कांजीवरम किंवा कांचीपूरम या नावाने ओळखल्या जाणाऱ्या साडीची निर्मिती तामिळनाडूतील कांचीपूरम येथील विणकर करतात. या साडीचे वैशिष्टय़ म्हणजे मोठे आणि कॉन्ट्रास्ट रंगांचे काठ. या साडीची किंमत रु.२५०० पासून एक लाखपर्यंत असते. साडीमधले सुंदर नक्षीकाम, रंगसंगती, साडी विणण्याची पद्धत आणि त्यामध्ये वापरलेले रेशीम, खरी जर इत्यादी घटकानुसार साडीची किंमत ठरवली जाते. कांचीपूरम साडीला २००५ सालापासून ‘भौगोलिक स्थानदर्शक’ प्रमाणपत्र देऊन संरक्षण देण्यात आले आहे. बदलत्या जगात या बाबीची खूप आवश्यकता आहे.
ही साडी विणायला नेहमी तीन विणकर लागतात. या साडीच्या काठाचे नक्षीकाम आणि रंग हे त्या साडीच्या मध्य भागातील रंगांपेक्षा पूर्णत: वेगळे असते. साडीचा पदर अगदी भिन्न रंगाने आणि स्वतंत्रपणे विणला जातो. पदर विणून झाल्यावर तो अतिशय नाजूकपणाने साडीला जोडला जातो. मूळ साडी आणि पदर जिथे जोडला जातो तिथे नागमोडी आकाराची सूक्ष्म रेषा दिसते. या साडीत टेम्पल बॉर्डर, चौकडा, पट्टे आणि बुट्टे विणलेले असतात. तद्वतच ही साडी विणताना अतितलम रेशमाचा वापर केला जातो आणि उभे आणि आडवे, दोन्ही धागे दुहेरी वापरले जातात.
या साडीच्या नक्षीकामात सूर्य, चंद्र, रथ, मोर, पोपट, राजहंस, सिंह, नाणी, आंबे, पाने अशा प्रकारच्या आकारांचा समावेश असतो. आणखी एक नेहमी वापरला जाणारा नक्षीकामाचा नमुना म्हणजे गोल किंवा चौकोनामध्ये जाई-जुईची कळी. या साडय़ा विणण्याकरिता रेशमाचा वापर टिकून असला तरी खऱ्या जरीची जागा आता कृत्रिम जरीने घेतली आहे. या साडीचा वापर मोठय़ा सण-समारंभात प्राधान्याने होतो.
पूर्वीच्या काळी चांगली आíथक मिळकत करणारा हा विणकर समाज आता मात्र हलाखीच्या परिस्थितीत आहे, त्याला मदत करण्यासाठी विणकर सहकारी संस्था स्थापन करून, कच्चा माल विणकरांना उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तसेच तयार झालेल्या साडय़ा विकण्याची सक्षम व्यवस्थापण उभी करायला हवी. बदलत्या काळानुसार मागणीनुरूप काही नवीन उत्पादने त्यांच्याकडून विणून घ्यायला हवीत, तरच हा विणकर समाज टिकून राहील.
दिलीप हेल्रेकर (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – टोंकचा अमीरखान
सध्या राजस्थानच्या पूर्व भागात, जयपूर पासून दक्षिणेस ८५ कि.मी.वर असलेले टोंक हे जिल्ह्याचे मुख्यालय, ब्रिटिशराजच्या काळात टोंक संस्थानाच्या राजधानीचे ठाणे होते. टोंकच्या राज्याचे मूळ संस्थापक अफगाणिस्तानचे, तालेखान याने मुहम्मद शाहच्या काळात सराई तुरीना येथे रोजगारासाठी िहदुस्थानात स्थलांतर केले, अमीरखान या त्याच्या नातवाने सर्व पठाण स्थलांतरांची संघटना बनविली. िपडारी ही जमात त्याच काळात म्हणजे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत उत्तर िहदुस्थानात संरक्षक, भाडोत्री सनिक किंवा भाडोत्री मारेकरी म्हणून काम करीत होती.
अमीरखानाने स्वतच्या पठाण टोळीला शस्त्रास्त्रांचा उपयोग, वापर शिकवून िपडाऱ्यांसारखाच भाडोत्री सनिकांचा व्यवसाय सुरू केला.
िपडारींनी पूर्व आणि दक्षिण मध्य भारत हे कार्यक्षेत्र तर अमीरखानाच्या पठाणांनी उत्तर भारत आणि राजस्थान हे आपले कार्यक्षेत्र केले. अमीरखानाने एकेकाळी १२००० घोडदळ आणि १००० पायदळ आणि २०० तोफा अशा मोठय़ा ताकदीची फौज तयार केली होती.
ग्वाल्हेर, इंदूरचे शासक अमीरखानाच्या कामगिरीवर खूश होऊन काहीवेळा त्याला जमीन बक्षीस देत. काही वेळा केवळ लूटमारीतून सुद्धा त्यांना प्रचंड आवक होत असे. १७९८ साली होळकरांनी अमीरखानाला टोंक हा परगाणा दिला होता.
त्याची वाढती ताकद पाहून ईस्ट इंडीया कंपनीचा गव्हर्नर जनरल सर माक्र्वीस ऑफ हेस्टिंग्ज (वॉरन हेस्टिंग्ज नव्हे) याने त्याला त्याच्या सन्यासह ब्रिटिश फौजेत सामील होण्याचे आवाहन केले. दोन अटींवर अमीरखानने त्याची फौज ब्रिटिश फौजेत सामील केली.
एकतर त्याला फौज उभी करण्याची नुकसान भरपाई मिळावी आणि त्याला टोंकचा नवाब म्हणून ब्रिटिशांनी मान्यता द्यावी. या अटी मान्य करून ब्रिटिशांनी १८१७ साली अमीरखानला टोंक या राज्याचा नवाब म्हणून घोषित केले.
सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com

nashik, Adulterated Goods, Worth Rs 54 thousand, Adulterated Goods Seized, Adulterated prasad, Trimbakeshwar Adulterated prasad, nashik news,
त्र्यंबकेश्वरमध्ये ५४ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त
life of fish, fish in river, fish danger,
नदी, तलावातील माशांचे आयुष्य का धोक्यात आलंय? काय आहे नवं संशोधन?
Competition with sakhar gathi coming from Gujarat in sakhar gathi business for gudhi padwa 2024
पाडव्यासाठीच्या साखर गाठी व्यवसायात गुजरातशी ‘गाठ’
trees Thane-Belapur industrial city
हरित पट्ट्याच्या मुळावर एमआयडीसी, २०० झाडांची कत्तल होणार, पर्यावरणवादी संस्थेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार