ज्युडाइझम मानणाऱ्यांचा, ज्यू धर्मीयांचा देव येहोवा. जेरुसलेम हे त्यांचे पवित्र शहर. प्राचीन काळापासून या शहरातल्या टेम्पल माऊंट या टेकडीवर त्यांचा राजा सालोमनने बांधलेल्या येहोवाच्या मंदिराला ज्यूंच्या धार्मिक इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. दोन वेळा बांधलेले आणि आक्रमकांनी दोन्ही वेळा उद्ध्वस्त केलेल्या मंदिराच्या तटबंदीचा केवळ एक भाग शाबूत आहे. हिब्रू बायबलमध्ये उल्लेख असल्याप्रमाणे येहोवाचे पहिले मंदिर राजा सालोमनने इ.स.पूर्व ९५७ मध्ये बांधले. इजिप्तच्या फॅरोने पुढे जेरुसलेमवर आक्रमण केले त्या वेळी या मंदिराची बरीच पडझड झाली. जेरुसलेमवर इ.स.पूर्व ७०० मधील असिरियन राजाच्या आक्रमणात या मंदिराच्या आणखी काही भागांची मोडतोड झाली. परंतु इ.स.पूर्व ५८६ मध्ये बाविलोनियन राजांनी हे जेरुसलेमचे पहिले ज्यू मंदिर पूर्ण जमीनदोस्त केले. पुढे पíशयन काळात ज्यूंच्या दुसऱ्या मंदिराचे बांधकाम २३ वष्रे चालले. हे दुसरे मंदिर इ.स.पूर्व ५१६ ते इ.स. ७० अशी ६०० वष्रे टिकले. जेरुसलेममधील त्या काळातील दोन लाख ज्यू, त्यांच्या वर्षभरातील चार-पाच सणांच्या दिवशी या मंदिराच्या प्रांगणात जमत, कुर्बानीसाठी त्यांच्याबरोबर प्राणीही असत, शिवाय रोजच्या धार्मिक विधींसाठी दहा ते बारा हजार ज्यू तिथे येत असत. या मोठय़ा जनसमुदायासाठी राजा हेराडने या मंदिरासमोर भलामोठा चौक बांधून काढला आणि त्याच्या सभोवती पाच मीटर रुंद आणि दहा मीटर उंच अशी दगडांची तटबंदी बांधली. १६२ स्तंभांवर पांढऱ्या संगमरवरात बांधलेल्या या भव्य मंदिराचे दरवाजे ब्राँझचे होते आणि त्यावर सोन्याची कलाकुसर होती. पुढे रोमनांनी जेरुसलेम घेतल्यावर इ.स. ७० मध्ये हे ज्यूंचे द्वितीय मंदिर पूर्ण उद्ध्वस्त केले, पण सभोवतीची तटबंदीची िभत मात्र तशीच राहिली. पुढे इस्लामिक काळात तत्कालीन खलिफा अब्दुल मलिक इब्न मरवनने इ.स. ६८७ ते ६९१ या काळात मंदिराच्या जागी ‘डोम ऑफ रॉक’ आणि ‘अल् अक्सा मशीद’ बांधले. सध्या येथे ज्यूंच्या पुरातन मंदिर संकुलापकी पश्चिमेच्या तटबंदीचा काही भाग तेवढा शिल्लक राहिलाय. या ‘वेस्टर्न वॉल’ किंवा ‘वेलिंग वॉल’समोर उभे राहून प्रार्थना करणे, ‘तोरा’ धर्मग्रंथाचे वाचन करणे हा जेरुसलेमच्या ज्यूंचा नित्यपाठ आहे.

सुनीत पोतनीस

Know about This Seven Indian royal families heritage source of income and how they live a luxurious life
आलिशान राजवाडे, गडगंज संपत्ती; ‘ही’ आहेत भारतातील सात श्रीमंत राजघराणी; पण त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत काय?
Katchatheevu island controversy
विश्लेषण: कच्चथीवू बेटावर ‘या’ हिंदू राजांनी केले होते राज्य? त्यांचा रामाशी नेमका संबंध काय होता?
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी
village maps
गाव नकाशे नसल्याने मच्छीमारांचे अस्तित्व धोक्यात, पंचवीस वर्षांपासून प्रतीक्षा

sunitpotnis@rediffmail.com

 

कुंभी वृक्ष

कुंभ, कुंभा किंवा कुंभी हा वृक्ष भारतातील अनेक जंगलांत आढळून येतो. आकारमानाने कुंभ वृक्ष बराच मोठा असतो. पूर्ण वाढ झालेले झाड छत्राकार असते व त्याची साल खडबडीत आणि काळपट-तपकिरी रंगाची असते.

हा पानगळीचा वृक्ष असून, पानगळ सुरू होताना सर्व पाने रक्तवर्णी होऊन जातात. पाने बऱ्यापकी मोठी असून ती देठाजवळ निमुळती आणि टोकाजवळ रुंद असतात. पाने एकाआड, परंतु मंडलाकार प्रकारे उपफांद्यांच्या टोकांना लगडतात. हिवाळ्यात हा वृक्ष पूर्णपणे निष्पर्ण होऊन जातो. वसंत ऋतू सुरू होताच, (मार्चच्या अखेरीस आणि मे महिन्याची सुरुवात) कुंभ्याला फुले धरू लागतात. छोटय़ा फांद्यांच्या टोकांना फुले गुच्छात लगडतात. फुले मोठाली असून सफेद किंवा हलकीशी गुलाबी छटा ल्यालेली असतात. फुले उभयलिंगी असतात. फुलाला चार संदले व चार पाकळ्या असतात. फुलात शेकडो पुंकेसर दले असून एकच किंजल असते. संदले व पाकळ्या पुंकेसर दलांच्या खाली दडलेली राहिल्यामुळे सहज दिसत नाहीत. फुलांना सुवास तर नसतोच, परंतु नकोसा दर्प असतो. फुलारून आलेल्या झाडाचा परिसर या अप्रिय दर्पाने भारून जातो.  फुले फलित होऊन फलधारणा होते. फळेही झुपक्यांत लगडतात.

फळे साधारण लहान मोसंबीच्या आकारमानाची असतात. फळांची साल जाड व वातड असते. फळातील गर साधारण स्पंजासारखा मऊसर असतो. गरात अनेक तपकिरी रंगाच्या बिया असतात. जून-जुल महिन्यांत पूर्ण वाढ झालेली फळे गळून पडू लागतात. रानडुकरांसारखे काही वन्यप्राणी ही फळे खातात. त्यांच्या विष्ठेद्वारे बीजप्रसार होतो. चेंडूसारखी गोलाकार फळे जमिनीवर पडून घरंगळत जाऊन इतस्तत: पसरतात.

फळांचे विघटन होऊन बिया बाहेर पडतात. अनुकूल परिस्थितीत मिळालेल्या बिया रुजून, कालांतराने त्यांचेही वृक्ष बनतात.  कुंभी वृक्षाच्या काही भागांचे औषधी उपयोग असल्याचे सांगितले जाते; परंतु त्यातील कितींवर संशोधन होऊन ते खरेच औषधोपयुक्त आहेत काय, हाच एक संशोधनाचा विषय होईल. याचे शास्त्रीय नाव कारीया आबरेरिया  (Careya arborea) असून तो लेसिथीडासी  (Lecythidaceae) कुळातील आहे. कुंभी वृक्षाचे मूळ स्थान भारत आहे. आशिया खंडातही काही ठिकाणी हा वृक्ष आढळतो.

डॉ. सी. एस. लट्ट (मुंबई)

 मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org