‘इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिटय़ूट फॉर सेमी एरिड ट्रॉपिक्स’ (इंग्रजी आद्याक्षरांनुसार लघुरूप :icrisat ) ही कोरडवाहू शेतीसंबंधी काम करणारी एक जागतिक स्तरावरील संस्था आहे. फोर्ड आणि रोकफेलर फाउंडेशन या संस्थांच्या मदतीने १९७२ साली ही मध्यवर्ती संस्था हैदराबादजवळ पातनचेरू येथे स्थापन झाली. संस्थेचे उपविभाग अन्य देशांतही आहेत. संस्थेच्या कामाचे स्वरूप बघून तिला भारतातर्फे युनोचा दर्जा व त्या अनुषंगाने काही विशेषाधिकार व करांतून सूट दिली आहे. जगातील विख्यात शास्त्रज्ञांच्या मदतीने इक्रिसॅटचे महासंचालक (सध्या डॉ. विल्यम दर) व अध्यक्ष नायजेल पूल हे संस्थेचा कारभार चालवितात.
भारतच नव्हे तर जागतिक स्तरावरही पिकाऊ शेतजमिनीपकी सर्वात मोठा हिस्सा हा कोरडवाहू शेतीचा आहे. कोरडवाहू प्रदेश म्हणजे जेथे पर्जन्यमान ७०० मि.मी. पेक्षा कमी असते व तेथे शेतीसाठी ओलिताप्रमाणे पाण्याचा अन्य पुरवठा नसतो. त्यामुळे अशा हवामानात उपयोगी पडतील अशा धान्यांच्या जातींवरील संशोधन हे प्रामुख्याने आनुवंशिकी व नसíगक स्रोतांचे व्यवस्थापन यांच्याशी निगडित असते. अशा प्रकारे धान्योत्पादन वाढून दुष्काळी प्रदेशातील जनतेला अधिक अन्न मिळावं व त्यायोगे तेथील जनतेच्या सामाजिक परिस्थितीत सुधारणा व्हावी हा हेतू आहे.
गेल्या १० वर्षांत ‘इक्रिसॅट’मधील संशोधनाने जैवतंत्रज्ञान, निवड पद्धती व संकर यांच्या सहाय्याने भारत, चीन, फिलिपिन्स व व्हिएतनाम या देशांसाठी अधिक उत्पादन देणाऱ्या ज्वारी, बाजरी, मका, हरभरा, तूर, इ.च्या जाती विकसित केल्या आहेत. या कामासाठी लागणारे त्या त्या पिकाचे जननद्रव्य तसेच काही इतर पिकांचे उदा. नाचणी, कांग, भात, इ.ची सुमारे १,१९,७०० जननद्रव्ये १४४ देशांतून जमा केली आहेत. सुदैवाची गोष्ट म्हणजे यातील काही वाण त्यांच्या आफ्रिका व आशिया खंडातील मूळ प्रदेशातून जरी लोप पावले असले तरी या जीनपेढीत आजही सुरक्षित आहेत. संस्थेने विकसित केलेल्या पिकांपकी हरभऱ्याच्या काही जाती गुजराथच्या दुर्गम भागांत फायदेशीररीत्या वापरून तेथील सामाजिक परिस्थितीत जाणवण्याइतका फरक पडला आहे. तसेच मध्य भारतासाठी विकसित केलेल्या भुईमूग व २००६ साली वितरित केलेल्या बाजरी व तुरीच्या जाती यांचाही उल्लेख करावा लागेल.

    
    – डॉ. विद्याधर ओगले    मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती
idea of ​​educational institutes
बीबीए, बीसीएबाबत शिक्षण संस्थांची नवी शक्कल… होणार काय?
Air India Air Transport Services jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती! ‘या’ पदांवर होणार भरती
This pictorial story of Lalbagh Botanic Garden during both Bangalore and Bangalore eras
निर्जळगावातलं निसर्गबेट

आजचे महाराष्ट्रसारस्वत        ७ मे
१८८२ > ‘औषधी गुणधर्म शास्त्र’ हा चार खंडांचा वैद्यक-ग्रंथ लिहिणारे आद्य मराठी वैद्यलेखक गंगाधरशास्त्री गोपाळ गुणे यांचा जन्म. त्या काळात त्यांनी डेंग्यू, फ्लू आदी रोगांवर पुस्तके लिहिली. ‘भिषग्विलास’ या औषधशास्त्राला वाहिलेल्या मासिकाचे ते संस्थापक-संपादक होते. शरीररचना, इंद्रियांचे धर्म, रोग व त्यांचे निदान, औषधे यांवर अनेक लेख त्यांनी लिहिले.
