08 March 2021

News Flash

तेहरानमधील राजकीय धुमश्चक्री

तेहरानमधील सत्ताधारी पहेलवी घराण्याची राजवट अयातोल्हाह खोमेनी याने आंदोलने

तेहरानमधील सत्ताधारी पहेलवी घराण्याची राजवट अयातोल्हाह खोमेनी याने आंदोलने, हिंसक चळवळी करून उलथवून १९७९ साली तेहरानमध्ये इराणचे इस्लामी प्रजासत्ताक सरकार स्थापन केले. शाह मोहम्मद रझा पेहलवीने आपल्या कुटुंबासह अज्ञात स्थळी पलायन केले. पेहेलवींचे अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांशी चांगले संबंध होते. अमेरिकेशी वर्षांला चाळीस कोटी डॉलरचा इराणचा व्यापार होता. खोमेनी आणि त्यांच्या अनुयायांना मोहम्मद पहेलवींचे अमेरिका धार्जणिे धोरण पसंत नव्हते. खोमेनीने तेहरानमध्ये अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांविरोधी तेहरान मधल्या तरुण वर्गामध्ये असे काही वातावरण तयार केले होते की तेहरानच्या कट्टर इस्लामी आणि तरुण वर्गाला खोमेनींच्या स्वरूपात देवदूतच अवतरल्या सारखे वाटत होते! खोमेनीने या गोष्टीचा फायदा उठवीत तेहरानमध्ये इस्लामी प्रजासत्ताक राज्य जाहीर करतानाच स्वतला इराणचा सर्वेसर्वा राजकीय नेता आणि सर्वोच्च शिया मुस्लीम धर्मगुरू घोषित केले. शाह मोहम्मद रजा पळून गेल्यावर आता अमेरिका आपल्या फौजा पाठवून इराणचा कब्जा घेणार अशी भीती इराणभर पसरली होती. इराणी लोकांनी मग अमेरिकन वकिलातीला वेढा घालून वकिलातीतील ५२ कर्मचारी ओलीस ठेवले. हे सर्व अर्थातच खोमेनीच्या इच्छेनेच झाले. हे ओलीस ४४४ दिवसांनी मुक्त केले गेले. इराणमध्ये आता अति कट्टर इस्लामी शरियतच्या कायद्याचे राज्य प्रस्थापित झाले. १९८० साली शत अल अरब या प्रदेशावरून इराक आणि इराणमध्ये मोठा संघर्ध सुरू होऊन त्यातून सुरू झालेले युद्ध आठ वष्रे चालले. सलमान रश्दी या ब्रिटीश लेखकाने लिहिलेल्या ‘दि सॅटनिक व्हस्रेस’ या पुस्तकाने १९८९ साली खोमेनींचे नाव परत एकदा गाजले. या पुस्तकातला काही मजकूर इस्लामला आक्षेपार्ह वाटल्यावरून खोमेनीने पुस्तकावर बंदी आणून जगातल्या सर्व मुस्लीमांना रश्दीला ठार मारण्याचे आवाहन केले. पण नंतर चारच महिन्यांनी ४ जून १९८९ रोजी खोमेनी मृत्यू पावल्याने या प्रकरणावर पडदा पडला. अमेरिकेतल्या टाइम या मासिकाने १९८९ सालचा ‘मॅन ऑफ द इयर’ हा बहुमान खोमेनीला दिला.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

 

डॉ. गार्सयिा डि ओर्टा

आशिया खंडातील आणि विशेषत: भारतामधील मसाल्याचे पदार्थ व प्रभावी औषधी वनस्पती याची माहिती आणि त्याबरोबरच अनेक चमत्कारिक समजुती यांचा प्रसार चौदाव्या शतकाच्या सुरुवातीपासून युरोपीय विद्वांनाना भुरळ घालत होता. अनेक भारतीय वनस्पतीसंबंधीचे औत्सुक्य वैद्यक मंडळात निर्माण झाले होते. त्यामध्ये डॉ. गार्सयिा डि ओर्टा या वैद्यक संशोधकाचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल.

गार्सआि ओर्टाचा जन्म स्पेनमधील ज्यू कुटुंबात १५०१ मध्ये झाला. त्यांनी १५१५-१५२५ या काळात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. त्या काळातील पश्चिम भारतातील पोर्तुगीज वसाहतीचे नौदलप्रमुख मार्टिन अल्फान्सो डिसोझा यांनी गार्सआि ओर्टाना आपला वैद्यकीय सल्लागार म्हणून भारतात येण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीवरून ओर्टा भारतात आले. भारतात आल्यावर त्यांनी अरब, गुजराती आणि कोकणी लोक आहारात आणि औषधात वापरत असलेल्या वनस्पतींची माहिती करून घेतली. तसेच या वनस्पती प्रत्यक्ष बघून त्यांच्या औषधी गुणधर्माबद्दल खात्री करून घेतली. स्थानिक राजेराजवाडे आणि अहमदनगरच्या बेहराम निजामशहाला व अनेक सरदारांना आजारातून बरे केले.

इसवीसन १५४५ मध्ये त्यांना मुंबई बेटावरील मोठी जमीन मिळाली. इतर अनेक सुविधा प्राप्त झाल्या. तेथे त्यांनी घर बांधले, खाद्योपयोगी फळे, शोभिवंत वनस्पती यांची बाग तयार केली. मुंबई परिसराच्या आसपास वाढणाऱ्या सर्व जंगली आणि लागवडीखाली असलेल्या वनस्पतींची त्यांना माहिती होती. डच लोकांनी मुंबईवर आक्रमण केले, तेव्हा या बागेचे फार नुकसान झाले. पुढे ब्रिटिशांनी तर त्याच्या बागेचा पुरा विध्वंस केला. त्यांनी अनेक वृक्ष आणि औषधी वनस्पतींची वर्णने त्यांच्या ‘भारतीय औषधी वनस्पतींची माहिती आणि संवर्धन’ या प्रसिद्ध ग्रंथात केली आहेत. हा ग्रंथ अनेक भाषांमध्ये प्रसिद्ध झाला. या ग्रंथाचे अजून एक वैशिष्टय़ असे की हा ग्रंथ संवाद स्वरूपात आहे.

वनस्पतिशास्त्र अभ्यासाचा वैज्ञानिक पाया घालणारा, त्याच्या उपयुक्त संग्रहाचे महत्त्व ओळखणारा, काहींची प्रत्यक्ष लागवड करून प्रयोग करणारा गार्सआि डा ओर्टा यांचा उल्लेख भारतीय वनस्पतिशास्त्राचा इतिहास लिहिताना आद्य युरोपियन अभ्यासक असाच करावा लागेल.

डॉ. वा. द. वर्तक, डॉ. सी. एस. लट्ट

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2016 3:48 am

Web Title: islamic republic government made by ayatollah khomeini
Next Stories
1 तेहरान
2 सुलतान इल्तमश
3 अग्रणी वनस्पती उद्यानाचे कार्य
Just Now!
X