वॉटर्लूच्या पराभवानंतर नेपोलियन बोनापार्टचा अस्त झाला आणि प्राणपणाने लढलेले त्याचे निष्ठावंत सनिक, सेनाधिकारी, इतर कर्मचारी देशोधडीला लागले. ते सर्व नोकरीच्या शोधात युरोप आणि आशियाई देशांमध्ये भटकंती करीत राहिले. त्यापकी एक होता जीन फ्रांजवाज अलार्ड. हा पुढे लाहोरच्या महाराजा रणजीत सिंग यांच्या शीख साम्राज्यात नोकरीला लागून परकीय कर्मचाऱ्यांपकी सर्वाधिक निष्ठावंत ठरला. महाराजांनी अलार्डला ‘ब्राइट स्टार ऑफ पंजाब’ अशी उपाधी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जीन अलार्डचा जन्म दक्षिण फ्रान्समधील सेंट ट्रापेज येथे १७८५ सालचा. घरच्या गरिबीमुळे जुजबी शिक्षण झाल्यावर बेडर वृत्तीचा अलार्ड नेपोलियनच्या कमांडो पथकात १८०३ साली भरती झाला. त्या काळात नेपोलियनचे हे कमांडो इटालीत कार्यरत होते. त्याची तडफ पाहून नेपोलियनने त्याला आपल्या शरीररक्षकपदी काही वष्रे नियुक्त केले, पुढे त्याला सातव्या घोडदळाच्या कॅप्टनपदी बढती दिली. वॉटर्लूच्या लढाईत प्राणपणाने नेपोलियनच्या घोडदळाचे नेतृत्व केलेला अलार्ड या लढाईनंतर पुढची तीन वष्रे फ्रान्समधल्या आपल्या गावी जाऊन राहिला.

पुढे इंग्लंडमध्ये नोकरी न मिळाल्याने इराणच्या शहाकडे काही दिवस नोकरी केल्यावर जीन अलार्ड काबूलच्या सुलतानाकडे नोकरीस आला. या काळात त्याची जीन व्हेंचुरा या इटालियन तरुणाशी ओळख झाली. व्हेंचुरा हासुद्धा नेपोलियनच्या लष्करातील एक सेनाधिकारी नोकरीच्या शोधात िहडत होता. काबूलमध्ये अलार्ड आणि व्हेंचुराने लाहोरच्या महाराजा रणजीतसिंगांची कीर्ती ऐकली आणि ते दोघे रणजीतसिंगांकडे आले. १८२२ साली महाराजांनी अलार्डला घोडदळात नियुक्त करून त्याच्या सनिकी प्रशासनाची क्षमता लक्षात आल्यावर शीख साम्राज्यासाठी कमांडो पथक आणि भालेकरी घोडदळ तयार करण्याची जबाबदारी त्याच्यावर टाकली. अलार्डला नोकरीत घेताना महाराजांनी त्यांचे शत्रू म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातील सरकार यांच्याशी त्याचे काही लागेबांधे आहेत काय याची चाचपणी केली. ब्रिटिशांशी युद्धाचा प्रसंग आल्यास अलार्ड आपल्याशी निष्ठावंत राहील असा करारही त्यांनी त्याच्याकडून करून घेतला.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: J f allard
First published on: 13-08-2018 at 00:49 IST