एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर अमेरिकेच्या सॅम्युएल मोर्स याने संदेश पाठवण्यासाठी तयार केलेला ‘मोर्स कोड’ वापरून तारायंत्राद्वारे संदेशवहन सुरू झाले. अशा तारांची जाळी युरोप आणि अमेरिकेत पसरायला लागली. १८५८ साली अटलांटिक महासागरातून एक केबल टाकून युरोप आणि अमेरिकेमधली तारव्यवस्थेची जाळीही एकमेकांना जोडण्यात आली; मात्र केबल केवळ तीनच महिन्यांत तुटल्यामुळे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. या परिस्थितीत अधिक मजबूत केबल बनविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. पण या समस्येवर खरा उपाय सापडला तो तारांशिवाय करता येणाऱ्या- ‘बिनतारी’ संदेशवहनाचा शोध लागल्यामुळे!

सन १८८९ मध्ये जर्मनीच्या हाइन्रिश हर्ट्झ याने विद्युतभारित कणांचे आंदोलन घडवून, त्याद्वारे रेडिओलहरी निर्माण केल्या. त्यानंतर लगेचच फ्रेंच संशोधक एदुआर्द ब्रॅनले याने रेडिओलरींचे विद्युतलहरींत रूपांतर करणारे ‘कोहिअरर’ हे साधन तयार केले. सन १८९४ साली ब्रिटनच्या ऑलिव्हर लॉज याने या दोन्ही तंत्रांच्या वापराद्वारे, एक कळ दाबून ५० मीटर अंतरावरील घंटा वाजवली. सन १८९५ साली जगदीशचंद्र बोस यांनीही अशाच पद्धतीने दूरवरून बंदुकीच्या दारूचा छोटासा स्फोट घडवला. रेडिओलहरी या भिंतींचा अडथळा पार करतात, प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात, तसेच त्यांना प्रवासास माध्यमाची गरज नसते. त्यामुळे संदेशाच्या देवाणघेवाणीसाठी या लहरी उपयुक्त ठरणार होत्या.

ishan kishan & shreyas iyer
श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना बीसीसीआयच्या वार्षिक करारातून का वगळण्यात आलं?
Pimpri, Instagram friendship, theft, Woman flees, man's phone, meetup,
मैत्रिणीने ‘इंस्टाग्राम’ वर मॅसेज करुन भेटायला बोलविले आणि….
shahrukh-khan-dadasaheb-phalke-award
“मला पुन्हा…”, दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यावर शाहरुख खानने व्यक्त केल्या मनातील भावना
Fali S Nariman
पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेले भारताचे ज्येष्ठ विधिज्ञ फली एस नरिमन यांचं निधन

याच सुमारास- १८९४ मध्ये गुग्लिएल्मो मार्कोनीने इटलीतील बोलोग्ना येथे बिनतारी यंत्रणेवर प्रयोग सुरू केले होते. अगदी ढोबळ पद्धतीने सुरुवात करून मार्कोनीने आपल्या बिनतारी यंत्रणेची व्याप्ती पद्धतशीरपणे वाढवत नेली. संदेश अधिकाधिक दूर पोहोचवण्यासाठी मार्कोनीने कोहिअररची क्षमता वाढवली, अँटेनाची रचना बदलली, अँटेनाचा आकार आणि उंची वाढवून पाहिली, रेडिओलहरींची तरंगलांबी बदलली. अखेर योग्य स्वरूपाच्या अँटेना, योग्य लहरलांबीच्या रेडिओलहरी वापरून शक्तिशाली साधनांद्वारे इंग्लंडमधील दक्षिण कॉर्नवॉल येथून अटलांटिक महासागराच्या पलीकडील अमेरिकेतल्या न्यूफाउंडलँड येथे मोर्स कोडवरचे संदेश पाठवण्यात १२ डिसेंबर १९०१ रोजी मार्कोनी यशस्वी ठरला. गुग्लिएल्मो मार्कोनीला १९०९ सालचे नोबेल पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. १९१२ सालच्या टायटॅनिक दुर्घटनेत ज्या सातशे प्रवाशांचे प्राण वाचले, त्याचे श्रेय मोठय़ा प्रमाणावर या बिनतारी यंत्रणेला देण्यात येते. पहिल्या महायुद्धातल्या या संदेशवहन पद्धतीच्या मोठय़ा प्रमाणावरील उपयोगानंतर, व्यापारी जहाजांवरसुद्धा ही यंत्रणा बसवली जाऊ  लागली.

– सुनील सुळे मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org