ म्हणून ख्यातकीर्त होते.
१९१९ > बखरींचा मोठा संग्रह करून त्यांतून निवडक ‘जुन्या ऐतिहासिक गोष्टी’ हे पुस्तक लिहिणारे आचार्य कृष्णाजी विष्णू कालगावकर यांचे निधन.
संजय वझरेकर

Clean Intestine In 20 Minutes In Morning With These Simple Five Asanas How Much Luke Warm Water To Drink First After Waking Up
Video: सकाळी उठताच १५ मिनिटांत पोट स्वच्छ होण्यासाठी करा ‘या’ पाच कृती; कोमट पाणी पिण्याचं प्रमाणही पाहा
Would you like to try egg roti or chapati for breakfast Note The Easy Recipe and try ones at home
नाश्त्यासाठी झटपट काय बनवायचं असा प्रश्न पडतोय? फक्त चार पोळ्या अन् अंडी वापरून बनवा ‘ही’ सोपी रेसिपी
People with diabetes Can Eat roasted or baked snacks Is this safe for blood sugar patients Need To Know What To Eat
मधुमेही रुग्णांनी ‘या’ पदार्थाचे सेवन केल्यास नियंत्रित राहील रक्तातील साखर; वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
side effects of vitamin B3
‘व्हिटॅमिन बी ३’चे अतिसेवन ठरू शकते हृदयविकाराचे कारण; जाणून घ्या शरीरासाठी योग्य मात्रा

वॉर अँड पीस : आर्तवविकार : गर्भाशयाची अपुरी वाढ
दिवसेंदिवस स्त्री-पुरुषांमधील अनपत्यता, संतती न होणे अशा तक्रारींचे रुग्ण वाढत्या संख्येने आहेत. त्याला अनेक कारणे असतात. त्या कारणांपैकी गर्भाशयाची अपुरी वाढ, गर्भाशयाचा आकार कमी असणे यांचा विचार या लेखात आपण करत आहोत. काही भगिनींना दिवस राहतात, गर्भधारणा होते पण गर्भ टिकत नाही. अशा तक्रारी घेऊन खूप रुग्ण, वैद्य, डॉक्टर वा गायनाकॉलॉजिस्ट यांचेकडे जात असतात. आयुर्वेद शास्त्रात सूचिमुखयोनी असे वर्णन जुन्या ग्रंथात आढळते. दिवस राहिल्यानंतर गर्भाबरोबर गर्भाशयाचीही नैसर्गिक वाढ व्हायला लागते. गर्भाशय छोटा असल्यास गर्भस्राव महिना दोन महिन्यात होतो व त्यामुळे त्या महिलेला व कुटुंबाला नैराश्य येते.
असे एकदा घडल्यावर पुढीलप्रकारे उपचार करण्याअगोदर गर्भाशयाची सोनोग्राफी तज्ज्ञ स्त्रीवैद्यांकडून करून घ्यावी. किमान तीन महिने स्त्री-पुरुष व्यवहार करू नये. संयम पाळावा. गर्भाशयाच्या योग्य वाढीकरिता शतावरी व आस्कंद प्र. १५ ग्रॅम व ज्येष्ठमध ५ ग्रॅम असा चार कप पाण्यात उकळलेला काढा सकाळी व सायंकाळी २ कप पाण्यात त्याच वनस्पती उकळून केलेला अर्धा कप नि काढा न कंटाळता घ्यावा. पांडुता असल्यास चंद्रप्रभा, सुवर्ण माक्षिकादि वटी व शंृग भस्म प्र. ३ गोळ्या दोन वेळा व पुष्टीवटी एक गोळी त्यासोबत घ्यावी. अजीर्ण, अपचन, आम्लपित्त अशा तक्रारी असल्यास आम्लपित्तवटी ३ गोळ्या व पिप्पलादी काढा चार चमचे समभाग पाण्याबरोबर जेवणानंतर घ्यावा. अशा महिलेचे वजन कमी असल्यास अश्वगंधारिष्ट दोन्ही जेवणानंतर व रात्रौ आस्कंद चूर्ण एक चमचा यांची योजना तारतम्याने करावी. काही वेळेस रोज शतावरी, आस्कंद व ज्येष्ठमधाचा काढा घ्यायचा कंटाळा येतो, तर त्याऐवजी ‘चेंज’ म्हणून शतावरी धृत, अश्वगंधा धृत किंवा शतावरी चूर्णाच्या लापशीची योजना करावी.