१९४५ > ‘आयदान’ या आत्मचरित्रासह ‘सहावं बोट’, ‘चौथी भिंत’ आणि ‘हातचा एक’ (कथासंग्रह), मॉरिशसचे प्रवासवर्णन अशा ललित वाङ्मयाखेरीज दलितांचा इतिहास व सद्यस्थितीचा अभ्यास तसेच बौद्ध धम्मग्रंथांचा मराठी अनुवाद अशा प्रकारचे ग्रंथलेखनही करणाऱ्या ऊर्मिला पवार यांचा जन्म.  विद्रोही साहित्य संमेलनाच्या (२०१३) अध्यक्ष, ही त्यांची ताजी ओळख.
२००२ > बौद्ध वाङ्मय आणि जातककथा, लोकसाहित्य आणि प्राचीन भारतीय ग्रंथांमधील लोकजीवन या विषयांतील विदुषी आणि विचारस्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्यां दुर्गा नारायण भागवत यांचे निधन. ‘पैस’ (साहित्य अकादमी पुरस्कार), ‘ऋतुचक्र’, ‘व्यासपर्व’, ‘लोकसाहित्याची रूपरेषा’, ‘धर्म आणि लोकसाहित्य’, ‘सिद्धार्थजातका’चे सात खंड ही त्यांच्या ग्रंथसंपदेतील काही नावे.
संजय वझरेकर

वॉर अँड पीस                    ब्लडप्रेशर कमी होणे : आयुर्वेदीय उपचार
ज्यांना दीर्घकाळ रक्तदाब कमी होणे ही समस्या आहे, त्यांना मी पुढील श्लोक सांगून दैनंदिन जीवन औषधांशिवाय कसे सुखावह करावे हे ठासून सांगत असतो : ‘अचिंतया हर्षणेन ध्रुवं संतर्पणेनच ।
स्वप्नप्रसंगाच्च कृशो वराह इव पुष्यति ।’ या विकारात वेळेवर खाऊन पिऊन; वेळेवर पुरेशी झोप घेतली; आनंदी राहिले; उगाच मगजमारी करून घेतली नाही तर सहसा औषधांचे प्रमाण कमी पुरते. काही काळाने औषधांची गरज संपते. कृश व्यक्तींच्या रक्तदाबक्षय विकारांकरिता आर्थिक स्थितीप्रमाणे भरपूर फळे, सुकामेवा घ्या म्हणून सांगायला डॉक्टर वैद्यांची गरज नाही. स्थूल व्यक्तीच्या रक्तदाबक्षय विकारात मात्र वजन वाढू नये अशी काळजी; आहार योजना करतांना घ्यावी लागते. अशा व्यक्तींनी पुढीलप्रमाणे कमी उष्मांकाचा आहार निवडावा. ज्वारी, बाजरी, मूग, राजमा; रताळे, बटाटा सोडून कमी तेल-तुपाच्या भरपूर भाज्या; डाळींब, सफरचंद, पांढरे खरबूज, अंजीर, ताडगोळे, पोपई अशी फळे, बिया असणाऱ्या काळ्या मनुका; पुदीना, आले अशी चटणी इ. इ.
