अलाहाबाद विद्यापीठातून बीएस्सी आणि एमएस्सी परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यावर सिंग यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून पीएच.डी. मिळवली. कुरुक्षेत्र विद्यापीठात सुमारे १६ वष्रे शिकवल्यावर त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठात प्राध्यापक म्हणून १० वष्रे, सन्माननीय प्राध्यापक म्हणून चार वष्रे शिकवले. सध्या वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून तेथेच संशोधन करत आहेत. कोलोराडो स्टेट युनिव्हर्सटिीत त्यांनी पाच वष्रे संशोधन केले.

हिमालय आणि शुष्क विषुववृत्तीय परिसंस्थांचा अभ्यास हे त्यांचे आवडते विषय आहेत. प्रा. सिंग यांनी भारतातील गवताळ प्रदेश, त्यातील उत्पादकता, जैवविविधता, ऊर्जाप्रवाह यांची गणितिक प्रतिमा तयार करून व्यवस्थापनाचा पाया घातला. हिमालय पर्वतराजीतील नसíगक ओक वृक्षांच्या ठिकाणी पाईन वृक्षांच्या लागवडीमुळे जमिनीतील नायट्रोजन ओक वृक्षांना उपलब्ध होत नाही हे दाखवून दिले.

भातशेतीमुळे मिथेन प्रदूषण होऊन पृथ्वीचे तापमान वाढते, अशा प्रचाराला उत्तर म्हणून केलेल्या संशोधनाद्वारे डॉ. सिंग यांनी सिद्ध केले की कोरडवाहू जमिनीवरची भातशेती आणि नसíगक परिसंस्था या मोठय़ा प्रमाणावर मिथेन शोषून घेऊन मिथेनचा समतोल राखतात. खाणीमुळे संहार झालेल्या जमिनीचे पुनरुत्थान करण्यास स्थानिक वनस्पती प्रकारच जास्त उपयुक्त असल्याचे त्यांनी दाखवून दिले.

प्रा. सिंग यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत. त्यापकी काही –

एस. एस. भटनागर पुरस्कार – १९८०,

पितांबर पंत राष्ट्रीय पर्यावरण फेलो – १९९४,

प्रवणानंद सरस्वती पुरस्कार – १९८५,

बिरबल सहानी पदक  – १९९९, इ.

अध्यक्ष -पर्यावरण विभाग, सायन्स काँग्रेस २००४; पंत हिमालयन पर्यावरण विकास संस्था, अल्मोरा : केरळ वनसंशोधन संस्था; राष्ट्रीय वन कमिशन; प्लािनग कमिशन; आंतरराष्ट्रीय व्हेजिटेशन सायन्स, स्वीडन; इंटिग्रेटेड माऊंटन डेवलपमेंट सेंटर, काठमांडू; भारतीय वन सल्लागार समिती; अशा  कित्येक महत्त्वाच्या समित्यांवर त्यांनी कार्य केले आहे.

प्रा. सिंग यांनी ४३ विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी मार्गदर्शन केलेले असून, ४०० वर शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत. या सर्व कार्याचा पसारा ते इतका व्यवस्थित सांभाळतात की ४०० पकी कोणत्याही शोधनिबंधाची प्रत मागितल्यास ते काही सेकंदांत शोधून देऊ शकतात.

–  प्रा. शरद चाफेकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

 

 

व्हिएन्नाचा ज्यू समाज

मार्च १९३८ मध्ये नाझी जर्मनीने व्हिएन्ना आणि संपूर्ण ऑस्ट्रियावर कब्जा केला. हिटलरने व्हिएन्नात केलेल्या आपल्या पहिल्या भाषणात ज्यू जमातीविरोधी सूर लावून सर्व ज्यूंनी ऑस्ट्रिया सोडून दुसरीकडे जावे असे सुचविले. ऑस्ट्रियाच्या बऱ्याच भागात ज्यूविरोधी वातावरण यापूर्वीच निर्माण झाले होते. हिटलरच्या वक्तव्यानंतर व्हिएन्नात ज्यूंविरोधी कारवाया सुरू झाल्या. शहरातील त्यांचे सिनेगॉग म्हणजे मंदिर आणि समाजाने एकत्र येण्याचे स्थळ ऑस्ट्रियन लोकांनी उद्ध्वस्त केले. हिटलरने या पूर्वीच ‘सेंट्रल ऑफिस फॉर ज्युइश एमिग्रेशन’ हे सरकारी खाते व्हिएन्ना, प्राग आणि अ‍ॅमस्टरडॅम या नाझी व्याप्त प्रदेशातून ज्यूंना बाहेर काढण्यासाठी सुरू केले होते. नोव्हेंबर १९३८ मध्ये हिटलरचा साहाय्यक अ‍ॅडाल्फ आइकमन याने या सरकारी खात्याचे केंद्र कार्यालय व्हिएन्नात सुरू केले. आइकमनने या कार्यालयासाठी लागणाऱ्या खर्चासाठी पशाची तरतूद धनिक ज्यूंना लुटून त्यांच्या पशांनीच केली. कार्यालयातील कर्मचारी प्रत्येक ज्यूच्या इमिग्रेशनची कागदपत्रे तयार करून त्याची हकालपट्टी लवकरात लवकर कशी करता येईल या कामगिरीसाठी नेमला गेला होता. बँक, शैक्षणिक संस्था आणि इतर सार्वजनिक संस्थांमधून प्रत्येकी एक प्रतिनिधीची नेमणूक या कार्यालयात केली गेली. प्रत्येक ज्यूची माहिती काढून त्याला ठरावीक मुदतीच्या आत ऑस्ट्रिया सोडले नाही तर त्याची रवानगी कॉन्स्न्ट्रेशन कॅम्पमध्ये होईल, अशी धमकीवजा नोटीस देण्यात आली होती. अनेक शतकांपासून येथील ज्यू समाज इतर समाजामध्ये एकजुटीने राहत होता. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत व्हिएन्नातील ज्यू समाजाने अनेक कलाकार, विद्वान, उद्योजक, बँकर देऊन शहराच्या विकासात मोठा हातभार लावला होता. पण हिटलरच्या ज्यू द्वेषामुळे १९३८ ते १९४३ या काळात व्हिएन्नातील दोनतृतीयांश ज्यू समाजाला ऑस्ट्रियाबाहेर इतरत्र जावे लागले तर  ६५ हजारांहून अधिक ज्यू-कॉन्स्न्ट्रेशन कॅम्पमध्ये मारले गेले.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com