मूळचे आयरिश वंशाचे जिम कॉर्बेट एक विश्वविख्यात शिकारी आणि तत्संबंधी लेखक, छायाचित्रकार, वन्यजीव संवर्धक म्हणून ओळखले जातात. भारतातील पहिल्या नॅशनल पार्कचे जनक म्हणूनही जिम यांची ओळख आहे. एकूण १९ वाघ आणि १४ बिबटय़ांची शिकार त्यांनी केली. कुमाऊं क्षेत्रातील जंगलांमधील नरभक्षक वाघांनी त्या परिसरात राहणाऱ्या माणसांचा केलेला संहार थांबवण्यासाठी जिम यांनी शिकार करण्यास सुरुवात केली.

जिम यांचे मूळ नाव एडवर्ड जेम्स कॉर्बेट. जिम हे त्यांचे टोपणनाव. त्यांचा जन्म १८७५ सालचा, उत्तराखंडातील ननिताल येथला. एकूण सोळा भावंडांपकी आठवे असलेल्या जिमचे वडील ख्रिस्तोफर विल्यम कॉर्बेट हे आर्यलडमधून भारतात येऊन ब्रिटिश भारतीय लष्करात कर्नलपदावर नोकरीला होते. पुढे त्यांनी लष्कराची नोकरी सोडून पोस्टात नोकरी धरली. १८६२ मध्ये ख्रिस्तोफर यांची नियुक्ती ननिताल येथे पोस्टमास्तर या पदावर झाली. ननितालच्या परिसरातल्या टेकडय़ा आणि जंगलातल्या कालादुंगी येथे त्यांनी स्वतचे घर बांधले. लहानपणापासूनच जिम यांना वन्यप्राण्यांविषयी आकर्षण होते. दिवसचे दिवस ते जंगलात झाडावर बसून जंगलात घडणाऱ्या सर्व गोष्टींचे बारकाईने निरीक्षण करीत आणि या गोष्टींचा उपयोग जिमना पुढील आयुष्यात झाला. जिम यांचे शालेय शिक्षण ननितालच्या ओक ओपिनग्ज स्कूलमध्ये तर उच्च शिक्षण तेथीलच सेंट जोसेफ कॉलेजात झालं. पदवी शिक्षणानंतर जिमना बंगाल आणि वायव्य रेल्वेत नोकरी मिळाली.

Swiggy delivery boy was caught on cctv camera stealing shoes kept outside flat in Gurugram video goes viral
VIDEO : डिलीव्हरी बॉयने चोरले घराबाहेरील शूज, घटना सीसीटिव्ही कॅमेरात कैद, पाहा व्हिडीओ
what is quds force
इस्रायलने सीरियात इराणी जनरलला का मारले; कुड्स फोर्स कोण आहेत?
spmcil recruitment 2024 jobs in security printing and minting corporation of India ltd
नोकरीची तयारी : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमधील संधी
fake coca cola cold drinks making and packing video goes viral people got angry after watching
कोल्ड्रिंक्सच्या नावाखाली विकले जातेय विष? व्हायरल VIDEO मध्ये पाहा बनावट कोल्ड्रिंक्सचा काळाबाजार

त्या काळात कुमाऊं आणि गढवाल प्रदेशात घनदाट जंगलांमधील काही नरभक्षक वाघांनी जवळच्या वस्त्यांमधील माणसांना मारून आपले भक्ष्य करण्याचे प्रकार अनेक वेळा झाले. जिम कॉर्बेट एक उत्तम शिकारी म्हणून आणि नरभक्षक वाघांचा ठावठिकाणा शोधून त्यांची शिकार करणारे म्हणून कुमाऊंमध्ये प्रसिद्ध झाले होते. आजूबाजूच्या गावातल्या माणसांवर वाघाने हल्ला केल्याची एखादी घटना घडली तर जिमना बोलावून त्यांच्याकडून त्या वाघाची शिकार केली जात असे.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com