सामान्यपणे चंद्रकला रस, लाक्षादि गुग्गुळ, गोक्षुरादि गुग्गुळ, लघुसूतशेखर व सुवर्णमाक्षिकादि वटी प्रत्येकी ३ गोळ्या २ वेळेस रिकाम्या पोटी बारीक करून घेतल्यामुळे मानेच्या मणक्यातील दोषामुळे झालेल्या रक्तदाबक्षयात फायदा होतो. पित्त पडल्यामुळे रक्तदाबक्षयाचा त्रास होत असल्यास चंद्रकलारस, कामदुधा व प्रवाळ प्र. ३ गोळ्या, २ वेळा रिकाम्या पोटी घ्याव्यात. सोबत कुष्मांडपाक ३-३ चमचे दोन वेळा घ्यावा. झोप येत नसल्यास निद्राकर वटी सहा गोळ्या हे जादा औषध घ्यावे. पांडुता हे प्रधान लक्षण रक्तदाबक्षय विकारात असतांना चंद्रकला, चंद्रप्रभा, सुवर्णमाक्षिकादि वटी प्र. ३ गोळ्या, २ वेळा रिकाम्या पोटी घ्याव्यात. वजन कमी झालेले असल्यास च्यवनप्राश, अश्वगंधापाक, शतावरी कल्प अशा बल्य औषधांची तारतम्याने योजना करावी. रक्तदाबक्षयावरचे हुकमी व तत्काळ गुण देणारे औषध म्हणजे मौक्तिक भस्म. तारतम्याने दोन शेंगादाण्याएवढे दोन वेळा घ्यावे.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी..      डिट्रॉइट
एका संध्याकाळी- तेही ७१ सालच्या डिसेंबर महिन्याच्या कडाक्याच्या थंडीत,  स्ट्रेथ हॉस्पिटलचा पत्ता शोधत मी डिट्रॉइट शहर पालथे घातले आणि शेवटी त्या रुग्णालयाच्या लॉबीमध्ये पोहोचलो. सर्वत्र शुकशुकाट होता. २० खाटांचे हे खासगी रुग्णालय होते. सकाळच्या शस्त्रक्रिया संपवून सगळे घरी गेले होते. तेवढय़ात एक सव्वासहा फूट उंच काळा दरवान आला आणि त्याने मला आश्चर्याचा धक्काच दिला. म्हणाला, ‘एक नवा डॉक्टर येणार होता तो तूच असणार, चल मी तुला तुझे घर दाखवतो’.
घर दुमजली सहा खोल्यांचे. मला म्हणाला सकाळी सातला काम चालू होईल तेव्हा तुला तिथल्या डॉ. हिप्स यांना भेटावे लागेल. मग तुला घ्यायचे की नाही हे ठरेल. मी पहिली गोष्ट केली ती बायकोला फोन केला. नव्या घराचे वर्णन केले आणि उद्या नोकरी मिळाली तर लगोलग तू नीघ असे फर्मानच सोडले. मी आता कंटाळून जेरीस आलो होतो. ही साता समुद्रापलीकडची खडतर तपश्चर्या मला टेकीस आणू पाहात होती. दुसऱ्या दिवशी डॉ. हिप्सना भेटलो आणि माझी गेल्या तीन वर्षांची कहाणी सांगितली. ते हसू लागले आणि म्हणाले, ‘माझ्याही आयुष्यात असा काळ येऊन गेला आहे. चल कपडे बदल आणि कामाला लाग’.
हे रुग्णालय एक अद्भुत अनुभव होता. इथे शहरातल्या श्रीमंत स्त्रिया सौंदर्य प्रसाधक शस्त्रक्रिया करून घ्यायला येत असत. ओटीपोट कमी करणे, स्तनांचा आकार वाढविणे किंवा कमी करणे, नाक पाहिजे तसे करून घेणे, लोंबलेले नितंब वर खेचणे, चेहऱ्यावरच्या मुरुमांना इस्त्री करणे अशा शस्त्रक्रिया त्या छोटय़ा रुग्णालयात दररोज होत. दर नवी बाई नवा सुगंध (परफ्यूम) दरवळत आत येत असे, मी त्यांना तपासू लागलो की बेलाशक कपडे उतरवत असे आणि बऱ्याच मला दोन प्रश्न विचारत असत- ‘मला खरेच या शस्त्रक्रियेची गरज आहे का? की मला काही मानसिक विकृती आहे?’ या गोऱ्यापान मढलेल्या बायका मला सौंदर्याचा बॉम्ब वाटत असत. अनेक घटस्फोटित असत, किंवा मी म्हातारी दिसू लागले तर माझा नवरा तरुण पोरीच्या आहारी जाईल अशी भीती मनात बाळगून काहीजणी येत. काही ‘धंदा’ करणाऱ्याही होत्या, पण इथे त्या गिऱ्हाईक.
माझे मन भांबावून गेले. कुक कौंटी रुग्णालयात मी वाघ होतो. इथे बकरी झालो, कारण मदत करणे एवढेच माझे काम होते. साधे टाके घालायलाही परवानगी नव्हती. मी मनाला सांगितले, ‘आता गप्प बस. झाली तेवढी वणवण पुरे झाली’. हेही दिवस जायचे होते.
रविन मायदेव थत्ते  rlthatte@gmail.com