अरुचि, मळमळ, ‘नॉशिया’ असल्यास सुंठचूर्ण पाण्यात मिसळून दोन्ही जेवणानंतर घ्यावे.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी..  : कमिशन/दलाली
डॉक्टर मंडळी कमिशन देतात ही गोष्ट आता जाहीर आहे. ही हेराफेरी नवीन नाही. १९६७ साली मी व्यवसाय सुरू केला तेव्हा ही लागण लागलेली होती आणि सुरुवात माझ्या त्या काळातल्या एका तथाकथित गुरुवर्यानी (!) केली. एकदा संभाषणाच्या ओघात मला ते म्हणाले, ‘मी देत राहिलो कधीही घेतले नाहीत.’ नैतिकतेचा असला सूक्ष्मविचार हुशार माणसेच करू जाणे. हे पुढे एका मातबर राजकीय पक्षाचे खजिनदार झाले!
माझी एक उत्तम सहकारी आहे ती मला म्हणाली, इतकी वर्षे शिकले त्यानंतर पाच वर्षे माशा मारत बसणे माझ्या जिवावर आले. मला पैसे नको होते काम हवे होते. तेव्हा ज्या रुग्णालयात मला बोलावले जाते त्याचा मालक रुग्ण आणणाऱ्या व्यक्तीशी काय व्यवहार करतो याकडे मी दुर्लक्ष करते, फारच लुबाडायला लागला तर इशारा देते. तेवढय़ावर काम भागते. मी व्यवसाय सुरू केला तेव्हा माझे वडील मला म्हणाले होते, ‘रविन जमाना बदलला आहे. तू असे काही केलेस तर मला वाईट वाटणार नाही.’ मी त्यांना म्हटले होते, ‘आता फार उशीर झाला. ही शिकवण लहानपणीच दिली असती तर जमले असते,’ मधाचे बोट न लावण्याचे बाळकडू इतके पाजले गेले होते की, मी असाहाय्य होतो. खरे तर सुरुवातीला मी या बाबतीत गर्विष्ठही होतो, चार माणसे भेटली, कुठे पार्टी झाली तर या विषयावर मी तावातावाने बोलत असे. एक दिवस माझी बायको म्हणाली, ‘तुझी तत्त्वे तू तुझ्याकडे ठेव. त्याचा बभ्रा करतोस तेव्हा लोक बिचकतात.’
आमच्या लग्नात ही मधूनमधून श्रीकृष्णाचा अवतार धारण करतेोचे हे उदाहरण. आयुष्यात एकदाच मी या मोहाला बळी पडणार होतो. एक डॉक्टर मी अंधेरीला प्रॅक्टीस करत असताना एका महिन्यात शस्त्रक्रियेसाठीचे चार रुग्ण घेऊन आला. माझ्यापुढे कॉलेजमध्ये होता आणि होता दाढीवाला गुजराथी बोलणारा मुसलमान. माझे आडनाव बघता आणि नुकतीच झालेली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ या पाश्र्वभूमीवर खरे तर आमचे विळ्या-भोपळ्याचे नाते असायला हवे, पण हा येत राहिला आणि मला राहवले नाही. हा माझ्या समाजातला नाही, तेव्हा बातमी फुटणार नाही असा, धूर्त विचार करत मी त्याला किती पैसे देऊ, असे विचारले तेव्हा तो दाढी हलवत सद्गदित झाला. मला म्हणाला, ‘तू सरळ सज्जन आहेस म्हणून तुझ्याकडे आलो तर तूही तसलाच निघालास.’  मग उठून गेला. मी शरमिंदा झालो. मग कोरडाच राहिलो. या लेखात माझ्या बायकोचा उल्लेख आहे तिच्या विषयी पुढच्या लेखात.
रविन मायदेव थत्ते –  rlthatte@gmail.com